आरोग्य व रोग
लहान प्रश्न
1. आरोग्य म्हणजे काय?
उत्तर – केवळ रोगाचा अभाव नसून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुदृढता म्हणजे आरोग्य.
2. संसर्गजन्य रोग म्हणजे काय?
उत्तर – दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक जीवांमुळे होणाऱ्या आणि एकाकडून दुसऱ्याकडे पसरणाऱ्या रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात.
3. क्षय (TB) रोग कशामुळे होतो?
उत्तर – मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या जीवाणूमुळे क्षय (TB) रोग होतो.
4. डेंग्यू कसा पसरतो?
उत्तर – एडिस इजिप्ती डासांच्या चावण्यामुळे डेंग्यू होतो.
5. मधुमेह होण्याचे कारण काय?
उत्तर – इन्सुलिन संप्रेरकाच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने मधुमेह होतो.
6. हृदयविकार टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत?
उत्तर – संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली ठेवावी.
7. कावीळ रोग कशामुळे होतो?
उत्तर – हेपाटायटिस विषाणूमुळे कावीळ रोग होतो.
8. रक्तदानाचे महत्त्व काय?
उत्तर – एक युनिट रक्तदानाने तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात.
9. लसीकरण का महत्त्वाचे आहे?
उत्तर – लसीकरणामुळे अनेक संसर्गजन्य रोग टाळता येतात.
10. स्वच्छता पाळल्याने कोणते फायदे होतात?
उत्तर – संसर्गजन्य रोग होण्याचा धोका कमी होतो आणि शरीर निरोगी राहते.
दीर्घ प्रश्न
1. संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग यात काय फरक आहे?
उत्तर – संसर्गजन्य रोग हे जंतूंमुळे होतात आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतात, उदा. क्षय, डेंग्यू, स्वाइन फ्लू. असंसर्गजन्य रोग हे संसर्गाशिवाय वेगवेगळ्या कारणांमुळे होतात, उदा. मधुमेह, हृदयविकार, कर्करोग. संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी स्वच्छता व लसीकरण महत्त्वाचे असते, तर असंसर्गजन्य रोग टाळण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम गरजेचा असतो.
2. डेंग्यू रोगाची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध सांगा.
उत्तर – डेंग्यू एडिस डासाच्या चावण्यामुळे होतो आणि फ्लेवी विषाणूमुळे पसरतो. लक्षणांमध्ये तीव्र ताप, सांधेदुखी, डोळ्यांच्या खोबणीत दुखणे, त्वचेवर लाल पुरळ आणि प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होणे यांचा समावेश होतो. डासांच्या वाढीला अटकाव करण्यासाठी स्वच्छता राखणे, पाणी साचू न देणे आणि डास प्रतिबंधक उपाय करणे गरजेचे आहे.
3. मधुमेह म्हणजे काय? त्याची कारणे आणि प्रतिबंध सांगा.
उत्तर – मधुमेह हा शरीरातील इन्सुलिन संप्रेरकाच्या कमतरतेमुळे होतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. अनुवंशिकता, लठ्ठपणा, तणाव, चुकीची जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव ही मधुमेहाची प्रमुख कारणे आहेत. हा टाळण्यासाठी संतुलित आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा आणि मानसिक तणाव दूर ठेवावा.
4. कर्करोगाची कारणे आणि उपचार कोणते आहेत?
उत्तर – शरीरातील काही पेशी अनियंत्रितपणे वाढू लागल्यास त्या कर्करोगात बदलतात आणि ट्यूमर किंवा गाठ तयार होते. कर्करोग होण्याची कारणे म्हणजे तंबाखू सेवन, धूम्रपान, प्रदूषण, अनुवंशिकता आणि चुकीचा आहार. कर्करोगावरील उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, किरणोपचार (Radiotherapy) आणि रसायनोपचार (Chemotherapy) यांचा समावेश होतो.
5. स्वाइन फ्लू म्हणजे काय? त्याची लक्षणे आणि प्रतिबंध सांगा.
उत्तर – स्वाइन फ्लू हा H1N1 विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे, जो श्वसनसंस्थेवर परिणाम करतो. लक्षणांमध्ये ताप, खोकला, अंगदुखी, थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांचा समावेश असतो. लसीकरण, मास्कचा वापर, गर्दी टाळणे आणि स्वच्छता राखणे हे त्याचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
6. हृदयविकार का होतो आणि त्यावर काय उपाय आहेत?
उत्तर – हृदयविकार हा हृदयाच्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे होतो आणि त्याला उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान यासारखी कारणे कारणीभूत असतात. लक्षणांमध्ये छातीत दुखणे, घाम येणे, हातात किंवा खांद्यामध्ये वेदना होणे यांचा समावेश असतो. संतुलित आहार, व्यायाम, तणावमुक्त जीवनशैली आणि वेळेवर वैद्यकीय तपासणी केल्याने हृदयविकार टाळता येतो.
7. आरोग्यासाठी संतुलित आहाराचे महत्त्व काय?
उत्तर – संतुलित आहारामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचा योग्य प्रमाणात समावेश असतो. असा आहार घेतल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि विविध आजारांपासून संरक्षण मिळते. जीवनसत्त्वे व खनिजयुक्त अन्न सेवन करून आणि जंक फूड टाळून संतुलित आहाराचे फायदे मिळू शकतात.
8. औषधांचा गैरवापर कसा होतो आणि त्याचे परिणाम काय असतात?
उत्तर – अनेक वेळा लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून वेदनाशामक (Painkillers) आणि प्रतिजैविक (Antibiotics) औषधे घेतात, त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि यकृत व मूत्रपिंडांवर ताण येतो. म्हणूनच कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे आणि त्याचा गैरवापर टाळावा.
9. लसीकरणाचे महत्त्व स्पष्ट करा आणि कोणत्या रोगांवर कोणत्या लसी आहेत ते सांगा.
उत्तर – लसीकरणामुळे शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळते आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते. BCG लस क्षय रोगावर, पोलिओ लस पोलिओसाठी, MMR लस गोवर, गालगुंड आणि रुबेला यासाठी तर हेपाटायटिस लस कावीळसाठी दिली जाते. लहान मुलांचे वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना या रोगांपासून संरक्षण मिळेल.
10. सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर – सार्वजनिक स्वच्छता राखल्याने आजारांचे प्रमाण कमी होते आणि संपूर्ण समाजाचे आरोग्य सुधारते. दूषित पाणी, अस्वच्छ शौचालये आणि कचरा यामुळे कॉलरा, अतिसार, डेंग्यू, मलेरिया यासारखे रोग होतात. त्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता पाळणे आवश्यक आहे, जसे की स्वच्छ पाणी पिणे, कचरा योग्य ठिकाणी टाकणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे.
Leave a Reply