इतिहासाची साधने
लहान प्रश्न
1. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे?
उत्तर: नवी दिल्ली
2. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया कोणत्या वर्षी स्थापन झाले?
उत्तर: 1953
3. टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे संस्थापक कोण होते?
उत्तर: जाल कूपर
4. वृत्तपत्रांना काय म्हटले जाते?
उत्तर: लोकशाहीचा चौथा स्तंभ
5. इतिहासाच्या अभ्यासासाठी कोणकोणती साधने असतात?
उत्तर: लिखित, भौतिक, मौखिक, दृक-श्राव्य
6. “INDIA 2000” हा संदर्भग्रंथ कोण प्रकाशित करते?
उत्तर: माहिती व प्रसारण खाते
7. नाणी कोठून छापली जातात?
उत्तर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
8. महाराष्ट्रातील प्रसिद्ध वस्तुसंग्रहालय कोणते?
उत्तर: छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई
9. मौखिक साधनांमध्ये कोणता प्रकार येतो?
उत्तर: लोककथा, पोवाडे, ओव्या
10. “FTII” म्हणजे काय?
उत्तर: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
लांब प्रश्न
1. लिखित साधने कोणती असतात आणि त्यांचा इतिहासात कसा उपयोग होतो?
उत्तर: वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, पत्रव्यवहार यांचा समावेश होतो. ही साधने ऐतिहासिक घडामोडींचा दस्तऐवज म्हणून वापरली जातात.
2. भौतिक साधनांत कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो?
उत्तर: नाणी, अलंकार, प्रार्थनास्थळे, वस्तुसंग्रहालये, राजमुद्रा यांचा समावेश होतो. यांचा अभ्यास करून तत्कालीन समाजाची माहिती मिळते.
3. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया कोणत्या प्रकारची सेवा पुरवते?
उत्तर: पीटीआय वृत्तपत्रांना लेख, छायाचित्रे, वैज्ञानिक व आर्थिक माहिती पुरवते. 1990 मध्ये त्यांनी उपग्रह तंत्रज्ञानाद्वारे बातम्या पाठवायला सुरुवात केली.
4. टपाल तिकीटांचा इतिहासात कसा उपयोग केला जातो?
उत्तर: टपाल तिकिटांवर ऐतिहासिक नेते, महत्त्वाच्या घटना, वारसा यांचे चित्रण असते. त्यामुळे त्या काळाची झलक अभ्यासता येते.
5. दृक-श्राव्य साधने इतिहासासाठी कशी उपयुक्त ठरतात?
उत्तर: चित्रपट, दूरदर्शन, डॉक्युमेंटरी, आंतरजाल यामुळे घटनांची दृश्य स्वरूपात नोंद होते. त्यामुळे इतिहास अभ्यासणे सोपे होते.
Leave a Reply