अंतर्गत हालचाली
लहान प्रश्न
1. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात?
उत्तर: रिश्टर स्केल
2. भूकंपाच्या ऊर्जा केंद्राला काय म्हणतात?
उत्तर: भूकंपनाभी
3. ज्वालामुखीमधून बाहेर पडणाऱ्या तप्त शिलारसाला काय म्हणतात?
उत्तर: लाव्हारस
4. जगातील सर्वांत उंच वली पर्वत कोणता आहे?
उत्तर: हिमालय
5. भूकंप लहरींमधील सर्वांत वेगवान लहरी कोणत्या असतात?
उत्तर: प्राथमिक लहरी
6. ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या घटकामुळे होतो?
उत्तर: उष्णता व दबाव
7. पृथ्वीवर एकूण किती प्रमुख भूपट्ट आहेत?
उत्तर: सात
8. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे?
उत्तर: बॅरन बेट
9. त्सुनामी लाटा कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण होतात?
उत्तर: भूकंप आणि ज्वालामुखी
10. मेघालय पठार कोणत्या प्रकारच्या भू-हालचालींमुळे तयार झाले?
उत्तर: खंडनिर्माणकारी हालचाली
लांब प्रश्न
1. भूकंप कशामुळे होतो?
उत्तर: पृथ्वीच्या आत असलेल्या हालचालींमुळे, भूपट्टांची घर्षण क्रिया, दाब आणि ताण यामुळे भूकंप होतो.
2. भूकंपाच्या लहरींचे मानवी जीवनावर काय परिणाम होतात?
उत्तर: इमारती कोसळतात, वाहतूक ठप्प होते, जीवितहानी होते आणि त्सुनामीसारख्या आपत्ती निर्माण होतात.
3. वली पर्वत आणि गट पर्वत यामधील मुख्य फरक काय?
उत्तर: वली पर्वत दाबामुळे घड्या पडून तयार होतात (उदा. हिमालय), तर गट पर्वत तडे पडून वर उचलल्या गेलेल्या भागामुळे बनतात (उदा. ब्लॅक फॉरेस्ट).
4. प्राथमिक आणि दुय्यम भूकंपलहरींमध्ये काय फरक असतो?
उत्तर: प्राथमिक लहरी वेगवान असतात व घन-द्रव-गॅस मधून जातात, तर दुय्यम लहरी फक्त घन पदार्थांमधून जातात व अधिक विध्वंसक असतात.
5. ज्वालामुखी किती प्रकारचे असतात?
उत्तर: केंद्रीय ज्वालामुखी (फुजियामा), भेगीय ज्वालामुखी (दख्खन पठार), जागृत, सुप्त आणि मृत ज्वालामुखी असे तीन प्रकार असतात.
Leave a Reply