विज्ञान व तंत्रज्ञान
स्वाध्याय
1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
उत्तर: (१) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ.होमी भाभा यांची नेमणूक झाली.
(२) इस्रोने पूर्णत: भारतात तयार केलेला अपल हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
उत्तर: चुकीची जोडी (२) अग्नी – जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र. आहे.
(अग्नी हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.)
2. (अ) भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा.:
उत्तर: १९६१ ते १९७० – भारताच्या पहिल्या अम्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण
१९७१ ते १९८० – ‘आर्यभट्ट’ उपग्रहाचे प्रक्षेपण
१९८१ ते १९९० – ‘अपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण
१९९१ ते २००० – दूरसंचार विभागातील पुनर्रचना
(ब) टिपा लिहा.
(१) अवकाश संशोधन: भारताने १९६९ मध्ये ‘इस्रो’ ची स्थापना करून अवकाश संशोधनाला सुरुवात केली. उपग्रह प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथे केंद्र स्थापन केले गेले.
(२) टेलेक्स सेवा: १९६३ मध्ये भारतात टेलेक्स सेवा सुरू झाली. १९६९ मध्ये देवनागरी लिपीतून ही सेवा उपलब्ध झाली.
(३) पोखरण अणुचाचणी: भारताने १९७४ आणि १९९८ मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे अणुचाचण्या केल्या.
(४) भास्कर-१ उपग्रह: १९७९ मध्ये भारताने ‘भास्कर-१’ हा उपग्रह सोव्हिएत रशियाच्या मदतीने अवकाशात पाठवला.
3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) पं. नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली:
उत्तर: पं. नेहरूंना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून देशाचा विकास करायचा होता. म्हणून १९४८ मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.
(२) भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला:
उत्तर: भारताने शांततेसाठी अणुऊर्जा वापरण्याच्या धोरणानुसार आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अणुचाचणी केली.
(३) अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले:
उत्तर: भारताने १९७४ मध्ये अणुचाचणी केल्यानंतर अमेरिका व इतर देशांनी भारतावर आर्थिक निर्बंध लादले.
4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो?
उत्तर: टीव्ही आणि मोबाइल नेटवर्कसाठी उपग्रह तंत्रज्ञान उपयोगी पडते.
हवामान अंदाज, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यासाठी उपग्रह मदत करतात.
इंटरनेट, जीपीएस आणि टेलिमेडिसीनमध्ये उपग्रहांचा मोठा वाटा आहे.
(२) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ असे का संबोधले जाते?
उत्तर: डॉ. कलाम यांनी भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात मोठे योगदान दिले. त्यांनी अग्नी, पृथ्वी, नाग आणि आकाश यांसारख्या क्षेपणास्त्रांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली, म्हणून त्यांना ‘मिसाईल मॅन’ म्हटले जाते.
(३) संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते?
उत्तर: रेल्वे आरक्षणासाठी ऑनलाईन IRCTC वेबसाईट किंवा रेल्वे स्टेशनवरील संगणकीकृत यंत्रणेचा वापर करून आरक्षण करता येते. प्रवाशाला प्रवासाची तारीख, गाडीचे नाव, प्रवासाचे स्थान भरून तिकीट आरक्षित करता येते.
(४) कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा.
उत्तर: ७६० कि.मी. लांबीचा मार्ग
९२ बोगदे आणि १७९ मोठे पूल
भूस्खलन टाळण्यासाठी आधुनिक सेन्सर्सचा वापर
समुद्रकिनारी व डोंगराळ भागातून जाणारा सुंदर मार्ग
Leave a Reply