प्रकाशाचे परावर्तन
1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
अ. सपाट आरशावर आपात बिंदूला लंब असलेल्या रेषेला स्तंभिका म्हणतात.
आ. लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे अनियमित परावर्तन असते.
इ. कॅलिडोस्कोपचे कार्य परावर्तित प्रकाशाच्या परावर्तन या गुणधर्मावर अवलंबून असते.
3. ‘आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही’, या वाक्याचे स्पष्टीकरण सकारण कसे कराल ?
उत्तर – दृष्टीची संवेदना होण्यासाठी प्रकाश आवश्यक असतो. जेव्हा खोलीत पूर्ण अंधार असतो, तेव्हा कोणत्याही वस्तूवरून परावर्तित झालेला प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच आपण त्या वस्तू पाहू शकत नाही. मात्र, दिवा चालू केल्यावर प्रकाश वस्तूंवर पडतो आणि परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांत येतो, त्यामुळे आपण त्या वस्तू पाहू शकतो.
4. नियमित व अनियमित परावर्तन यांमधील फरक लिहा.
उत्तर –
नियमित परावर्तन | अनियमित परावर्तन |
---|---|
गुळगुळीत आणि सपाट पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. | खडबडीत किंवा अनियमित पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. |
परावर्तित किरण समांतर राहतात. | परावर्तित किरण वेगवेगळ्या दिशांनी विखुरतात. |
प्रतिबिंब स्पष्ट दिसते. | प्रतिबिंब अस्पष्ट किंवा विकृत दिसते. |
उदा. आरसा, स्वच्छ पाणी | उदा. खडबडीत भिंत, कोरडे रस्ते, लाकडाचा पृष्ठभाग |
6. खालील प्रसंग अभ्यासा.
स्वरा व यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत होते. संथ पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होती. तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला, त्यामुळे त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली. स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना.
खालील प्रश्नांच्या उत्तरातून प्रसंगामधील स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजावून सांगा.
अ. प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे, यांचा काही संबंध आहे का ?
उत्तर – होय, प्रकाश परावर्तनामुळेच आपण पाण्यातील प्रतिमा पाहू शकतो. संथ पाण्यात परावर्तन नियमित होते आणि स्पष्ट प्रतिमा दिसते.
आ. यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात ते प्रकार स्पष्ट करून सांगा.
उत्तर – या प्रसंगात दोन प्रकारचे परावर्तन दिसतात:
- संथ पाण्यात नियमित परावर्तन होते, त्यामुळे प्रतिमा स्पष्ट दिसते.
- दगड टाकल्यावर पृष्ठभाग असमान होतो आणि अनियमित परावर्तन होते, त्यामुळे प्रतिमा विस्कळीत होते.
इ. प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का ?
उत्तर – होय, परावर्तनाच्या दोन्ही प्रकारांमध्ये (नियमित व अनियमित) परावर्तनाचे नियम पाळले जातात. मात्र, अनियमित परावर्तनात प्रत्येक बिंदूवर वेगळा कोन असतो, त्यामुळे किरण वेगवेगळ्या दिशांना जातात.
7. उदाहरणे सोडवा.
अ. सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोन 40° असेल, तर आपतन कोन व परावर्तन कोन काढा:
उत्तर – परावर्तनाच्या नियमानुसार,
आपतन कोन (i) = परावर्तन कोन (r)
∠r = 40°
∴ ∠i = 40°
आ. आरसा व परावर्तित किरण यांमधील कोन 23° असल्यास आपाती किरणाचा आपतन कोन किती असेल?
उत्तर – परावर्तित किरण आणि आरशामधील कोन दिला आहे, म्हणजेच:
∠QOB = 23°
आता, स्तंभिका आणि आरशामधील कोन 90° असल्याने:
∠i = 90° – ∠QOB
= 90° – 23°
= 67°
∴ आपतन कोन = 67°
Leave a Reply