विज्ञान व तंत्रज्ञान
लहान प्रश्न
1. भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना केव्हा झाली?
उत्तर: १० ऑगस्ट १९४८
2. पहिली भारतीय अणुभट्टी कोणती होती?
उत्तर: अप्सरा
3. १९७४ मध्ये पोखरणमध्ये कोणती ऐतिहासिक चाचणी झाली?
उत्तर: पहिली अणुचाचणी
4. १९८७ मध्ये स्थापन झालेल्या अणुऊर्जा उत्पादन कंपनीचे नाव काय?
उत्तर: न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL)
5. ‘मिसाईल मॅन’ म्हणून कोण ओळखले जातात?
उत्तर: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
6. कोणत्या संस्थेने ‘रोहिणी-७५’ अम्निबाणाचे प्रक्षेपण केले?
उत्तर: इस्रो (ISRO)
7. इन्सॅट-१ बी उपग्रहाचे प्रक्षेपण कधी झाले?
उत्तर: ऑगस्ट १९८३
8. कोणत्या उपग्रहामुळे शिक्षण आणि दूरसंचार सुविधा सुधारल्या?
उत्तर: अँपल
9. पहिली संगणकीकृत रेल्वे आरक्षण सेवा कोठे सुरू झाली?
उत्तर: दिल्ली (१९८४)
10. कोकण रेल्वे किती किलोमीटर लांब आहे?
उत्तर: सुमारे ७६० किलोमीटर
दीर्घ प्रश्न
1. पं. नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना का केली?
उत्तर: वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून देशाचा विकास साधण्यासाठी त्यांनी १९४८ मध्ये भारतीय अणुऊर्जा आयोग स्थापन केला.
2. १९९८ मध्ये भारताने पोखरण येथे अणुचाचणी का केली?
उत्तर: भारताच्या सुरक्षिततेसाठी आणि अण्वस्त्र सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली चाचणी घेण्यात आली.
3. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे क्षेपणास्त्र विकासातील योगदान काय आहे?
उत्तर: त्यांनी ‘अग्नी’ आणि ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्र विकासात महत्त्वाची भूमिका बजावली, म्हणून त्यांना ‘मिसाईल मॅन’ म्हटले जाते.
4. इन्सॅट उपग्रह मालिकेचा भारताच्या दूरसंचार क्षेत्रावर काय परिणाम झाला?
उत्तर: इन्सॅटमुळे भारतात दूरसंचार, दूरदर्शन, हवामान अंदाज, टेलिमेडिसिन आणि आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था सुधारली.
5. कोकण रेल्वेच्या बांधकामात कोणत्या तांत्रिक अडचणी आल्या?
उत्तर: दरडी कोसळणे, मोठे पूल बांधणे आणि ९२ बोगदे खोदणे या प्रमुख अडचणी होत्या, तरीही यशस्वीपणे काम पूर्ण झाले.
Leave a Reply