१.अपूर्वः कोऽपि कोषोऽय विद्यते तव भारति ।
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति स्यात् ।।1।।
भारते, तुझ्याकडे अद्वितीय अशी ज्ञानसंपत्ती आहे,तिला जितके खर्च करशील, तितकीच ती वाढेल,पण वापर न केल्यास ती नष्ट होईल.
२.कुसुमं वर्णसम्पन्नं गन्धहीनं न शोभते ।
न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा ।।2।।
सुंदर रंग असलेल्या फुलाला जर सुगंध नसेल, तर ते शोभत नाही,तसेच फक्त गोड बोलणे उपयोगाचे नाही, जर त्याला कृतीची साथ नसेल.
३.अपारे काव्यसंसारे कविरेकः प्रजापतिः ।
यथास्मै रोचते विश्व तथा वै परिवर्तते ।।3।।
काव्याच्या अथांग विश्वात कवी हा सर्जनशील निर्माता आहे,त्याला जसे वाटते, तसेच जग बदलत जाते.
४.शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पण्डितः ।
वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा ।4।।
शंभर लोकांमध्ये एक शूरवीर जन्माला येतो,हजारांमध्ये एक विद्वान असतो,दहा हजारांमध्ये एक उत्तम वक्ता असतो,पण दाता मिळेलच असे नाही.
५.न देवो वर्तते काष्ठे न पाषाणे न मृण्मये ।
भावे हि विद्यते देवः तस्माद् भावो हि कारणम् ।।5।।
देव हा लाकडात, दगडात किंवा मातीच्या मूर्तींमध्ये नसतो,तो फक्त आपल्या भावनेत असतो, म्हणून भावना महत्त्वाची आहे.
Leave a Reply