शैक्षणिक वाटचाल
१. भारतातील शिक्षणाचा इतिहास व वाढ
- भारतात शिक्षण व्यवस्थेचा विकास स्वतंत्र भारतानंतर मोठ्या प्रमाणात झाला.
- 1951 मध्ये पहिल्या जनगणनेत साक्षरता फक्त 17% होती.
- पुढील वर्षांमध्ये ती वाढली:
- 1972: 34%
- 1981: 43%
- 1991: 52%
- 2001: 64%
२. प्राथमिक शिक्षण (6 ते 14 वर्षे)
- शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी 1988 मध्ये ‘खडू-फळा’ (ऑपरेशन ब्लॅक बोर्ड) योजना सुरू.
- मुलांसाठी शाळा, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, शिक्षण साहित्य पुरवले.
- 1995 मध्ये “मध्यान्ह भोजन योजना” सुरू केली.
३. माध्यमिक शिक्षण
- मुदलियार आयोग (1952-53): माध्यमिक शिक्षणाचा अभ्यास केला.
- कोठारी आयोग (1964): 10+2+3 शिक्षण पद्धत लागू केली.
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (1966 मध्ये स्थापना).
४. उच्च शिक्षण
- राधाकृष्णन आयोग (1948): विद्यापीठ शिक्षणाच्या सुधारणा.
- विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) स्थापन.
- NCERT (1961): शालेय अभ्यासक्रम सुधारणा आणि प्रशिक्षणासाठी.
- MSCERT (1984, पुणे): शिक्षकांसाठी प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम नियोजन.
५. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (1986)
- समान शिक्षण हक्काची संधी.
- 1995 मध्ये क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम.
६. तंत्रज्ञान व संशोधन संस्थां
- CSIR (1950): वैज्ञानिक संशोधन.
- IIT (1951): अभियांत्रिकी शिक्षणासाठी.
- IIM (1961): व्यवस्थापन शिक्षणासाठी.
- C-DAC (1988, पुणे): भारताचा पहिला महासंगणक “परम-8000”.
- ISRO: 1975 मध्ये शिक्षणासाठी उपग्रह वापर (SITE प्रकल्प).
७. वैद्यकीय संशोधन
- ICMR (1949): विविध रोगांवरील संशोधन.
- AIIMS (1956): वैद्यकीय शिक्षण व संशोधन.
- TATA कर्करोग संशोधन संस्था: कर्करोग उपचार व संशोधन.
८. कृषी संशोधन
- भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI, 1958): नवीन पद्धती व शेतीसंबंधी संशोधन.
- शेतकऱ्यांसाठी सुधारित पद्धती व अधिक उत्पादनाच्या संशोधनावर भर.
Leave a Reply