बदलते जीवन : भाग १
लहान प्रश्न
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता मोठा बदल घडवून आणला?
उत्तर: भारतीय संविधानाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा केल्या.
2. १९७८ मध्ये रेल्वेतील कोणत्या वर्गाची व्यवस्था रद्द करण्यात आली?
उत्तर: तृतीय श्रेणी.
3. स्वातंत्र्यपूर्व भारतात कोणती कुटुंबपद्धती प्रचलित होती?
उत्तर: एकत्र कुटुंबपद्धती.
4. भारत सरकारने समाजकल्याण खाते कधी स्थापन केले?
उत्तर: १४ जून १९६४.
5. भारतात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया कोठे झाली?
उत्तर: वेल्लूर, तमिळनाडू.
6. १९७८ मध्ये कोणत्या तंत्रज्ञानाच्या मदतीने अपत्यप्राप्ती शक्य झाली?
उत्तर: टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान.
7. जयपूर फूट’चे संशोधक कोण होते?
उत्तर: डॉ. प्रमोद सेठी आणि रामचंद्र शर्मा.
8. १९९५ मध्ये कोणत्या लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली?
उत्तर: पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.
9. शहरातील वाढीव लोकसंख्येमुळे कोणती समस्या निर्माण होते?
उत्तर: नागरीकरण आणि संसाधनांवर ताण.
10. ग्रामीण विद्युतीकरणासाठी कोणता निगम स्थापन करण्यात आला?
उत्तर: ग्रामीण विद्युतीकरण निगम.
दीर्घ प्रश्न
1. संविधानानुसार कोणत्या बाबतीत भेदभाव करण्यास मनाई आहे?
उत्तर: धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावर आधारित कोणताही भेदभाव करता येत नाही.
2. समाजकल्याण कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
उत्तर: पूर्ण रोजगार, शिक्षण, आरोग्यसेवा आणि सामाजिक समानता सुनिश्चित करणे.
3. ग्रामीण विकासासमोरील प्रमुख आव्हाने कोणती आहेत?
उत्तर: शेती सुधारणा, जलसिंचन वाढ, शिक्षणाचा प्रसार आणि मूलभूत सुविधा पुरवणे.
4 .सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारताने कोणती प्रगती केली?
उत्तर: लसीकरण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, ओपन हार्ट शस्त्रक्रिया आणि जयपूर फूट संशोधन.
5 .शहरीकरण थांबवण्यासाठी कोणते उपाय आहेत?
उत्तर: ग्रामीण भागात रोजगार संधी वाढवणे, नागरी सुविधा सुधारणे आणि स्थलांतर रोखणे.
Leave a Reply