स्वाध्याय
प्रश्न १: तुलना करा.
शाळेतील प्रीतम | सेकंड लेफ्टनंट प्रीतम |
---|---|
1. एकलकोंडा, अबोल आणि कुणाशीही न मिसळणारा. | 1. आत्मविश्वासू, देखणा आणि शिस्तबद्ध. |
2. मराठी नीट समजत नसल्याने अभ्यासात कमजोर. | 2. शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर एन.डी.ए.मध्ये प्रवेश मिळवला. |
3. मामाच्या घरात उपेक्षित वाटणारा मुलगा. | 3. कॅप्टन लुथरा म्हणून सन्मान मिळवणारा यशस्वी अधिकारी. |
4. बाईंच्या प्रेमाने आणि शिकवणीने हळूहळू प्रगती करणारा. | 4. आपल्या गुरुंना आईसमान मानणारा संवेदनशील व्यक्ती. |
प्रश्न २: कारणे लिहा.
(अ) प्रीतमला मराठी नीट येत नसे, कारण…
- त्याने लहानपणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेत शिक्षण घेतले होते.
- तो आधी पंजाबीत शिकला, मग बंगालमध्ये गेला आणि नंतर मराठीत शिकू लागला.
(आ) पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते, कारण…
- लेखिकेलाही वडील नव्हते आणि तीही आईसोबत एकटी राहायची.
- त्यामुळे दोघांमध्ये भावनिक नाते तयार झाले आणि लेखिका त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायला लागली.
प्रश्न ३: प्रतिक्रिया लिहा.
(अ) प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्याच्या वर्गशिक्षकांची प्रतिक्रिया –
- “तुला नीट मराठी लिहिता येत नाही? तुझ्या आई-वडिलांना मला भेटायला बोलव.”
- “तू दिवसेंदिवस आळशी होत चालला आहेस. तुझ्या पालकांना हे कळायलाच हवे.”
(आ) अबोल प्रीतम भडभड बोलल्यानंतर वर्गशिक्षकांची प्रतिक्रिया –
- “माझ्या काळजात काहीतरी हलले.”
- “मी त्याला जवळ घेतले आणि त्याच्या परिस्थितीची जाणीव झाली.”
प्रश्न ४: लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळवणी करा.
लेखिकेच्या कृती | गुण |
---|---|
(अ) बाईंनी प्रीतमला जवळ घेतले. | संवेदनशीलता |
(आ) बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले. | ममत्व |
(इ) प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या. | सन्मानभावना |
(ई) एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला. | निरीक्षणशक्ती |
प्रश्न ५: प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्ये शोधा व लिहा.
- “बाई, माझे वडील सैन्यात जवान आहेत. ते दूर सरहद्दीवर असतात.”
- “चार वर्षांपूर्वी माझी आई वारली.”
- “मी नापास झालो तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगमध्ये ठेवणार.”
- “बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवले आहे.”
- “माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून मी आईच्या बांगड्या आणि अत्तर तुम्हाला दिले.”
प्रश्न ६: खालील वाक्यांशांचा योग्य अर्थ लिहा.
(अ) रया जागे – शोभा येणे.
(आ) संजीवनी मिळणे – जीवनदान मिळणे.
प्रश्न ७: कंसात दिलेल्या सूचनांप्रमाणे वाक्यांचे रूपांतर करा.
1. मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. (आज्ञार्थी करा.)
- आईवडिलांची आज्ञा पाळा.
2. हा तलाव अतिशय सुंदर आहे. (उद्गारार्थी करा.)
- वा! हा तलाव किती सुंदर आहे!
3. बापरे! रस्त्यावर केवढी ही गर्दी! (विधानेार्थी करा.)
- रस्त्यावर खूप गर्दी आहे.
4. नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)
- नेहमी खोटे बोलू नये.
प्रश्न ८: स्वमत लिहा.
(अ) प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधांविषयी तुमचे मत –
- ही कथा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील हृदयस्पर्शी नात्याचे उत्तम उदाहरण आहे.
- लेखिकेने प्रीतमला केवळ शिकवले नाही, तर त्याला आत्मविश्वास दिला आणि आईसारखे प्रेम दिले.
- त्यामुळेच प्रीतम पुढे मोठा अधिकारी होऊनही आपल्या बाईंना कधी विसरला नाही.
(आ) तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान स्पष्ट करा.
- शिक्षक हा फक्त अभ्यास शिकवणारा नसतो, तो विद्यार्थ्याचा मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत असतो.
- चांगले शिक्षक विद्यार्थ्याला यशाच्या दिशेने मार्गदर्शन करतात आणि आत्मविश्वास वाढवतात.
- जसे प्रीतमच्या आयुष्यात त्याच्या बाई होत्या, तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे महत्त्व अमूल्य असते.
Leave a Reply