केंद्रीय कार्यकारी मंडळ
१. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा.
(1) भारतातील कार्यकारी सत्ता ……… यांच्याकडे असते.
(राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सभापती)
उत्तर – प्रधानमंत्री
(2) राष्ट्रपतीचा कार्यकाल ……. वर्षांचा असतो.
(तीन, चार, पाच)
उत्तर – पाच
(3) मंत्रिमंडळाचे नेतृत्व ………. करतात.
(पक्षप्रमुख, प्रधानमंत्री, राष्ट्रपती)
उत्तर – प्रधानमंत्री
२. ओळखा आणि लिहा.
- राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव – केंद्रीय कार्यकारी मंडळ
- अधिवेशन काळातील दुपारी 12 चा काळ या नावाने ओळखतात – शून्य प्रहर
३. पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा.
- महाभियोग प्रक्रिया – राष्ट्रपतींनी संविधानाचे उल्लंघन केल्यास त्यांना पदावरून दूर करण्यासाठी संसदेत ठराव मांडला जातो. दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने ठराव संमत झाल्यास राष्ट्रपती पदावरून दूर होतात.
- अविश्वास ठराव – लोकसभेत मंत्रिमंडळाविरुद्ध मांडला जाणारा ठराव. जर तो बहुमताने संमत झाला, तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो.
- जम्बो मंत्रिमंडळ – खूप मोठ्या संख्येच्या मंत्र्यांचे मंत्रिमंडळ. त्यामुळे सरकारवरील आर्थिक ताण वाढतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या संख्येवर बंधने घालण्यात आली आहेत.
४. थोडक्यात उत्तरे लिहा.
- मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा.
- कायद्यांचे मसुदे तयार करणे आणि संसदेत मांडणे.
- शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग यासारख्या क्षेत्रांसाठी धोरणे आखणे.
- संसदेकडून मंजूर झालेल्या धोरणांची अंमलबजावणी करणे.
- संसद मंत्रिमंडळावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवते?
- चर्चा आणि विचारविनिमय – संसद सदस्य कायद्यांवरील चर्चा करून त्रुटी दाखवतात.
- प्रश्नोत्तरे – संसद सदस्य मंत्र्यांना प्रश्न विचारून शासनावर नियंत्रण ठेवतात.
- शून्य प्रहर – कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करता येते.
- अविश्वास ठराव – जर संसद मंत्रिमंडळावर विश्वास दाखवत नसेल, तर ठराव मांडून सरकार पाडू शकते.
५. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
भारताच्या राष्ट्रपतींची कार्ये –
- संसद अधिवेशन बोलावणे आणि स्थगित करणे.
- मंत्रिमंडळाची नेमणूक करणे.
- न्यायाधीश, राज्यपाल, निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करणे.
- युद्ध आणि शांततेचे निर्णय घेणे.
- शिक्षा कमी करणे किंवा माफ करणे.
- आणीबाणी जाहीर करणे.
Leave a Reply