प्रश्न १. चूक की बरोबर ते सकारण सांगा.
(अ) भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे.
उत्तर – भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे- बरोबर
कारण: भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे भारतातील विविध भागांतील व परदेशांतील अनेक पर्यटक भारतात पर्यटनासाठी येतात व त्यामुळे पर्यटन व्यवसायाच्या व पर्यटन व्यवसायाशी संबंधित इतर अनेक व्यवसायांच्या विकासास चालना मिळते.
(आ) पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे.
उत्तर – पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे- बरोबर
कारण: पर्यटन हा तृतीयक स्वरूपाचा व्यवसाय आहे. पर्यटन व्यवसायात दृश्य स्वरूपातील वस्तूंची खरेदी-विक्री न होता अदृश्य स्वरूपातील सेवांची खरेदी-विक्री होते.
(इ) देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे.
उत्तर – देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे- बरोबर
कारण: देशाचा विकास अधिक असल्यास देशात वाहतूक मार्गांचे दाट, विकसित व कार्यक्षम जाळे आढळते. याउलट, देशाचा विकास कमी असल्यास देशात वाहतूक मार्गांचे विरळ, अविकसित व अकार्यक्षम जाळे आढळते. म्हणजेच, एखाद्या देशातील वाहतूक मार्गाच्या विकासावरून त्या देशाच्या विकासाचा अंदाज बांधता येतो.
(ई) ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे.
उत्तर – ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे- चूक
कारण: ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या ८ तास ३० मिनिटे मागे आहे. भारत आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडे आहे व भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. ब्राझील आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडे आहे व ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेच्या ३ तास मागे आहे.
(उ) भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे.
उत्तर – भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे- बरोबर
कारण: भारतात फार पूर्वीपासून पर्यटन व्यवसायात लोक गुंतलेले असूनही आधुनिक काळात पर्यटन व्यवसायाकडे नव्याने व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. सद्य:स्थितीत विविध पर्यटन प्रकार, पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा इत्यादी बाबतीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.
प्रश्न २. थोडक्यात उत्तरेलिहा.
(अ) ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात?
उत्तर –
1. ब्राझील या देशात नैसर्गिक विविधता असून पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, विविध उद्याने, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी इत्यादी घटक आढळतात. हे पर्यावरणीय घटक पर्यावरणस्नेही पर्यटकांना आकर्षित करतात.
2. ‘ब्राझीलिया’ ही ब्राझीलची नवीन राजधानी, तसेच ‘रिओ दी जनेरिओ’ आणि ‘सावो पावलो’ यांसारखी शहरेदेखील मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात.
(आ) ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गांच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत?
उत्तर –
1. ब्राझीलमध्ये रस्ते वाहतूक सर्वत्र आढळते. ब्राझील या देशात रस्तेमार्गांचा वाटा निम्म्यापेक्षा जास्त आहे. ब्राझीलच्या पूर्व भागात रस्ते मार्ग केंद्रित झाले आहेत.
2. याशिवाय, पॅराना या दक्षिणवाहिनी नदीचाही जल वाहतुकीसाठी उपयोग केला जातो. किनारी भागात सागरी जल वाहतूक चालते. ब्राझीलमध्ये अंतर्गत भागातील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील वनाच्छादित प्रदेश व दलदलयुक्त जमीन यांमुळे याठिकाणी वाहतूक मार्गांचा विकास मर्यादित आहे. येथे व्यापारी तत्त्वावर जल वाहतूक होते.
3. तसेच, उच्चभूमीमुळे अंतर्गत भागात लोहमार्गांचा विकास कमी झाला आहे.
4. रेल्वे वाहतूक स्वस्त असली तरी तिचा उपयोग मोजक्याच शहरांपुरता मर्यादित आहे.
अशारीतीने, विविध कारणास्तव ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गांच्या विकासामध्ये अडचणी आहेत.
(इ) कोणत्या साधनांमुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे?
उत्तर –
1. संदेशवहनामध्ये दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन, आकाशवाणी आणि आंतरजाल (इंटरनेट) यांचा समावेश होतो.
2. दोन्ही देशांची तुलना करता ब्राझीलमध्ये दूरसंचार सेवा अतिशय विकसित व कार्यक्षम आहे. येथील सुमारे ४५% पेक्षा अधिक लोकसंख्या आंतरजालाचा वापर करते, तर भारतामध्येही इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमाच्या प्रगतीमुळे दूरसंचार क्षेत्र अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे. संगणक, भ्रमणध्वनी व महाजाल यांसारख्या डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन व इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनला आहे.
3. अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने स्वयंविकसित तंत्रज्ञानाच्या आधारे उपग्रह व प्रक्षेपण यांबाबत मोठी भरारी घेतली आहे, तर ब्राझील देशांतर्गत तंत्रज्ञानाच्या आधारे उपग्रह अवकाशात सोडण्याच्या तयारीत आहे.
4. वरील मुद्द्यांचा विचार करता भ्रमणध्वनी, संगणक व इंटरनेट यांसारख्या डिजिटल साधनांमुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे.
प्रश्न ३. खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून ३१ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता विमान निघाले आहे. हे विमान ०° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्लीमार्गे व्लॉदिवोस्टॉक क याठिकाणी जाणार आहे. ज्यावेळेस विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लॉदिवोस्टॉक येथील स्थानिक वेळ, दिवस व तारीख काय असेल ते सांगा.
उत्तर – सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेस सूर्यास्त होतो. पृथ्वी पश्चिम ते पूर्वेकडे फिरत असताना सूर्य पूर्वेकडून पश्चिमेस सरकतो. पृथ्वी ही ३६०° च्या गोलाकार म्हणून पाहिली जाऊ शकते. २४ तासांत पृथ्वी ही ३६०° च्या गोलाकारात फिरते.
१ तासात पृथ्वीचे फिरविणे = ३६०/२४ = १५°
विमान ब्राझीलियाहून ३१ डिसेंबर, रविवारी सकाळी ११ वाजता उड्डाण करते. ब्राझीलियाचा वेळ निश्चित करणारा रेखांशाचा समन्वय ४७.५२° पश्चिम आहे ज्याच्या निर्देशांकात रेखांशाचा वेळ क्षेत्र ८२.५° पूर्व आहे.
ब्राझीलिया आणि नवी दिल्ली मधील रेखांश मधला फरक = ४७.५२° पश्चिम + ८२.५° पूर्व = १३०.०२° पूर्व
तासांमधील फरक = १३०.०२/१५ = ८६ तास
= ८ तास + (०.६*६०) मिनिटे
= ८ तास ३६ मिनिटे (अंदाजे)
पृथ्वी पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरत असल्याने, ८२.५° पूर्व सेल्सियसचा वेळ क्षेत्र ४७.५२° पश्चिम सेल्सियसच्या पुढे असेल. त्यामुळे भारतामध्ये वेळ ८ तास ३६ मिनिटांनी होईल.
जेव्हा विमान उड्डाण करते तेव्हा भारतात वेळ = ७.३६ वाजता
विमान रेखावृत्त ओलांडून नवी दिल्लीमार्गे व्लॉदिवोस्टॉक निघाले आहे ज्याचे निर्देशांक १३१.८८° पूर्व रेखांशात क्षेत्र आहे.
ब्राझीलिया आणि नवी दिल्ली मधील रेखांशाचा फरक = ४७.५२° पश्चिम + १३१.८८° पूर्व = १७९.४° पूर्व
वेळेत फरक = १७९.४/१५ = ११.९६ तास
= ११ तास + (०.९६*६०) मिनिटे
= ११ तास ५७ मिनिटे (अंदाजे)
पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्याने, १३१.८८° पूर्व तर ४७.५२° पश्चिम रेखावृत्त असेल. त्यामुळे विमान व्लॉदिवोस्टॉकमध्ये ११ तास ५७ मिनिटांनी पुढे जाईल.
व्लॉदिवोस्टॉकमधील वेळ जेव्हा विमान उड्डाण सुटते = १०.५७ वाजता (जवळपास)
प्रश्न ४. योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग | (i) पर्यटन स्थळ |
(आ) रस्ते वाहतूक | (ii) भारतातील रेल्वेस्थानक |
(इ) रिओ दी जनेरिओ | (iii) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग |
(ई) मनमाड | (iv) प्रमुख रस्ते मार्ग |
(v) ४०° पश्चिम रेखावृत्त |
उत्तर –
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग | (iv) प्रमुख रस्ते मार्ग |
(आ) रस्ते वाहतूक | (iii) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग |
(इ) रिओ दी जनेरिओ | (i) पर्यटन स्थळ |
(ई) मनमाड | (ii) भारतातील रेल्वे स्थानक |
प्रश्न ५. भौगोलिक कारणेलिहा.
(अ) ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.
उत्तर –
1. पांढऱ्याशुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन नदी खोऱ्यातील सदाहरित घनदाट अरण्ये, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उद्याने इत्यादी आकर्षणांमुळे ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास होत आहे.
2. पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण, पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे अत्यावश्यक आहे.
3. पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे शक्य होणार आहे.
म्हणून, ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.
(आ) ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही.
उत्तर –
1. ब्राझीलमधील बहुतांश नद्यांतील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे.
2. ब्राझीलमधील बहुतांश नदयांतील विसर्गाचा वेग जास्त आहे.
3.ब्राझीलमधील नदयांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात उंचसखल भूभाग आहेत. त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत. म्हणून, ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही.
(इ) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झाले आहे.
उत्तर –
1. लोहमार्गाने होणारी वाहतूक ही सुलभ व स्वस्त असते. लोहमार्ग नेहमीच प्रवासी व माल वाहतुकीचे प्रमुख साधन राहिले आहे.
2. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात भूउतार मंद असल्याने लोहमार्गांच्या उभारणीस योग्य स्थिती आहे.
3. हा प्रदेश दाट लोकवस्तीचा असून येथे कृषी व औद्योगिक विकास झाला आहे.
एकंदरीत अनुकूल परिस्थिती व नागरिकीकरणात वाढ यामुळे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झाले आहे.
(ई) देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरताे.
उत्तर –
1. वाहतूक व दळणवळणांच्या सोयींचा विकास हा कुठल्याही देशाच्या समतोल आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाची एक मूलभूत गरज असते.
2. वाहतूक व्यवस्था ही त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची असते. वाहतुकीमुळे प्रवाशांची ने-आण, मालाची वाहतूक करता येते.
3. रस्ते व रेल्वे वाहतुकीने दूरवरील ठिकाणे जोडली जातात.
4. जलमार्ग हे वाहतुकीचे स्वस्त साधन आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने जलमार्गाचा उपयोग होतो.
5. हवाईमार्गही आंतरराष्ट्रीय व्यापार व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
6. परिणामी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मालांच्या वाहतुकीमुळे परकीय चलन मिळण्यास मदत होते. हे देशाच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरते.
7. एकंदरीत, देशातील वाहतुकीमुळे आर्थिक उलाढाली व सांस्कृतिक देवाणघेवाण जलद गतीने होत असल्याने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.
(उ) आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते.
उत्तर –
1. जलमार्ग हा वाहतुकीचा सर्वांत स्वस्त मार्ग आहे. त्याचप्रमाणे, जलवाहतुकीत वाहतूक क्षमता तुलनेने अधिक असते.
2. आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात व निर्यात केली जाते.
3. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांचा वापर केला असता, कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात व निर्यात करता येते. म्हणून, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते.
प्रश्न ६. फरक स्पष्ट करा.
(अ) ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक
उत्तर –
ॲमेझॉन नदीतील जलवाहतूक | गंगा नदीतील जलवाहतूक | |
(१) | ॲमेझॉन नदीतून प्रामुख्याने व्यापारी तत्त्वावर आंतरराष्ट्रीय जलवाहतूक केली जाते. | गंगा नदीतून प्रामुख्याने अंतर्गत जलवाहतूक केली जाते. |
(२) | ॲमेझॉन नदीतून केल्या जाणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. | गंगा नदीतून केल्या जाणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. |
(आ) ब्राझीलमधील संदेशवहन व भारतामधील संदेशवहन
उत्तर –
ब्राझीलमधील संदेशवहन | भारतातील संदेशवहन | |
(१) | ब्राझीलमधील संदेशवहन तुलनेने अधिक विकसित व अधिक कार्यक्षम आहे. | भारतामधील संदेशवहन तुलनेने कमी विकसित व कमी कार्यक्षम आहे. |
(२) | ब्राझीलमधील सुमारे ४५% पेक्षा अधिक लोकसंख्या संदेशवहनासाठी इंटरनेटचा वापर करीत आहे. | भारतात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची एकूण संख्या ही जगात सर्वाधिक असली, तरी भारतातील केवळ सुमारे ३०% लोकसंख्या संदेश वहनासाठी इंटरनेटचा वापर करते. |
(३) | ब्रझीलमधील प्रदेशरचना, विस्तीर्ण लोकवस्तीविरहित प्रदेश, घनदाट वने या अडथळ्यांवर मात करून दूरसंचार सेवेचा विस्तार करणे हे ब्रझीलच्या अर्थव्यवस्थेला एक आव्हान आहे. | भारतामध्ये भ्रमणध्वनी, महाजाल या डिजिटल साधनांचा प्रभाव वाढत असून भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनला आहे |
(४) | तंत्रज्ञानाच्या आधारावर ब्रझील देश अवकाशात उपग्रह सोडण्याच्या तयारीत आहे. | स्वयंविकसित तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेले उपग्रह व प्रक्षेपण यांमुळे संदेशवहन क्षेत्रात भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल झाला आहे. |
(इ) भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ
उत्तर –
भारतीय प्रमाणवेळ | ब्राझीलची प्रमाणवेळ | |
(१) | भारत देशात एकच प्रमाणवेळ आहे. | ब्रझील देशात एकूण चार प्रमाणवेळा मानल्या जातात. |
(२) | रेखावृत्तीय विस्तार पाहता अति पूर्व व अति पश्चिम बिंदूंच्या वेळेतील फरक १२० मिनिटांचा (२ तास) आहे. | रेखावृत्तीय विस्तार पाहता अति पूर्व व अति पश्चिम बिंदूंच्या वेळेतील फरक १६८ मिनिटे (२ तास ४८) आहे. |
(३) | भारत हा देश पूर्व गोलार्धात असल्याने भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या ५ तास ३० मिनिटांनी पुढे आहे. | ब्रझील हा देश पश्चिम गोलार्धातील असल्याने तेथील प्रमाणवेळा कालविभागानुसार ग्रीनिच वेळेच्या अनुक्रमे २, ३, ४ आणि ५ तासांनी मागे आहेत. ब्रझीलची अधिकृत प्रमाणवेळ (BRT) ग्रीनिच वेळेच्या तीन तास मागे आहे. |
प्रश्न ७. टिपा लिहा.
(अ) आधुनिक संदेशवहन
उत्तर –
1. आधुनिक संदेशवहनामध्ये दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन, आकाशवाणी आणि आंतरजाल (इंटरनेट) यांचा समावेश होतो.
2. आधुनिक संदेशवहन हे तुलनेने कमी खर्चीक व अधिक परिणामकारक असते.
3. ब्राझील व भारत या दोन्ही देशांची तुलना करता ब्राझीलमध्ये दूरसंचार सेवा अतिशय विकसित व कार्यक्षम आहे. येथील सुमारे ४५% पेक्षा अधिक लोकसंख्या आंतरजालाचा वापर करते, तर भारतामध्येही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या प्रगतीमुळे दूरसंचार क्षेत्र अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे. संगणक, भ्रमणध्वनी व महाजाल यांसारख्या डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन व इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनला.
4. अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने स्वयंविकसित तंत्रज्ञानाच्या आधारे उपग्रह व प्रक्षेपण यांबाबत मोठी भरारी घेतली आहे, तर ब्राझील देशांतर्गत तंत्रज्ञानाच्या आधारे उपग्रह अवकाशात सोडण्याच्या तयारीत आहे.
(आ) भारतातील हवाई वाहतूक
उत्तर –
1. ब्राझीलच्या तुलेनत भारतातील आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा अधिक प्रमाणात विकास झाल्याचे आढळते.
2. भारतात आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाबरोबरच अंतर्गत हवाई मार्गाच्या वापरात वाढ होत आहे.
3. भारतातील महत्त्वाची शहरे एकमेकांना अंतर्गत हवाई मार्गांनी जोडली गेली आहेत. त्याचप्रमाणे भारतातील महत्त्वाची शहरे जगातील इतर देशांतील महत्त्वाच्या शहरांशी आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांनी जोडली गेली आहेत.
4. मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता, विशाखापट्टणम इत्यादी शहरांत भारतातील प्रमुख विमानतळ आहेत.
(इ) प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक
उत्तर –
1. प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक यांचा खूप जवळचा संबंध दिसून येतो.
2. प्रदेशांचा उंचसखलपणा, नद्यांची, खाड्यांची किंवा तलावांची अरुंद पात्रे, नदयांतील किंवा खाड्यांतील पाण्याचा जलद वेग, नद्यांच्या पात्रांत उंचसखल भूभागामुळे तयार झालेले धबधबे, नद्यांना येणारे पूर इत्यादी घटकांमुळे अंतर्गत जलवाहतुकीत अडथळे निर्माण होतात.
3. सखल प्रदेश, नद्यांची, खाड्यांची किंवा तलावांची रुंद पात्रे, नद्यांतील किंवा खाड्यांतील पाण्याचा संथ वेग इत्यादी घटकांमुळे अंतर्गत जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर विकसित होते.
4. भारतातील महत्त्वाच्या नद्यांमधून अंतर्गत जलवाहतूक केली जाते. भारतातील एकूण वाहतूक मार्गांत जलमार्गांचा वाटा केवळ १ टक्का आहे.
(ई) प्रमाणवेळेची उपयोगिता
उत्तर –
1. देशाचा रेखावृत्तीय विस्तार विचारात घेऊन देशाच्या कारभाराच्या दृष्टीने एकसूत्रता यावी, याकरता त्या देशाची प्रमाणवेळ निश्चित केली जाते.
2. ब्राझीलच्या रेखावृत्तीय विस्तारानुसार अति पूर्वेकडील व अति पश्चिमेकडील बिंदू लक्षात घेता त्यांच्या वेळेत १६८ मिनिटे (२ तास ४८ मिनिटे) इतका फरक आहे. वेळेतील एवढा मोठा फरक लक्षात घेऊन ब्राझीलचे वेगवेगळे कालक्षेत्र केले आहेत. त्यामुळे, ब्राझीलमध्ये एकूण चार प्रमाणवेळा मानल्या जातात.
3. तर भारताचा एकूण रेखावृत्तीय विस्तार लक्षात घेता अति पूर्व व अति पश्चिमेकडील रेखावृत्तांमधील वेळेचा फरक १२० मिनिटे (२ तास) आहे. साधारणत: भारताच्या मध्यातून अलाहाबाद शहरातून जाणारे ८२°३०′ रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही भारताची प्रमाणवेळ मानली आहे. या वेळेनुसार भारतातील सर्व स्तरांवरील व्यवहार केले जातात. परिणामी, देशात वेळेबाबत गोंधळ न होता या व्यवहारांमध्ये एकसूत्रता येते.
4. जागतिक स्तरावरील व्यवहारांकरता ग्रीनिच येथील स्थानिक वेळ आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ (GMT) म्हणून मानण्यात येते.
Ishwari apradhe says
This is very useful for students who do not have the opportunity to buy a digest, as well as for other students.
Kanchan says
Thank you so much for questions and answer and thanks for help me 🙏
Radhika Bhosale says
🙏🏻🙏🏻 धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Varsha Tidke says
Wow 😲 ye to mujhe pata he nahi tha
Shubra says
Thank you so much