भारताची सुरक्षा व्यवस्था
स्वाध्याय
1. योग्य पर्याय निवडा:
उत्तर: (१) भारताचे (ब) राष्ट्रपती हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.
(२) भारताच्या सागरी किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी (ब) तटरक्षक दल यांच्यावर असते.
(३) विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी (क) एन.सी.सी. ची स्थापना करण्यात आली.
2. पुढील विधाने चूक की बरोबर ते कारणासहित स्पष्ट करा.
उत्तर:
(१) मानव सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे. – बरोबर, कारण दहशतवाद लोकांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण करतो.
(२) प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते. – बरोबर, कारण राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य असते.
(३) भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत. – चूक, कारण काश्मीर प्रश्न, सीमावाद, घुसखोरी आणि पाणीवाटपाचे वाद आहेत.
3. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर:
(१) जलद कृती दलाचे कार्य – दहशतवादी हल्ले, दंगे, बाँबस्फोट यांसारख्या आपत्तींमध्ये जलद कृती दल वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे काम करते.
(२) मानव सुरक्षा – नागरिकांना निरक्षरता, दारिद्र्य, रोगराई, प्रदूषण, दहशतवाद यांसारख्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवणे म्हणजे मानव सुरक्षा.
(३) गृहरक्षक दल – नैसर्गिक आपत्ती, दंगल, सार्वजनिक सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करणारे दल.
4.पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींमुळे धोका निर्माण होतो?
उत्तर:
- बाह्य आक्रमणे
- सीमावाद
- दहशतवाद
- नक्षलवादी चळवळ
- आंतरराष्ट्रीय राजकीय तणाव
(२) सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा.
उत्तर:
- सीमारेषेचे रक्षण करणे
- तस्करी रोखणे
- गस्त घालणे
- घुसखोरी थांबवणे
(३) मानव सुरक्षा म्हणजे काय?
उत्तर: नागरिकांचे शिक्षण, आरोग्य, मूलभूत गरजा, सुरक्षितता, आणि विकासाच्या संधींचे संरक्षण करणे म्हणजे मानव सुरक्षा.
5. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
१. सुरक्षा दलांविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा.
सुरक्षा दलाचे नाव | कार्य | प्रमुख | सध्याचे कार्यरत प्रमुखाचे नाव |
---|---|---|---|
भूदल | भारताच्या भूसीमेचे रक्षण करणे | जनरल | मनोज पांडे |
नौदल | भारताच्या समुद्री सीमांचे रक्षण करणे | अॅडमिरल | आर. हरि कुमार |
हवाई दल | भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करणे | एअर चीफ मार्शल | वी. आर. चौधरी |
२. भारताच्या सुरक्षितेतील आव्हाने पुढील संकल्पना चित्राच्या सहाय्याने दाखवा.
सीमा सुरक्षा धोके (Border Security Threats) – पाकिस्तान, चीन यांसारख्या शेजारील देशांशी तणाव, घुसखोरी, सीमावाद.
दहशतवाद (Terrorism) – आंतरराष्ट्रीय व स्थानिक दहशतवादी गटांकडून होणारे हल्ले.
सायबर हल्ले (Cyber Threats) – सायबर गुन्हेगारी, डेटा चोरी, हॅकिंग.
अंतर्गत बंडखोरी (Internal Insurgency) – नक्षलवाद, माओवाद आणि इतर विद्रोही चळवळी.
Leave a Reply