असहकार चळवळ
1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(1) गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात ………. या देशातून केली.
(अ) भारत (ब) इंग्लंड
(क) दक्षिण आफ्रिका (ड) म्यानमार
उत्तर – (क) दक्षिण आफ्रिका
(2) शेतकऱ्यांनी ………. जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली.
(अ) गोरखपूर (ब) खेडा
(क) सोलापूर (ड) अमरावती
उत्तर – (ब) खेडा
(3) जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या ………. या किताबाचा त्याग केला.
(अ) लॉर्ड (ब) सर
(क) रावबहादूर (ड) रावसाहेब
उत्तर – (ब) सर
2. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(1) दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांवर 1906 च्या आदेशान्वये कोणती बंधने घातली गेली ?
उत्तर – 1906 मध्ये शासनाने कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती.
(2) गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला ?
उत्तर – गांधीजींनी भारतातील पहिला सत्याग्रह बिहारमधील चंपारण्य येथे केला.
3. पुढील प्रश्नांची उत्तरे 25 ते 30 शब्दांत लिहा.
(1) सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान स्पष्ट करा.
उत्तर – सत्याग्रह म्हणजे सत्याचा व न्यायाचा आग्रह धरून अहिंसेच्या मार्गाने अन्यायाविरुद्ध लढा देणे. सत्याग्रहीने हिंसा व असत्याचा वापर न करता विरोधकाच्या मतपरिवर्तनाचा प्रयत्न करावा, असे गांधीजींचे मत होते.
(2) स्वराज्य पक्षाची स्थापना का करण्यात आली ?
उत्तर – 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित झाल्यानंतर काही नेत्यांनी कायदेमंडळात जाऊन सरकारच्या अन्याय्य धोरणांना विरोध करावा, असे ठरवले. म्हणून चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
(3) जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी कोण होता ?
उत्तर – जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी जनरल डायर होता.
4. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(1) रौलट कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला.
उत्तर – रौलट कायद्यानुसार ब्रिटिश सरकारला कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करण्याचा आणि न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार मिळाला. त्यामुळे हा कायदा अन्यायकारक असून भारतीयांनी त्याला ‘काळा कायदा’ म्हणून विरोध केला.
(2) गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली.
उत्तर – फेब्रुवारी 1922 मध्ये चौरीचौरा येथे आंदोलकांनी पोलिस चौकीला आग लावून 22 पोलिस ठार केले. अहिंसेच्या तत्त्वाशी विसंगत असल्याने गांधीजींनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार चळवळ स्थगित केली.
(3) भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला.
उत्तर – 1927 मध्ये ब्रिटिशांनी नेमलेल्या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. त्यामुळे भारतीयांना स्वराज्य देण्याच्या प्रक्रियेत भारतीयांचा सहभागच नव्हता, म्हणून या कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आला.
(4) भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली.
उत्तर – इंग्लंडने पहिल्या महायुद्धात तुर्कस्तानच्या खलिफाला वाचवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, युद्धानंतर खलिफाचे साम्राज्य नष्ट करण्यात आले. त्यामुळे भारतीय मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली आणि गांधीजींनीही त्याला पाठिंबा दिला.
Leave a Reply