प्रश्न १. खालील विधानेचूक की बरोबर तेसांगा. चुकीची विधाने दुरुस्त करा.
(अ) भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे.
उत्तर – भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे- बरोबर.
(आ) ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणेजास्त पसंत करतात.
उत्तर – ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात- बरोबर
(इ) भारतातील लोकांचेआयुर्मान कमी होत आहे.
उत्तर – भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे- चूक
दुरुस्त विधान: भारतातील लोकांचे आयुर्मान वाढत आहे.
(ई) भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे.
उत्तर – भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे- चूक
दुरुस्त विधान: भारताच्या वायव्य भागात विरळ लोकवस्ती आहे.
(उ) ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे.
उत्तर – ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे- चूक
दुरुस्त विधान: ब्राझीलच्या पश्चिम भागात विरळ लोकवस्ती आहे.
प्रश्न २. दिलेल्या सुचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) भारतातील खालील राज्यांची नावेलोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहा.
हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश.
उत्तर – उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश.
(आ) ब्राझीलमधील खालील राज्यांची नावेलोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने लिहा.
ॲमेझॉनस, रिओ दी जनेरीओ, अलाग्वास, सावो पावलो, पॅराना.
उत्तर – ॲमेझॉनस, अलाग्वास, पॅराना, सावो पावलो, रिओ दी जनेरिओ.
(इ) लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल व प्रतिकूल अशा गटांत वर्गीकरण करा.
सागरी सान्निध्य, रस्त्याची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उद्योगधंद्यांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्ण कटिबंधीय आर्द्र वने, खनिजे, निमशुष्क हवामान, शेतीस उपयुक्त जमीन.
उत्तर –
(अ) लोकसंख्येवर परिणाम करणारे अनुकूल घटक: सागरी सान्निध्य, समशीतोष्ण हवामान, नवीन शहरे आणि नगरे, खनिजे, शेतीस उपयुक्त जमीन.
(ब) लोकसंख्येवर परिणाम करणारे प्रतिकूल घटक: रस्त्यांची कमतरता, उद्योगधंद्यांची उणीव, उष्ण कटिबंधीय आर्द्र वने, निम-शुष्क हवामान.
प्रश्न ३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) भारत व ब्राझील यादेशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा.
उत्तर –
(i) भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य:
1. दोन्ही देशांच्या अतिउत्तर, मध्य व वायव्य भागात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे.
2. भारतातील अतिउत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर या राज्यात व ब्राझीलमधील अतिउत्तरेकडील अमापा राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे.
3. भारतातील मध्य भागातील मध्य प्रदेश राज्यात व ब्राझीलमधील मध्य भागातील माटो ग्रासो राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे.
4. भारताच्या वायव्य भागातील राजस्थान राज्यातील थरच्या वाळवंटात व ब्राझीलमधील वायव्य भागातील ॲमेझॉनस राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे.
5. भारतातील पूर्व व पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात आणि ब्राझीलमध्ये पूर्व किनारपट्टीच्या व प्रामुख्याने आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते.
(ii) भारत व ब्राझीलया देशांच्या लोकसंख्या वितरणातील फरक:
1. भारतातील गंगा व इतर नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते. याउलट, ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आढळते.
2. जनगणना २०११ नुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता ३८२ व्यक्ती प्रति चौकिमी होती. याउलट, ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता केवळ २३ व्यक्ती प्रति चौकिमी होती.
(आ) लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणेदेऊन स्पष्ट करा.
उत्तर –
1. लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा जवळचा संबंध असतो. अतिपर्जन्य किंवा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशांत किंवा अतिथंड अथवा अतिउष्ण अशा प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशांत लोकसंख्येचे विरळ वितरण आढळते.
2. उदा., भारतातील अतिथंड हिमालयाच्या पर्वतरांगेत, थरच्या वाळवंटी भागात तसेच ब्राझीलमधील अतिपर्जन्य असणाऱ्या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे विरळ वितरण आढळते.
3. सौम्य तापमान व पर्जन्याचे मध्यम प्रमाण असलेल्या प्रदेशांत लोकसंख्येचे दाट वितरण आढळते.
4. उदा., भारतातील सौम्य हवामान व मध्यम पर्जन्य असणाऱ्या गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात तसेच ब्राझीलमधील समशीतोष्ण हवामान असलेल्या आग्नेय किनारपट्टीच्या भागात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते.
प्रश्न ४. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) लोकसंख्या हेएक महत्त्वाचेसंसाधन आहे.
उत्तर –
1. कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो.
2. एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संथ गतीने होतो.
3. एखादया देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास जलद गतीने होतो. अशा प्रकारे, लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.
(आ) ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.
उत्तर –
1. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील जगात पाचव्या क्रमांकावर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार ब्राझीलची लोकसंख्या सुमारे १९ कोटी असून लोकसंख्येच्या दृष्टीनेही हा देश जगात पाचव्या क्रमांकावर आहे.
2. पृथ्वीच्या भूभागापैकी ५.६% भाग ब्राझील व्यापतो. त्यावर जगाच्या लोकसंख्येपैकी फक्त २.७% लोकसंख्या वास्तव्यास आहे.
3. ब्राझीलमध्ये लोकसंख्यावाढीचा दरदेखील कमी होताना दिसून येतो, म्हणून लोकसंख्या वाढ नियंत्रणात आहे.
या सर्व कारणांमुळेच ब्राझीलचे आकारमान जास्त असले तरीही तेथील लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार ब्राझीलमध्ये लोकसंख्येची सरासरी घनता २३ व्यक्ती प्रति चौकिमी इतकी आहे.
(इ) भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आह.
उत्तर –
1. पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ २.४१ टक्के भूभाग भारताने व्यापला आहे.
2. याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १७.५ टक्के लोकसंख्या भारतात आढळते.
3. भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.
(ई) ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.
उत्तर –
1. ब्राझील देशाच्या उत्तर भागात विषुववृत्ताजवळील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे २००० मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे २८° से असते.
2. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या भागात अत्यंत घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात. जास्त पर्जन्यमान, उष्ण व दमट हवामान आणि घनदाट वर्षावने या प्रतिकूल घटकांमुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग दुर्गम बनला आहे.
3. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले नाही. त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.
(उ) गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचेवितरण दाट आहे.
उत्तर –
1. भारतातील उत्तर भागात गंगा नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश आहे.
2. गंगा नदीच्या खोऱ्यात पुरेसे पर्जन्यमान, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, सौम्य हवामान इत्यादी अनुकूल घटक आढळतात.
3. गंगा खोऱ्याचा प्रदेश शेती व विविध उदयोगांच्या विकासासाठी अनुकूल आहे. या प्रदेशात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले आहे. त्यामुळे गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे.
प्रश्न ५.
(अ) एक चौकिमी क्षेत्र दर्शवणाऱ्या ‘अ’ व ‘आ’ चौकोनांमधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून वर्गवारी करा.
उत्तर – ‘अ’ चौकोनामध्ये ७ व्यक्ती प्रति चौकिमी असल्याने येथे लोकसंख्येची घनता कमी आहे. म्हणजेच, हे क्षेत्र विरळ लोकसंख्येचे आहे.
(आ) आकृती ‘आ’ मधील एक चिन्ह = १०० व्यक्ती सेप्रमाण असल्यास स्त्री-पुरुष प्रमाण सांगा.
उत्तर –
‘आ’ चौकोनामध्ये १८ व्यक्ती प्रति चौकिमी असल्याने येथे
लोकसंख्येची घनता जास्त आहे.
म्हणजेच, हे क्षेत्र दाट लोकसंख्येचे आहे.
जर आकृती ‘आ’ मध्ये एक चिन्ह = १०० व्यक्ती
तर स्त्रियांची संख्या १० × १०० = १००० असून
पुरुषांची संख्या ८ × १०० = ८०० इतकी आहे.
जर पुरुषांची संख्या = १००० मानली,
तर स्त्रियांची संख्या = ?
∴ लिंग गुणोत्तर = `१००० xx (१०००)/(८००)` = १२५०
∴ स्त्रियांची संख्या = १२५०
म्हणजेच, स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे.
प्रश्न ६. आकृती ६.१ ‘आ’ मधील लोकसंख्येच्या घनतेविषयी भाष्य करा.
उत्तर – लोकसंख्येची घनता म्हणजे प्रति युनिट क्षेत्र किंवा युनिट व्हॉल्यूमची लोकसंख्या मोजणे.
आकृतीमध्ये लोकसंख्या घनता असमानपणे वितरित केली आहे:
1. जम्मू-काश्मीर सारख्या उत्तरेकडील भागात आणि सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशसारख्या ईशान्य राज्यांमध्ये लोकसंख्या घनता कमी आहे.
2. पंजाब ते पश्चिम बंगालपर्यंतच्या उत्तरेकडील भागात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे.
3. मध्य, पश्चिम आणि ईशान्य राज्यांची लोकसंख्या घनता मध्यम आहे.
4. केरळ आणि तामिळनाडूसारख्या दक्षिणी राज्यांमध्येही लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे.
Aryan says
Study
Dnyneshwar chilemod says
No problem sir
Dnyneshwar chilemod says
Yes I like your name