प्रश्न १.अचूक पर्यायांसमोरील चौकटीत अशी खूण करा.
(अ) वस्त्यांचेकेंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडित असते.
(i) समुद्रसान्निध्य
(ii) मैदानी प्रदेश
(iii) पाण्याची उपलब्धता
(iv) हवामान
उत्तर – (iii) पाण्याची उपलब्धता
(आ) ब्राझीलच्या अाग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते?
(i) केंद्रित
(ii) रेषाकृती
(iii) विखुरलेली
(iv) ताराकृती
उत्तर – (i) केंद्रित
(इ) भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो?
(i) नदीकाठी
(ii) वाहतूक मार्गांच्या लगत
(iii) डोंगराळ प्रदेशात
(iv) औद्योगिक क्षेत्रात
उत्तर – (iii) डोंगराळ प्रदेशात
(ई) नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते.
(i) वनाच्छादन
(ii) शेतीयोग्य जमीन
(iii) उंचसखल जमीन
(iv) उद्योगधंदे
उत्तर – (ii) शेतीयोग्य जमीन
(उ) ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते?
(i) पारा
(ii)आमापा
(iii) एस्पिरितो सान्तो
(iv) पॅराना
उत्तर – (i) पारा
प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.
उत्तर –
1. मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर अनेक उदयोगांसाठी पाणी अत्यावश्यक असते.
2. पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही. अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही.
3. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो. अशा प्रकारे, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.
(आ) ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.
उत्तर –
1. सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवादयांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या.
2. ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो.
3. परिणामी, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उदयोगांचा विकास झाला आहे. परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.
(इ) भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.
उत्तर –
1. शेतीतील प्रगती, उदयोगांचा विकास, शिक्षणाचा प्रसार, वाहतुकीच्या सुविधांचा विकास, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इत्यादी कारणांमुळे भारतात नवनवीन शहरे उदयास येत आहेत.
2. या शहरांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
3. या शहरांत भारताच्या विविध भागांमधून लोक स्थलांतरित होऊन स्थायिक होत आहेत. त्यामुळे, भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.
(ई) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.
उत्तर –
1. ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.
2. या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ ६०० मिमी आहे. त्यामळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.
3. पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात. म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.
(उ) उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झालेआहे.
उत्तर –
1. उत्तर भारतात अनेक राज्यांत हिमालयाचा पर्वतीय भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उद्योगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही. परिणामी उत्तर भारतात अनेक राज्यांत नागरीकरणाचा वेग कमी आहे.
2. याउलट, दिल्ली आणि चंदीगड ही शहरे मैदानी भागात आहेत. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगड पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे.
3. दिल्ली व चंदीगड या दोन्ही शहरांत अनेक प्रशासकीय कार्यालये, विविध उदयोग, बँका, इतर सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे, उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झाले आहे.
प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) भारत आणि ब्राझील या देशांचा नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या.
उत्तर –
1. भारत आणि ब्राझील या दोन देशांपैकी ब्राझीलमध्ये अधिक नागरीकरण व भारतात कमी नागरीकरण झाल्याचे आढळून येते.
2. २०११ च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण हे केवळ ३१.२ टक्के होते. याउलट २०१० च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण हे सुमारे ८४.६ टक्के होते.
3. १९६१ ते २०११ या पन्नास वर्षांच्या कालखंडात भारतातील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत १८ टक्क्यांपासून ३१.२ टक्क्यांपर्यंत सातत्याने वाढ झाली आहे.
4. भारताप्रमाणेच, १९६० ते २०१० या पन्नास वर्षांच्या कालखंडात ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीतही ४७.१ टक्क्यांपासून ८४.६ टक्क्यांपर्यंत सातत्याने वाढ झाली आहे.
5. भारतात १९६१ ते २०११ या पन्नास वर्षांच्या कालखंडात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली असल्याचे आढळते.
6. भारतात १९६१ ते २०११ या पन्नास वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकात नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी-अधिक असल्याचे आढळून येते.
7. ब्राझीलमध्ये १९६० ते २०१० या पन्नास वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली.
8. परंतु, ब्राझीलमध्ये १९६० ते २०१० या पन्नास वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकातील नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर हा क्रमशः घटत जाणारा आढळून येतो.
(आ) गंगा नदीचेखोरेआणि ॲमेझॉन नदीचेखोरे यांतील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा.
उत्तर –
1. गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सौम्य हवामान आढळते.
2. गंगा व तिच्या उपनद्यांनी वाहन आणलेल्या गाळामुळे गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सुपीक मृदा आढळते.
3. गंगा नदीच्या खोऱ्यातील सुपीक जमिनीवर शेतीचा विकास झाला आहे. परिणामी, इतर उद्योगांचा विकास झाला आहे.
4. गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात वाहतुकीच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या खोऱ्यात दाट व केंद्रित स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते.
5. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात रोगट हवामान आढळते.
6. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट वर्षावनांमुळे तेथील प्रदेश दुर्गम बनला आहे.
7. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शोधावर व त्यांच्या वापरावर नैसर्गिकरीत्या मर्यादा आल्या आहेत.
8. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात पुरेशा प्रमाणात वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात विरळ व विखुरलेल्या स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते.
Vardhan dhakad says
Google change standard chapter number 8
Teju says
भारी आहे
Payal says
Better aahe
Sunaina says
Shevatcha prashant nahi
Rakhi says
👌👌
Aniruddh Pande says
Last question?
Ananya says
थोड़े छोटे सवाल भेजिए।