भाषाभ्यास:
श्लोकः 1
1. एकवाक्येन उत्तरत।
अ. कैः धनं न हीयते?
उत्तरम् : चौरेण, राज्ञा च विद्याधनं न ह्रियते।
आ. केषु धनं न विभज्यते ?
उत्तरम् : भ्रातृषु धनं न विभज्यते।
इ. सर्वधनप्रधानं किम् ?
उत्तरम् : सर्वधनप्रधानं विद्याधनम् ।
मराठी अनुवाद:
अ. कोण पैसे गमावत नाही?
उत्तर: चोर आणि राजा ज्ञानाची संपत्ती चोरत नाहीत.
आ. पैसे कोणाला विभागले जात नाहीत?
उत्तर: भावांमध्ये संपत्ती वाटली जात नाही.
इ. सर्व संपत्तीमध्ये सर्वात महत्वाचे काय आहे?
उत्तर: सर्व संपत्तींपैकी सर्वात महत्त्वाची संपत्ती म्हणजे ज्ञानाची संपत्ती.
2. माध्यमभाषया उत्तरत।
विद्याधनं व्यये कृते कथं वर्धते ?
उत्तरम् :
‘सूक्तिसुधा’ या पद्यपाठामध्ये विविध संस्कृत साहित्यकृतींमधून सुभाषिते संकलित केली आहेत. प्रसङ्गाभरणम् मधील श्लोक विद्येचे महत्त्व सांगतो. विद्या हे धन असे आहे जे कोणी चोरू शकत नाही, जे राजा कुणाकडून घेऊ शकत नाही, विद्याधन हे भावंडांमध्ये इतर मालमत्तेप्रमाणे वाटले जाऊ शकत नाही व त्याचे कधी ओझे सुद्धा होत नाही.
पैसा खर्च केला की तो कमी होतो, पण विद्याधन मात्र जितके वाटू तितके वाढते. आपण आपल्याकडचे ज्ञान जेव्हा दुसऱ्याला देतो तेव्हा त्याच्याकडूनसुध्दा आपल्याला अधिक ज्ञान मिळते. चर्चामधून, ज्ञानाच्या आदान-प्रदानामधून आपल्या ज्ञानात वाढच होते. ज्ञान दिल्याने वाढते, हा संदेश या श्लोकातून दिला आहे.
In the lesson ‘सूक्तिसुधा’ various subhashitas are collected from different literature pieces of Sanskrit. – In the shloka from प्रसङ्गाभरणम् the importance of knowledge is expressed. Knowledge can neither be stolen nor it can be taken away by king. It is indivisible and is not burden either.
Knowledge is that kind of a wealth which increases though spent unlike other riches. When we impart knowledge to someone, through that interaction we gain more knowledge. Here knowledge increases but never decreases. This special feature of knowledge suggests us that we should always share our knowledge and it is the greatest wealth.
3. सन्धिविग्रहं कुरुत ।
वर्धत एव ।
उत्तरम् : वर्धत एव – वर्धते + एव।
4. समानार्थकशब्द लिखत।
- चोरः – तस्करः, स्तेनः।
- नित्यम् – सदा, सर्वदा, सदैव।
- विद्या – ज्ञानम्।
- धनम् – वित्तम्।
- प्रधानम् – प्रमुखम्।
5. विरुद्धार्थकशब्द लिखत।
- व्ययः × सञ्चयः।
- नित्यम् × क्वचित्।
- प्रधानम् × गौणम्, तुच्छम्।
श्लोक: 2
1. सन्धिं कुरुत।
अ. परः + वा + इति
आ. वसुधा + एव
उत्तरम् :
अ. परो वेति – पर: + वा + इति।
आ. वसुधैव – वसुधा + एव।
2. एकवाक्येन उत्तरत।
अ. ‘अयं निजः, अयं परः’ इति केषां गणना ?
उत्तरम् :
अयं निजः, अयं परः इति लघुचेतसाम् गणना।
आ. केषां कृते वसुधा एव कुटुम्बकम् भवति?
उत्तरम् :
उदारचरितानां कृते वसुधा एव कुटुम्बकम् अस्ति।
मराठी अनुवाद:
अ. ‘अयं निजः, अयं परः’ ही कोणत्या लोकांची गणना आहे?
उत्तर: ‘अयं निजः, अयं परः’ ही कोत्या मनाच्या लोकांची गणना आहे.
आ. कोणांसाठी पृथ्वीच कुटुंब असते?
उत्तर: उदार चरित्राच्या लोकांसाठी पृथ्वीच कुटुंब असते.
3. माध्यमभाषया उत्तरत।
लघुचेतसः उदारचेतसः जनाः कथम् अभिज्ञातव्याः ?
उत्तरम् :
दररोजच्या आयुष्यात आपण अनेक मूल्ये, तत्त्वे पाळतो ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला आकार मिळतो व ते अधिक समृद्ध होते. अशाच काही मूल्यांचा संदेश ‘सूक्तिसुधा’ या पद्यपाठातून दिला आहे.
शाईधरपद्धति मधून घेतलेल्या या श्लोकात उदार माणसांच्या गुणांचा गौरव केला आहे. काही माणसे नेहमी हे माझे, हे तुझे असे म्हणून गोष्टींमधे भेद करतात. त्यांच्या स्वत:च्या गोष्टींपुरतेच ते पाहतात व जे परके, आपले नाही त्याच्याशी काही देणे-घेणे ठेवत नाहीत. अशी माणसे कोत्या मनाची समजावीत. या उलट जी माणसे मनाने उदार असतात त्यांच्यासाठी संपूर्ण विश्वच त्यांचे कुटुंब असते. हे विश्वची माझे घर असे म्हणणारे संत हे उदार मन असणाऱ्या माणसांमध्ये गणले जातात.
In our day to day life, we follow certain values, certain morals that enchance our lifestyle. ‘सूक्तिसुधा’ talks about such values.
In the shloka taken from शाईधरपद्धति the nature of noble and generous people is described. It says that those who consider things as mine and not mine are low-minded. They delimit the things as their own and not belonging to them. But to those who are really generous, the whole earth is like their own family.
Great saints treat the whole universe like their own, they never hesitate to enlighten or help others irrespective of who they are. A person with a big heart is always praised and looked upon for help in any difficult situation. Such people are very hard to find. However, people with an inferior mind or nonassimilative nature are known by their attitude of being self-centered.
4. स्तम्भमेलनं कुरुत |
अ | स्वीयम् | चिन्तनम् | अन्यः | पृथिवी |
आ | गणना | वसुधा | निजः | परः |
उत्तरम् :
अ | स्वीयम् | चिन्तनम् | अन्यः | पृथिवी |
आ | निजः | गणना | परः | वसुधा |
श्लोकः 3
1. एकवाक्येन उत्तरत।
अ. परोपकाराय वृक्षाः किं कुर्वन्ति ?
उत्तरम् : परोपकाराय वृक्षाः फलन्ति ।
आ. परोपकाराय नद्यः किं कुर्वन्ति ?
उत्तरम् : परोपकाराय नद्यः वहन्ति ।
इ. काः परोपकाराय दुहन्ति ?
उत्तरम् : परोपकाराय गाव: दुहन्ति।
ई. शरीरं किमर्थम् ?
उत्तरम् : परोपकारार्थ शरीरम्।
मराठी अनुवाद:
अ. झाडे परोपकारासाठी काय करतात?
उत्तर: झाडे परोपकारासाठी फळे देतात.
आ. नद्या परोपकारासाठी काय करतात?
उत्तर: नद्या परोपकारासाठी पाणी वाहतात.
इ. कोण परोपकारासाठी दूध देतात?
उत्तर: गायी परोपकारासाठी दूध देतात.
ई. शरीराचा उपयोग कशासाठी आहे?
उत्तर: शरीराचा उपयोग परोपकारासाठी आहे.
2. माध्यमभाषया उत्तरत।
परोपकार: नाम किम् ? के परोपकारमग्नाः ?
उत्तरम् :
‘सूक्तिसुधा’ या पद्यपाठामध्ये प्रत्यक्ष आयुष्यात आचरणात आणण्यासाठीचे संदेश सुंदर शब्दांत काव्यात्मकप्रकाराने दिले आहेत. ‘विक्रमोर्वशीयम्’ या नाटकातून घेतलेल्या श्लोकामध्ये परोपकाराचे महत्त्व सांगितले आहे. इतरांना कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता मदत करणे म्हणजे परोपकार. काही व्यक्ती या कायमच दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार करत असतात.
अशा व्यक्तींना आपण संत-महात्मा म्हणून त्यांचा गौरव करतो. प्रस्तुत श्लोकात निसर्गातील उदाहरणे देऊन परोपकाराचे माहात्म्य सांगितले आहेत. वृक्ष इतरांना देण्यासाठीच फळे धारण करतात. त्या फळांच्या बदल्यात ते कशाची अपेक्षा करत नाहीत. नद्या गावोगावांना पाणी पुरवत वाहतात. त्यांचा स्वत:चा त्यात काही वैयक्तिक लाभ नसतो.
गायी इतरांसाठीच दूध देतात. अशाप्रकारे झाडे, नद्या, गायी हे परोपकराचा संदेश नेहमी देत असतात, रोजच्या व्यवहारातील निसर्गाच्या उदाहरणांमधून परोपकाराचे महत्त्व सांगितले आहे.
In the lesson’सूक्तिसुधा’ various shlokas filled with value based messages are given. They teach us many values such as selflessness, charity, knowledge. In the shloka taken from ‘विक्रमोर्वशीयम्’ the greatness of selfless behaviour is emphasized.
परोपकार means helping othersselflessly. To help others and not expecting anything in return is a great virtue. Only noble ones possess such a rare quality. The trees bear fruits for others. They don’t eat the fruits they bear.
The rivers flow for people like us. The cows yield milk for others. They don’t see their benefit in doing so. Likewise, our life is also for helping others. These subhashita gives a message that however busy we may get, we should always spare some time to help others selflessly.
3. एकवचने परिवर्तयत।
अ. वृक्षाः फलन्ति।
उत्तरम् : वृक्षाः परोपकाराय फलन्ति ।
आ. नद्य: वहन्ति ।
उत्तरम् : नद्यः परोपकाराय वहन्ति।
4. समानार्थकशब्द लिखत।
- वृक्ष: – तरुः। (झाड)
- नद्यः – सरित्। (नदी)
- शरीरम् – तनुः, देहः। (शरीर, देह)
5. विरुद्धार्थकशब्द लिखत।
1. उपकार: × अपकारः
2. परः × निजः।
श्लोक: 4
1. रिक्तस्थानं पूरयत।
अ. सत्सङ्गतिः धियः जाड्यं ………..।
आ. सत्सङ्गतिः वाचि ……….. सिञ्चति।
इ. सत्सङ्गतिः ……….. दिशति ।
ई. सत्सङ्गतिः पापम् ……….. ।
उ. सत्सङ्गतिः चित्तं ……….. ।
ऊ. सत्सङ्गति दिक्षु ……….. तनोति।
उत्तरम् :
अ. हरति
आ. सत्यम्
इ. मानोन्नतिम्
ई. अपाकरोति
उ. प्रसादयति
ऊ. कीर्तिम्
मराठी अनुवाद:
अ. हरति (काढते)
आ. सत्यम् (सत्य)
इ. मानोन्नतिम् (मानवृद्धी)
ई. अपाकरोति (नष्ट करते)
उ. प्रसादयति (प्रसन्न करते)
ऊ. कीर्तिम् (कीर्ती)
2. माध्यमभाषया उत्तरत।
सत्सङ्गतिः जीवने किं किं करोति ?
उत्तरम् :
It is said that one is known by the company he keeps. The people around us lay great impact on our life. Company of good people takes away ignorance of the intellect. It makes us truthful. Due to company of good people one gains more respect. Our sins get wiped away when we are surrounded by virtuous people.
It doesn’t only make us happy but also spreads fame in all directions. Company of good people is always desirable. They always pass on the good qualities to everyone they are around. Company of good people is desirable in every aspect.
‘सुसंगति सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो’ असे म्हणतात. सज्जनांच्या संगतीमुळे आपला उद्धार होतो हे खरेच आहे. ‘सूक्तिसुधा’ च्या या श्लोकात हे सांगितले आहे. चांगल्या माणसांच्या संगतीमुळे बुद्धीचे अज्ञान दूर होते. ते सत्याची शिकवण देतात. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे आपल्याला अधिक मान मिळतो.
सद्संगतीमुळे आपल्यातील वाईट वृत्तींचा नाश होतो. त्यामुळे आपण पापांपासून लांब राहतो. सज्जनांबरोबर राहिल्यामुळे वाईट गोष्टी आपल्यापासून आपोआप लांब राहतात आणि मन प्रसन्न राहते. सज्जनांबरोबर राहिल्यामुळे त्यांच्याप्रमाणेच आपली सुद्धा प्रसिद्धी सर्वदूर परसते.
श्लोक: 5
1. सन्धिविग्रहं कुरुत।
- नार्यस्तु – नार्यः + तु।
- यत्रैताः – विग्रह: यत्र + एता |
- एतास्तु – एताः + तु
- तत्राफलाः – तत्र + अफलाः
- सर्वास्तत्राफला: – सर्वाः + तत्र + अफलाः।
2. एकवाक्येन उत्तरत।
अ. देवताः कुत्र रमन्ते ?
उत्तरम् : यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।
आ. क्रियाः कुत्र अफलाः भवन्ति ?
उत्तरम् : यत्र तु एता: न पूज्यन्ते तत्र सर्वाः क्रियाः अफला: (भवन्ति)।
मराठी अनुवाद:
अ. देवता कुठे रममाण होतात?
उत्तर: जिथे स्त्रियांचा आदर केला जातो, तिथे देवता रममाण होतात.
आ. कोणत्या ठिकाणी सर्व क्रिया अपयशी होतात?
उत्तर: जिथे स्त्रियांचा आदर केला जात नाही, तिथे सर्व क्रिया अपयशी होतात.
3. माध्यमभाषया उत्तरत।
1. ‘यत्र नार्यः पूज्यन्ते’। इति सूक्तिं श्लोकस्य आधारेण स्पष्टीकुरुत। (‘यत्र नार्यः पूज्यन्ते’ या सूक्तीचा श्लोकाच्या आधारे अर्थ स्पष्ट करा)
उत्तरम् :
‘सूक्तिसुधा’ पाठामध्ये रोजच्या आयुष्यात आचरणात आणण्यासारखी अशी मूल्ये सांगितली आहेत. महाभारतातील श्लोकामध्ये ‘स्त्रियांचा आदर करावा’ हे त्रिकालाबाधित तत्त्व सांगितले आहे. जिथे स्त्रियांना आदर दिला जातो, तिथे देवता सुद्धा आनंदाने राहतात. मात्र जिथे स्त्रियांचा अनादर होतो तिथे कोणतेही कार्य सफल होत नाही.
ज्या समाजामध्ये स्त्रियांना मानसन्मान मिळतो तो समाज प्रगत समजला जातो. हे तत्त्व आजही लागू होते. ‘देव आनंदाने राहतात’ म्हणजे ते स्थान पवित्र व रम्य मानले जाते. त्या ठिकाणी नेहमी सकारात्मकता, उत्साह राहतो.
In the lesson ‘सूक्तिसुधा’ different values, are taught which we should apply in our life. Averse fromमहाभारत tells an important value to respect women which is absolute irrespective of time or situation. Since ancient times, the scriptures have taught to respect each and every woman.
In this particular shloka, it is said that where the women get respect Gods dwell there happily. But where women are not respected, no action gets accomplished in such place. So respecting women is a sign of good and developed society.
4. एकवचने परिवर्तयत।
अ. नार्यः पूज्यन्ते।
उत्तरम् : यत्र नार्यः पूज्यन्ते
आ. देवताः रमन्ते ।
उत्तरम् : तत्र देवता: रमन्ते।
इ.एता: न पूज्यन्ते ।
उत्तरम् : यत्र तु एता: न पूज्यन्ते
ई.सर्वाः क्रियाः अफलाः।
उत्तरम् : तत्र सर्वाः क्रियाः अफला:
श्लोक: 6
1. सन्धिविग्रहं कुरुत।
अ. चातक: + ………… = चातकस्त्रिचतुरान् ।
आ. सोऽपि = …………… + अपि।
इ. विश्वम् + अम्भसा = ………………
ई. महताम् + ……………… = महतामुदारता।
उत्तरम् :
अ. चातकस्त्रिचतुरान् – चातकः + त्रिचतुरान्।
इ. सोऽपि – सः + अपि।
इ. विश्वमम्भसा – विश्वम् + अम्भसा।
ई. महतामुदारता – महताम् + उदारता।
2. एकवाक्येन उत्तरत।
अ. चातकः पय:कणान् कं याचते ?
उत्तरम् : चातक: पयःकणान् जलधर याचते।
आ. जलधर: केवलं चातकस्य तृष्णां शाम्यति उत सम्पूर्ण विश्वस्य ?
उत्तरम् : जलधर: सम्पूर्णविश्वस्य तृष्णां शाम्यति।
इ. महताम् उदारता कस्य दृष्टान्तेन ज्ञायते ?
उत्तरम् : महताम् उदारता जलधरस्य दृष्टान्तेन ज्ञायते ।
मराठी अनुवाद:
अ. चातक पाण्याचे थेंब कोणाकडून मागतो?
उत्तर: चातक पाण्याचे थेंब ढगाकडून मागतो.
आ. ढग फक्त चातकाची तहान भागवतो की संपूर्ण विश्वाची?
उत्तर: ढग संपूर्ण विश्वाची तहान भागवतो.
इ. उदारतेचा दाखला कोणाच्या उदाहरणाने दिला जातो?
उत्तर: उदारतेचा दाखला ढगाच्या उदाहरणाने दिला जातो.
3. माध्यमभाषया उत्तरत ।
महताम् उदारता श्लोके कथं वर्णिता ?
उत्तरम् :
‘सूक्तिसुधा’ या पद्यामध्ये सुंदर सुभाषिते एकत्र केली आहेत. पूर्वचातकाष्टकम् मधील या श्लोकात उदार लोकांच्या प्रवृत्तीची स्तुती केली आहे. संस्कृत साहित्यामध्ये अशी कविकल्पना आहे की चातक पक्षी हा केवळ पावसाचे पाणी पितो. ढगातून येणारे पाणी पिऊनच तो स्वत:ची तहान भागवतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला तो खूप आतुरतेने काळ्या ढगांची वाट पाहतो व आर्त हाक मारून ढगाकडे पाण्याची याचना करतो.
याच कल्पनेचा आधार घेऊन कवी म्हणतो की तहान भागवण्यासाठी चातकाने ढगाकडे काही थेंबांची याचना केली असताना ढग मात्र संपूर्ण पृथ्वीच पाण्याने चिंब करुन टाकतो, अशा ढगाची व दानतत्पर उदार प्रवृत्तीच्या माणसाच्या वर्तनातील साम्य या श्लोकात ‘अन्योक्ती’ द्वारे कविने सांगितले आहे.
उदार वृत्तीचे लोक सुद्धा एक गोष्ट मागितली असता त्यांच्याकडे असणारे सर्वकाही कुणालातरी द्यावे लागले तरी कशाची पर्वा न करता देऊन टाकतात. कुणालाही मदत करताना ते मनापासून व निरपेक्षपणे करतात. पावसाळी ढगाच्या समर्पक उपमेतून कवीने उदार व्यक्तींचा योग्य गौरव केला आहे.
In the poetry ‘सूक्तिसुधा’ various सुभाषितs conveying very deep and beautiful message are compiled. This shloka from ‘पूर्वचातकाष्टकम्’ tells us the greatness of generous people.
There is a famous poetic concept in literature that a bird called chataka drinks rain water directly from the cloud. It doesn’t drink water stored in the ponds or rives. It is said that in the beginning of rainy season it keeps waiting for the black cloud. Hence poet says when chataka asks for a few drops of water out of thirst, the cloud fills the entire world with water.
The behavior of generous people is compared to the magnanimity of cloud. Just like cloud the generous people are always ready to help others even if they have to go beyond their limits. Even if they are asked for less they give to the fullest. They never hesitate to give away everything they have. comparison between the cloud and generous people is very apt.
4. रूपपरिचयं कुरुत।
- अम्भसा – अम्भस् सकारान्त नाम नपुंसकलिङ्गम् तृतीया विभक्तिः एकवचनम्।
- महताम् – महत् तकारान्त विशेषणम् पुल्लिङ्गम् षष्ठी बहुवचनम्।
- पिपासया – पिपासा आकारान्त नाम स्त्रीलिङ्गम् तृतीया विभक्तिः एकवचनम्।
- पयः – पयस् सकारान्त नाम नपुंसकलिङ्गम् प्रचमा विभक्तिः एकवचनम्।
5. समानार्थकशब्दं योजयित्वा वाक्यं पुनर्लिखत ।
चातकः पयस: कणान् जलधरं याचते।
उत्तरम् :
चातक: जलस्य कणान् मेघ याचते ।
6. अमरकोषपङ्क्तिं लिखत ।
जलधरः, अम्भः
उत्तरम् :
1. जलधरः – अभं मेघो वारिवाहस्तडित्वान् वारिदोऽम्बुभूत्।
2. अम्भः – उदकं जीवनं तोयं पानीयं सलिलं जलम्।
श्लोक: 7
1. माध्यमभाषया उत्तरत।
‘वयं पञ्चाधिकं शतम्’ इति सूक्तिं स्पष्टीकुरुत। (‘वयं पञ्चाधिकं शतम्’ या सूक्तीचा अर्थ स्पष्ट करा.)
उत्तरम् :
In the lesson ‘सूक्तिसुधा’ different important values are practically told through beautiful सुभाषितः In this particular सुभाषित a saying by युधिष्ठिर implies the principle of ‘unity is strength’. Enmity between कौरक and पाण्डक is very famous in history.
When the tugas were in exile, Once the data were attacked by Gandharvas. Some servants who knew that the पाण्डवs were nearby went to युधिष्ठिर for help. Though भीम was against helping कौरव युधिष्ठिर thought otherwise. At that time keeping all the differences aside uses went to their rescue.
During that incident grafter said that we may have many differences among ourselves but when it is war against someone outside the family the hundred कौरक and five पाण्डक are together and they make hundred and five. This also shows family values. As a family we may fight with each other but when it is time to face some external problem the family is always one.
‘सूक्तिसुधा’ सुक्तिासुधा या पद्यामध्ये विविध मूल्ये व तत्त्वे सुंदर शब्दांत मांडली आहेत. प्रस्तुत श्लोकाला महाभारताची पार्श्वभूमी आहे. कौरव व पांडव या भावडांमधील वैर इतिहासात प्रसिद्ध आहे. जेव्हा पांडव वनवासात असताना एकदा कौरव आणि गंधर्वांमध्ये युद्धप्रसंग निर्माण झाला. काही नोकरांनी पांडवांना या प्रसंगाची बातमी दिली.आणि मदतीला येण्याची विनंती केली.
भीम कौरवांना मदत करण्याच्या पूर्ण विरोधात होता. पण युधिष्ठिराने मात्र तसा विचार केला नाही. पांडव आपापसातील वैर बाजूला ठेवून कौरवांच्या मदतीला गेले. त्यावेळी युधिष्ठिर म्हणतो, की आपापसात वैर असताना आम्ही पाच आणि ते शभंर असले तरी जेव्हा परक्याशी युद्धाची वेळ येईल तेव्हा शंभर आणि पाच मिळून आम्ही एकशेपाच आहोत.
या श्लोकामधून ‘एकी हेच बळ’ हा संदेश तर मिळातोच शिवाय कौटुंबिक एकात्मतेचे मूल्य सुध्दा हा श्लोक सांगतो. कुटुंबातील व्यक्तींमध्ये कितीही मतभेद असेल तरी संकटकाळी संपूर्ण कुटुंब एक होऊन त्यावर मात करते.
2. श्लोकात् सप्तम्यन्तपदानि चिनुत लिखत च ।
उत्तरम् :
स्वकीये, विग्रहे, प्राप्ते।
3. श्लोकात् सङ्ख्यावाचकानि चिनुत लिखत च ।
उत्तरम् :
शतम्, पश।
श्लोकः 8
1. सन्धिविग्रहं कुरुत।
प्रश्न 1.
अ. पाठकश्चैव = …………… + च + ।
आ. चान्ये = …………. + अन्ये।।
इ. व्यसनिनो ज्ञेयाः = ……….. + ज्ञेयाः।
ई. क्रियावान्स पण्डितः = क्रियावान् + ………….. + पण्डितः।
उत्तरम् :
अ. पाठकश्चैव – पाठक: + च + एव।
आ. चान्ये – च + अन्ये।
इ. व्यसनिनो ज्ञेया – व्यसनिनः + ज्ञेयाः।
ई. क्रियावान्स पण्डितः – क्रियावान् + स + पण्डितः।
2. एकवाक्येन उत्तरत।
अ. के व्यसनिनः उक्ताः?
उत्तरम् : पठकः, पाठक: शास्त्रवाचका: च व्यसनिन: ज्ञेया: उक्ताः।
आ. क: पण्डितः उच्यते ?
उत्तरम् : यः क्रियावान् स: (एव) पण्डित: उच्यते।
मराठी अनुवाद:
अ. कोण व्यसनी म्हटले आहे?
उत्तर: वाचक, पाठक आणि शास्त्रवाचक हे व्यसनी म्हटले आहेत.
आ. कोणाला पंडित म्हटले जाते?
उत्तर: जो कार्यरत आहे तोच पंडित म्हटला जातो.
3. माध्यमभाषया उत्तरत।
पाण्डित्यं कस्मिन् वर्तते ? यथार्थः पण्डितः कः ?
उत्तरम् :
‘सूक्तिसुधा’ या पाठामधे आचरण्यात आणण्याजोग्या अनेक मूल्यांच्या संदेश सुभाषितांमधून केला आहे. या जगात अनेक लोक अनेक शास्त्रे शिकतात, पदव्या मिळवतात, खूप ज्ञान मिळवात. पण ते सगळेच खरे पंडित नसतात. आपण शिकलेल्या गोष्टी जे व्यवहारात आचरणातसुद्धा आणतात तेच खरे पंडित. केवळ पुस्तके वाचून, पदव्या मिळवून उपयोग नाही. मिळवलेल्या ज्ञानाचा जो प्रत्यक्ष व्यवहारात वापर करतो तोच खरा पंडित होय. मराठीमध्ये ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे’ म्हणतात ते योग्यच आहे.
In the lesson ‘सूक्तिसुधा’various values and principles are conveyed through beautiful सुभाषितः There are so many people who learn so many things in their life. But all of them are not real scholars. Some just learn things theoretically. So their knowledge is limited to theories.
But real firs are those who implement their learnings in their behaviour. There may be thousand of learned people but the real पण्डित/scholar is the one who actually behaves according to what he has learnt. This shloka conveys the message ‘actions speak louder than words.’
4. सुभाषितात् समानार्थकशब्दं लिखत ।
वाचकः, अध्यापकः, शास्त्रविदः, कार्यकर्ता, विद्वान्, बोद्धव्याः।
- पठकः – वाचकः। (वाचक)
- पाठकः – अध्यापकः। (शिक्षक)
- शास्त्रवाचकः – शास्त्रविद्। (शास्त्रज्ञ)
- क्रियावान्- कार्यकर्ता। (काम करणारा)
- पण्डितः – विद्वान्। (शहाणा)
- ज्ञेयाः – बोद्धव्याः। (जाणावे असे)
Leave a Reply