भाषाभ्यास:
1. उचितं पर्यायं चिनुत ।
प्रश्न 1. कस्य धनस्यूत: लुप्त: ? (को धनस्यूत (पैशांची पिशवी) हरवली होती?)
(अ) देवदत्तस्य (देवदत्ताची)
(आ) वीरबलस्य (वीरबलाची)
(इ) भृत्यस्य (भृत्याची)
(ई) नृपस्य (राजाची)
उत्तरम् : (अ) देवदत्तस्य
प्रश्न 2. गृहे कति भृत्याः आसन् ? (देवदत्ताच्या घरी किती नोकर होते?)
(अ) पञ्च (पाच)
(आ) सप्त (सात)
(इ) षड् (सहा)
(ई) एक: (एक)
उत्तरम् : (इ) षड्
प्रश्न 3. वीरबलः कस्य मित्रम् ? (वीरबल कोणाचा मित्र होता?)
(अ) भृत्यस्य (भृत्याचा)
(आ) धनिकस्य (धनिकाचा)
(इ) यष्टिकायाः (यष्टिकेचा)
(ई) चौरस्य (चोराचा)
उत्तरम् : (आ) धनिकस्य
प्रश्न 4. ‘श्व: मम चौर्यं प्रकटितं भवेत्।’ इति चिन्ता कस्य चित्ते जायते? (“उद्यापासून माझी चोरी उघडकीस येईल.” ही चिंता कोणाच्या मनात आली?)
(अ) दासस्य (दासाच्या)
(आ) वीरबलस्य (वीरबलाच्या)
(इ) धनिकस्य (धनिकाच्या)
(ई) नृपस्य (राजाच्या)
उत्तरम् : (अ) दासस्य
2. कः कं वदति ? (कोणी कोणाला काय म्हटले?)
प्रश्न 1. “पश्यन्तु एता: मायायष्टिकाः।” (“पहा, या आहेत जादूच्या काठ्या.”)
उत्तरम् : वीरबल: सेवकान् वदति। (वीरबलाने सेवकांना सांगितले.)
प्रश्न 2. “मित्र, अद्य सायङ्काले तव सर्वान् भृत्यान् मम गृहं प्रेषय।” (“मित्रा, आज संध्याकाळी तुझे सर्व नोकर माझ्या घरी पाठव.”)
उत्तरम् : वीरबल: देवदत्तं वदति। (वीरबलाने देवदत्ताला सांगितले.)
3. माध्यमभाषया उत्तरं लिखत । वीरबलेन चौरः कथं गृहीतः ? (मध्यम भाषेत उत्तर द्या: वीरबलाने चोर कसा पकडला?)
बिरबल हा सम्राट अकबराचा अतिशय चतुर आणि हजरजबाबी मंत्री होता. त्याच्या चातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे ‘सुगृहीत: चौर:’. बिरबलाने स्वत:च्या चातुर्यान कसा चोर पकडला, याबाबत ही गोष्ट आहे. देवदत्त नावाच्या एका श्रीमंत माणसाची पैशाची पिशवी चोरीला गेल्यावर तो आपल्या सेवकांवर संशय घेतो. आपल्या सहा सेवकांपैकीच कोणी एक चोर असणार, याची त्याला खात्री असते. चोराला पकडण्यासाठी तो आपल्या मित्राकडे म्हणजे बिरबलाकडे मदत मागतो. त्यानुसार एके संध्याकाळी बिरबल त्या सहा नोकरांना आपल्या घरी बोलावून समान उंचीची एकेक काठी देतो. त्या काठ्या जादूच्या असून तुमच्यापैकी जो कोणी चोर असेल, त्याची काठी अंगठ्याएवढी लांब होईल, अशी भीतीही दाखवतो. आपापल्या काठ्या घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी यावे असे तो सेवकांना सांगतो. सहापैकी पाच चोर रात्री निश्चिंतपणे झोपतात. मात्र खऱ्या चोराच्या मनात भीती निर्माण होते. आपली काठी अंगठ्याएवढी लांब होऊन आपली चोरी उघडकीस येण्यापेक्षा अगोदरच काठी कापलेली बरी, असा विचार करून तो काठी कापतो. दुसऱ्या दिवशी बिरबल एकच आखूड काठी बघून चोराला ओळखतो आणि त्याला पकडतो. खजील झालेला चोर क्षमा मागतो आणि पैशाची पिशवी परत देतो. माणसाची मानसिकता कशी असते हे बिरबल जाणत होता. चोराच्या मनात चांदणे याचा अर्थ जाणून बिरबलाने सर्व साधले. खरा चोर स्वत:ची चोरी उघडकीस येणार नाही यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. मनुष्याची हीच मानसिकता लक्षात घेऊन बिरबलाने युक्ती केली. अशा प्रकारे केवळ आपल्या युक्तीच्या जोरावर बिरबल चोराला पकडण्यात यशस्वी होतो.
4. स्तम्भमेलनं कुरुत।
उत्तरम् :
विशेषण (गुणधर्म) | विशेष्य (ज्या शब्दाचे वर्णन केले आहे) |
---|---|
समानोन्नतयः (समान उंचीचे) | यष्टिकाः (काठ्या) |
सर्वान् (सर्व) | भृत्यान् (नोकर) |
लुप्तः (हरवलेला) | धनस्यूतः (पैशांची पिशवी) |
गृहीतः (पकडलेला) | चौरः (चोर) |
5. विरुद्धार्थकशब्दानां युग्मं चिनुत लिखत च।
उत्तरम् :
शब्द (अर्थ) | विरुद्धार्थी शब्द (उलट अर्थ) |
---|---|
पूर्वम् (पूर्वी) | पश्चात् (नंतर) |
गताः (गेलेले) | आगताः (आलेले) |
दीर्घा (लांब) | हस्वा (लहान) |
जागृतः (जागा) | सुप्तः (झोपलेला) |
भृत्यः (नोकर) | स्वामी (मालक) |
धनिकः (श्रीमंत) | दरिद्रः (गरीब) |
6. पाठात् समानार्थक शब्दं चित्वा रेखाचित्रं पूरयत ।
उत्तरम् :
शब्द | समानार्थी शब्द (पर्यायवाची) |
---|---|
धनिकः (श्रीमंत) | वित्तवान्, धनाढ्यः |
चौरः (चोर) | दस्युः, स्तेनः |
सुप्तः (झोपलेला) | निद्रितः, शयानः |
भृत्यः (नोकर) | सेवकः, दासः |
Leave a Reply