सविनय कायदेभंग चळवळ
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(महात्मा गांधी, खुदा-इ-खिदमतगार, रॅम्से मॅक्डोनाल्ड, सरोजिनी नायडू)
(१) लंडनमध्ये रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते.
(२) खान अब्दुल गफारखान यांनी खुदा-इ-खिदमतगार या संघटनेची स्थापना केली.
(३) धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले.
(४) दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते.
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली.
उत्तर – पेशावर सत्याग्रहात ब्रिटिश सरकारने सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. मात्र गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना कडक शिक्षा दिली.
(२) सोलापूरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला.
उत्तर – सोलापूरच्या सत्याग्रहात मोठ्या प्रमाणात जनतेने भाग घेतला. हरताळ, मोर्चे आणि सरकारी इमारतींवरील हल्ल्यांमुळे ब्रिटिश सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मार्शल लॉ जारी केला.
(३) पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली.
उत्तर – पहिल्या गोलमेज परिषदेत अनेक प्रतिनिधी उपस्थित होते, परंतु राष्ट्रीय सभेने त्यात भाग घेतला नाही. राष्ट्रीय सभा देशाची प्रातिनिधिक संस्था असल्यामुळे तिच्या सहभागाशिवाय चर्चा निष्फळ ठरली.
(४) गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले.
उत्तर – ब्रिटिशांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केला, परंतु गांधीजींना ही हिंदू समाजाची फूट वाटली. त्यामुळे त्यांनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. शेवटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गांधीजींमध्ये ‘पुणे करार’ झाला आणि राखीव मतदारसंघाची व्यवस्था स्वीकारण्यात आली.
३. खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले?
उत्तर – मिठावरील कर जनतेसाठी अन्यायकारक होता. त्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडण्यासाठी दांडी यात्रा केली. हा सत्याग्रह ब्रिटिशांच्या अन्यायकारक कायद्यांविरोधात शांततामय संघर्षाचा भाग होता.
(२) राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली?
उत्तर – गांधी-आयर्विन करारानुसार, ब्रिटिशांनी भारतीयांच्या जबाबदार शासनपद्धतीच्या मागणीचा स्वीकार करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली.
४. सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा.
- १२ मार्च १९३० – दांडी यात्रा सुरू
- ६ एप्रिल १९३० – मिठाचा कायदा मोडला
- २३ एप्रिल १९३० – पेशावर सत्याग्रह सुरू
- ४ मे १९३० – गांधीजींना अटक
- ६ मे १९३० – सोलापूर सत्याग्रह
Leave a Reply