सागरजलाचे गुणधर्म
1. तापमान
सागरजलाचे तापमान सर्वत्र सारखे नसते.
विषुववृत्ताजवळ पाणी गरम (सुमारे 25°C), मध्य अक्षांशावर थंड (16°C) आणि ध्रुवीय भागात अधिक थंड (2°C) असते.
सागर प्रवाह, वादळे, लाटा, प्रदूषण यामुळे तापमान बदलते.
2000 मीटर खोलीनंतर तापमान साधारण 4°C असते.
महत्वाचे:
जास्त खोलीतील पाणी कधीच गोठत नाही.
उष्ण प्रवाह तापमान वाढवतात, तर थंड प्रवाह तापमान कमी करतात.
2. क्षारता (Salinity)
सागरजलातील क्षार पदार्थांमुळे खारट असते.
1000 ग्रॅम सागरजलात 35 ग्रॅम क्षार (35‰) असतात.
बाष्पीभवन जास्त आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असलेल्या ठिकाणी क्षारता जास्त असते (उदा. मृत समुद्र – 332‰).
गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त असलेल्या भागात क्षारता कमी असते (उदा. बाल्टिक समुद्र – 7‰).
महत्वाचे:
समुद्रातील क्षार एकत्र केल्यास 150 मीटर जाडीचा थर बनेल.
भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर क्षारता जास्त आहे.
3. घनता (Density)
तापमान कमी असेल तर घनता जास्त होते.
क्षारता जास्त असेल तर पाणी जड (घन) होते.
500 मीटर खोलीपर्यंत घनतेत बदल दिसतो, नंतर ती स्थिर राहते.
महत्वाचे:
मृत समुद्रात जास्त क्षारतेमुळे पाण्यात बुडण्याचा धोका नाही.
Leave a Reply