राज्यशासन
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(1) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ……… येथे होते.
(अ) मुंबई (ब) नागपूर
(क) पुणे (ड) औरंगाबाद
उत्तर – (ब) नागपूर
(2) राज्यपालांची नियुक्ती ……… कडून होते.
(अ) मुख्यमंत्री (ब) प्रधानमंत्री
(क) राष्ट्रपती (ड) सरन्यायाधीश
उत्तर – (क) राष्ट्रपती
(3) राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार ……… यांना असतो.
(अ) मुख्यमंत्री (ब) राज्यपाल
(क) राष्ट्रपती (ड) सभापती
उत्तर – (ब) राज्यपाल
२. तक्ता पूर्ण करा.
अ. क्र. | सभागृह | कार्यकाल | सदस्य संख्या | निवडणुकीचे स्वरूप | प्रमुख |
---|---|---|---|---|---|
1 | विधानसभा | 5 वर्षे | 288 | थेट निवडणूक | विधानसभा अध्यक्ष |
2 | विधान परिषद | 6 वर्षे | 78 | अप्रत्यक्ष निवडणूक | विधान परिषद सभापती |
३. टीपा लिहा.
१) राज्यपाल: राज्यपाल हे घटकराज्यांचे नामधारी प्रमुख असतात. त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ते विधेयकांवर स्वाक्षरी करतात, विधिमंडळाचे अधिवेशन बोलवतात आणि गरज पडल्यास अध्यादेश जारी करतात.
२) मुख्यमंत्र्यांची कार्ये: मुख्यमंत्री हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. ते मंत्रिमंडळ तयार करतात, खातेवाटप करतात, प्रशासनात समन्वय साधतात आणि राज्याचे नेतृत्व करतात.
४. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
१) विधानसभेच्या अध्यक्षांचे कार्य स्पष्ट करा.
उत्तर – विधानसभेचे कामकाज अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली चालते. ते कार्यक्रमपत्रिका ठरवतात, सभागृहातील चर्चा नियंत्रित करतात, आणि अव्यवस्थित वर्तन करणाऱ्या सदस्यांना निलंबित करू शकतात.
२) संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था का स्वीकारली?
उत्तर – भारताची लोकसंख्या मोठी आणि विविधतेने परिपूर्ण असल्यामुळे एकाच ठिकाणाहून संपूर्ण देशाचे प्रशासन करणे कठीण होते. त्यामुळे संविधानाने केंद्र व राज्य असे द्विस्तरीय शासन स्वीकारले.
३) खातेवाटप करताना मुख्यमंत्र्यांना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो?
उत्तर – मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचा राजकीय अनुभव, प्रशासकीय कौशल्य, समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व आणि लोकमताची जाण या बाबी लक्षात घेऊन खातेवाटप करावे.
Leave a Reply