आर्थिक विकास
स्वाध्याय
१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
उत्तर: (१) १९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख (ब) १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
(२) वीस कलमी कार्यक्रमाची (क) इंदिरा गांधी यांनी घोषणा केली.
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
उत्तर: चुकीची जोडी (१) कावसजी दावर – पोलादाचा कारखाना आहे.
(योग्य उत्तर: कावसजी दावर – कापड गिरणी)
२. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा
पुढील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
पंचवार्षिक योजना | कालावधी | उद्दिष्टे |
---|---|---|
पहिली | १९५१-१९५६ | शेती, सामाजिक विकास |
दुसरी | १९५६-१९६१ | औद्योगिकीकरण |
तिसरी | १९६१-१९६६ | विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ |
चौथी | १९६९-१९७४ | शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंबनियोजन… |
पाचवी | १९७४-१९७९ | दारिद्र्य निर्मूलन, स्वावलंबन, सामाजिक न्याय |
(ब) टीपा लिहा:
उत्तर:
(१) मिश्र अर्थव्यवस्था:
भारताने स्वतंत्रतेनंतर भांडवलशाही व समाजवादी या दोन्ही प्रकारच्या अर्थव्यवस्थेतील चांगल्या बाबी आत्मसात करून मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. यात सार्वजनिक, खासगी व संलग्न क्षेत्रांचा समावेश आहे. सरकार मोठे उद्योग, पायाभूत सुविधा, संरक्षण, शिक्षण, आरोग्य यांमध्ये गुंतवणूक करते, तर खासगी उद्योग उपभोग्य वस्तू, सेवा क्षेत्रात कार्यरत असतात.
(२) वीस कलमी कार्यक्रम:
१ जुलै १९७५ रोजी इंदिरा गांधींनी वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये शेती सुधारणा, कामगार हक्क, दारिद्र्य निर्मूलन, शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दर नियंत्रणासारख्या बाबींचा समावेश होता.
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.
उत्तर: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणती अर्थव्यवस्था स्वीकारावी यावर विचार सुरू होता. पंडित नेहरूंनी भांडवलशाही व समाजवादाचा समतोल साधणारी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. या व्यवस्थेमुळे मोठे उद्योग सरकारच्या अखत्यारीत राहिले, तसेच खासगी उद्योगांनाही वाव मिळाला. या निर्णयामुळे भारताच्या आर्थिक विकासाला गती मिळाली.
(२) १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
उत्तर: भारताच्या आर्थिक विकासासाठी पतपुरवठा गरजेचा होता. परंतु, त्या काळातील बँका मुख्यतः मोठ्या उद्योजकांनाच कर्ज पुरवत होत्या. गरिबांसाठी आणि लघु उद्योगांसाठी पतपुरवठा वाढावा यासाठी १९ जुलै १९६९ रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. यामुळे लघुउद्योग, शेती व गरिबांसाठी कर्जसुविधा उपलब्ध झाल्या.
(३) गिरणी कामगार संपावर गेले.
उत्तर: १९८२ मध्ये मुंबईतील गिरणी कामगार मोठ्या प्रमाणावर संपावर गेले. वेतनवाढ, बोनस आणि इतर सुविधा न मिळाल्यामुळे गिरणी कामगारांनी दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली संप पुकारला. हा संप एक वर्षाहून अधिक काळ टिकला. त्यामुळे मुंबईतील गिरण्या बंद पडल्या आणि अनेक कामगार बेरोजगार झाले.
४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
उत्तर:
(१) आठव्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेले कार्यक्रम:
आठवी पंचवार्षिक योजना (१९९२-१९९७) मध्ये खासगी क्षेत्राला अधिक वाव देण्यात आला. योजनेच्या अंतर्गत पुढील कार्यक्रम हाती घेण्यात आले:
- प्रधानमंत्री रोजगार योजना
- महिला समृद्धी योजना
- राष्ट्रीय सामाजिक, आर्थिक साहाय्य योजना
- मध्यान्ह आहार योजना
- इंदिरा महिला योजना
- गंगा कल्याण योजना
योजनेंतर्गत लोकसंख्या नियंत्रण, निरक्षरता निर्मूलन आणि प्राथमिक शिक्षणाचा प्रसार यावर भर देण्यात आला.
(२) दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेले प्रकल्प:
दुसरी पंचवार्षिक योजना (१९५६-१९६१) ही भारताच्या औद्योगिकीकरणासाठी महत्त्वाची होती. या योजनेत खालील प्रकल्प हाती घेण्यात आले:
दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथे पोलाद उद्योग
सिंद्री येथे रासायनिक खतांचा कारखाना
चित्तरंजन येथे रेल्वे इंजिन उत्पादन प्रकल्प
विशाखापट्टणम येथे जहाजबांधणी प्रकल्प
भाक्रा-नांगल आणि दामोदर धरण प्रकल्प
या योजनांमुळे भारतातील औद्योगिक आणि कृषी उत्पादन वाढीस लागले.
Leave a Reply