असहकार चळवळ
१. गांधी युगाची सुरुवात (1920-1947)
- 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधींकडे आले.
- गांधीजींनी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांच्या आधारे स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली.
- त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे स्वातंत्र्य चळवळ अधिक व्यापक झाली.
२. गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य
- 1893 मध्ये वकिलीच्या कामासाठी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले.
- तेथे कृष्णवर्णीय भारतीयांवर अनेक अन्याय होत होते.
- 1906 मध्ये सरकारने कृष्णवर्णीयांसाठी ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले.
- गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने अन्यायाविरुद्ध लढा देऊन लोकांना न्याय मिळवून दिला.
३. गांधीजींचे भारतात आगमन आणि सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान
- भारत आगमन: 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी भारतात परतले.
- त्यांनी देशभर दौरा करून सामान्य लोकांचे दुःख पाहिले आणि राष्ट्रसेवेसाठी साबरमती आश्रम स्थापन केला.
- सत्याग्रह: सत्य आणि न्यायासाठी अहिंसक मार्गाने अन्यायाविरुद्ध लढा देणे.
- सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा आणि असत्याचा वापर करू नये.
४. गांधीजींचे महत्त्वाचे सत्याग्रह
- चंपारण्य सत्याग्रह (1917)
- बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालक शेतकऱ्यांना जबरदस्तीने नीळ पिकवण्यास भाग पाडत.
- गांधीजींनी शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रह केला व त्यांना न्याय मिळवून दिला.
- खेडा सत्याग्रह (1918)
- गुजरातमधील खेडा जिल्ह्यात दुष्काळ असूनही सरकारने शेतसारा माफ केला नाही.
- गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला, त्यामुळे सरकारला तो माफ करावा लागला.
- अहमदाबाद कामगार सत्याग्रह (1918)
- पहिल्या महायुद्धाच्या काळात गिरणी कामगारांना वेतनवाढ मिळत नव्हती.
- गांधीजींनी उपोषण आणि सत्याग्रह करून कामगारांना वेतनवाढ मिळवून दिली.
५. रौलट कायदा व जालियनवाला बाग हत्याकांड (1919)
- रौलट कायदा:
- ब्रिटिश सरकारला कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करण्याचा आणि न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार मिळाला.
- भारतीयांनी याला ‘काळा कायदा’ म्हणून विरोध केला.
- जालियनवाला बाग हत्याकांड (13 एप्रिल 1919)
- पंजाबमध्ये रौलट कायद्याच्या विरोधात आंदोलन तीव्र झाले.
- जनरल डायरने अमृतसरमध्ये जालियनवाला बागेत जमलेल्या लोकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला.
- यात सुमारे 400 लोक ठार झाले व हजारो जखमी झाले.
- या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी ‘सर’ हा किताब परत केला.
६. खिलाफत चळवळ (1920)
- तुर्कस्तानचा सुलतान हा मुस्लिमांचा धर्मगुरू (खलिफा) होता.
- पहिल्या महायुद्धानंतर इंग्लंडने त्याच्या साम्राज्यावर आघात केला.
- मुस्लिम समाजाने गांधीजींच्या नेतृत्वाखाली खिलाफत चळवळ सुरू केली.
- या चळवळीमुळे हिंदू-मुस्लिम ऐक्य निर्माण झाले.
७. असहकार चळवळ (1920-1922)
- गांधीजींच्या मते, ब्रिटिश सरकार भारतीयांच्या सहकार्यावर अवलंबून आहे.
- जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाशी संपूर्ण असहकार पुकारला, तर ते कोसळून पडेल.
असहकार चळवळीतील महत्त्वाचे टप्पे:
नागपूर अधिवेशन (1920) – असहकार चळवळीचा ठराव मंजूर करण्यात आला.
सार्वजनिक बहिष्कार:
- ब्रिटिश शाळा, महाविद्यालये, न्यायालये आणि सरकारी नोकर्या सोडल्या गेल्या.
- परदेशी वस्त्रांची होळी करण्यात आली आणि स्वदेशीचा प्रचार झाला.
प्रिन्स ऑफ वेल्सच्या दौऱ्याला विरोध (1921):
- मुंबईत प्रिन्स ऑफ वेल्स आले असता हरताळ पाळण्यात आला.
चौरीचौरा घटना (1922):
- उत्तर प्रदेशातील चौरीचौरा येथे पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला.
- संतप्त जमावाने पोलिस ठाण्याला आग लावून 22 पोलिसांना ठार केले.
- गांधीजींनी अहिंसाच नव्हे म्हणून असहकार चळवळ मागे घेतली.
८. स्वराज्य पक्षाची स्थापना (1922)
- गांधीजींना तुरुंगवास झाल्यानंतर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केला.
- या पक्षाने ब्रिटिश सरकारच्या अन्याय्य धोरणांना विरोध केला.
९. सायमन कमिशनचा विरोध (1927-1928)
- 1919 च्या सुधारणा अपुऱ्या असल्यामुळे ब्रिटिश सरकारने सायमन कमिशन नेमले.
- या कमिशनमध्ये एकही भारतीय नव्हता, त्यामुळे देशभरात ‘सायमन गो बॅक’ च्या घोषणा देत विरोध करण्यात आला.
- लाहोर येथे आंदोलन करताना लालालाजपतराय यांना पोलिसांनी लाठ्यांनी मारहाण केली, यात त्यांचा मृत्यू झाला.
१०. नेहरू अहवाल (1928)
- ब्रिटिशांनी भारताला स्वतःची राज्यघटना तयार करावी असे सांगितले.
- पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली.
- अहवालात प्रौढ मतदान, मूलभूत हक्क, भाषावार प्रांतरचना आणि वसाहती स्वराज्य यांसारख्या मागण्या करण्यात आल्या.
११. पूर्ण स्वराज्याची मागणी (1929)
- ब्रिटिशांनी नेहरू अहवाल मान्य केला नाही, म्हणून 1929 मध्ये लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली.
- 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पं. जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला.
- 26 जानेवारी 1930 रोजी संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
Leave a Reply