बाह्यप्रक्रिया भाग-१
१. बाह्यप्रक्रिया म्हणजे काय?
- खनन (अपक्षरण) मुळे भूपृष्ठ झिजते.
- वाहते पाणी (नदी), हिमनदी, वारा, सागराच्या लाटा आणि भूजल हे घटक अपक्षरण, वहन आणि संचयनाचे कार्य करतात.
- यामुळे वेगवेगळी भूरूपे तयार होतात.
२. नदीचे कार्य आणि भूरूपे
खननकार्य (झीज करण्याचे कार्य)
- नदी उंच प्रदेशातून खाली वाहते.
- वेगवान पाण्यामुळे खडक झिजतात आणि वेगवेगळी भूरूपे तयार होतात.
- घळई (Gorge)
- ‘V’ आकाराची दरी
- धबधबा
वाहन व संचयनकार्य (वाहून नेणे व साठवणे)
- कमी उताराच्या भागात नदीचा वेग मंदावतो आणि गाळ साठतो.
- पंखाकृती मैदान
- नागमोडी वळण
- पूरतट
- त्रिभुज प्रदेश (डेल्टा)
३. हिमनदीचे कार्य आणि भूरूपे
खननकार्य
- हिमनदी खूप संथ पण जड असल्याने जमिनीला झिजवते.
- हिमगव्हर
- ‘U’ आकाराची दरी
- लोंबती दरी
- गिरिशृंग
वाहन व संचयनकार्य
- हिमनदी सोबत बर्फ आणि दगड वाहून नेते आणि गाळ साठतो.
- हिमोढ
- हिमोढगिरी
४. वाऱ्याचे कार्य आणि भूरूपे
खननकार्य
- वारा वाळू आणि छोटे दगड उडवतो, त्यामुळे खडक झिजतात.
- भूछत्र खडक
- यारदांग
वाहन व संचयनकार्य
- वाऱ्यामुळे वाळूच्या कणांचे एकत्रीकरण होते.
- वाळूच्या टेकड्या
- बारखाण
- लोएस मैदान
५. सागरी लाटांचे कार्य आणि भूरूपे
खननकार्य
- सागराच्या लाटा किनाऱ्याच्या खडकांना झिजवतात.
- सागरी गुहा
- सागरी कमान
- सागरी स्तंभ
वाहन व संचयनकार्य
- समुद्राच्या किनाऱ्यावर रेती, वाळू साठते.
- पुळण
- वाळूचा दांडा
६. भूजलाचे कार्य आणि भूरूपे
खननकार्य
- जमिनीतील विद्राव्य खडक झिजतात.
- विलयविवर
- चुनखडीच्या गुहा
वाहन व संचयनकार्य
- जमिनीत खनिजे साठतात.
- लवणस्तंभ
Leave a Reply