भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
परराष्ट्र धोरण म्हणजे काय?
- प्रत्येक देशाला इतर देशांशी संबंध ठेवावे लागतात.
- कोणत्या देशाशी मैत्री करायची, कोणत्या देशाशी व्यावसायिक संबंध ठेवायचे, हे ठरवणे म्हणजेच परराष्ट्र धोरण.
- परराष्ट्र धोरण देशाच्या हिताच्या दृष्टीने आखले जाते.
राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण
- राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे देशाच्या सुरक्षेसाठी व विकासासाठी उचललेली पावले.
- परराष्ट्र धोरण हे राष्ट्रीय हितसंबंध पूर्ण करण्याचे साधन असते.
- संरक्षण आणि आर्थिक विकास या दोन गोष्टींवर परराष्ट्र धोरण मोठ्या प्रमाणात अवलंबून असते.
परराष्ट्र धोरण ठरवणारे घटक
- भौगोलिक स्थान – देशाच्या सीमा, शेजारी राष्ट्रे, नैसर्गिक संसाधने यांचा विचार केला जातो.
- राजकीय व्यवस्था – लोकशाही किंवा हुकूमशाही यावर धोरण अवलंबून असते.
- अर्थव्यवस्था – मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या देशांचे धोरण स्वतंत्र व प्रभावी असते.
- राजकीय नेतृत्व – देशाच्या नेत्यांच्या विचारांनुसार धोरण बदलू शकते.
- प्रशासकीय यंत्रणा – परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि राजदूत परराष्ट्र धोरण राबवतात.
भारताचे परराष्ट्र धोरण
- स्वातंत्र्यानंतर भारताने स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखले.
- भारतीय संविधानातील कलम ५१ नुसार, भारताने शांतता, न्याय, आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान आणि मित्रत्वाचे संबंध जोपासावेत असे नमूद आहे.
- भारताचे धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क आणि सुरक्षिततेवर आधारित आहे.
भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टे
- शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवणे.
- भारताच्या सीमा सुरक्षित ठेवणे.
- भारतीय नागरिकांचे हित जपणे.
- भारताचा आर्थिक विकास करणे.
भारताच्या परराष्ट्र धोरणाचा इतिहास
पहिला टप्पा (1947-1990)
- पंडित नेहरूंनी अलिप्ततावाद धोरण राबवले (कोणत्याही मोठ्या शक्तीच्या गटात न सामील होणे).
- शेजारी देशांशी सहकार्य वाढवले.
- पाकिस्तान आणि चीनशी युद्ध झाले.
- 1974 मध्ये पहिली अणुचाचणी पोखरण येथे करण्यात आली.
दुसरा टप्पा (1991-आजपर्यंत)
- भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली.
- अमेरिका, युरोप, चीन, जपान यांच्याशी व्यापार आणि सहकार्य वाढवले.
- 1998 मध्ये दुसरी अणुचाचणी झाली.
- G-20 सारख्या आंतरराष्ट्रीय गटांमध्ये भारताचा सहभाग वाढला.
भारताचे आण्विक धोरण
1974 आणि 1998 मध्ये भारताने अणुचाचण्या केल्या.
भारताने अण्वस्त्र धारण केले असले तरी “प्रथम वापर न करण्याचे” धोरण स्वीकारले आहे.
अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (NPT) भारताने स्वाक्षरी केली नाही.
Leave a Reply