युरोप आणि भारत
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(1) इ.स.1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी …………. हे शहर जिंकून घेतले.
(अ) व्हेनिस (ब) कॉन्स्टॅन्टिनोपल
(क) रोम (ड) पॅरिस
उत्तर – (ब) कॉन्स्टॅन्टिनोपल
(2) औद्योगिक क्रांतीला प्रारंभ ……… मध्ये झाला.
(अ) इंग्लंड (ब) फ्रान्स
(क) इटली (ड) पोर्तुगाल
उत्तर – (अ) इंग्लंड
(3) इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न ……….. याने केला.
(अ) सिराज उद्दौला (ब) मीर कासीम
(क) मीर जाफर (ड) शाहआलम
उत्तर – (क) मीर जाफर
२. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
- वसाहतवाद:एका देशातील लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशात जाऊन वस्ती करणे आणि त्या प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय. युरोपियन देशांनी व्यापाराच्या निमित्ताने अनेक ठिकाणी वसाहती स्थापन केल्या.
- साम्राज्यवाद:विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रांवर आर्थिक, राजकीय, लष्करी आणि सामाजिक नियंत्रण मिळवणे म्हणजे साम्राज्यवाद होय. युरोपियन राष्ट्रांनी आशिया आणि आफ्रिकेतील अनेक राष्ट्रांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
- प्रबोधनयुग:इ.स.१३वे ते १६वे शतक हा कालखंड प्रबोधनयुग म्हणून ओळखला जातो. या काळात कला, साहित्य, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यामध्ये मोठे बदल घडून आले. लोकांनी अंधश्रद्धांऐवजी बुद्धिवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला.
- भांडवलशाही:व्यापार आणि उद्योगधंद्यांमध्ये खाजगी गुंतवणुकीला महत्त्व असलेल्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही असे म्हणतात. भांडवलशाहीत उत्पादनाचे प्रमुख स्रोत खासगी मालकीचे असतात आणि नफा कमावणे हे मुख्य उद्दिष्ट असते.
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1. प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला.
उत्तर – कारण: सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर इंग्रजांच्या बाजूने फितूर झाला. इंग्रजांनी मीर जाफरला नवाब बनवण्याचे आमिष दाखवले होते. त्यामुळे प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाला योग्य ती मदत मिळाली नाही आणि इंग्रजांचा विजय झाला.
2. युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले.
उत्तर –
- इ.स.1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकून घेतले.
- कॉन्स्टॅन्टिनोपल हे युरोप आणि आशियाला जोडणारे महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते.
- तुर्कांनी हा मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाण्यासाठी नवीन मार्ग शोधणे भाग पडले.
- त्यामुळे बार्थोलोम्यू डायस, ख्रिस्तोफर कोलंबस आणि वास्को-द-गामा यांसारखे दर्यावर्दी नवे सागरी मार्ग शोधण्यासाठी निघाले.
- अखेरीस, वास्को-द-गामा याने इ.स.1498 मध्ये आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या कालिकत बंदरात पोहोचले.
3. युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.
उत्तर –
- नव्या सागरी मार्गांमुळे युरोप आणि आशियाई देशांमधील व्यापार वाढला.
- हा व्यापार अत्यंत फायदेशीर होता, त्यामुळे युरोपातील व्यापारी कंपन्या मोठ्या प्रमाणावर व्यापार करू लागल्या.
- मात्र, समुद्री मार्गांनी माल पाठवणे सुरक्षित राहावे यासाठी राज्यकर्त्यांनी व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण द्यायला सुरुवात केली.
- ब्रिटिश, डच, पोर्तुगीज आणि फ्रेंच व्यापारी कंपन्या आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार करू लागल्या.
- ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीलाही इंग्लंड सरकारने लष्करी मदत आणि व्यापारी सवलती दिल्या.
- त्यामुळे या कंपन्या केवळ व्यापारच करत नव्हत्या, तर त्यांनी लष्करी बळाचा वापर करून स्थानिक राजांना पराभूत करून वसाहती निर्माण केल्या.
4. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा.
दर्यावर्दी | कार्य |
---|---|
बार्थोलोम्यू डायस | आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. |
ख्रिस्तोफर कोलंबस | नवीन समुद्री मार्ग शोधताना अमेरिकेचा शोध लावला. |
वास्को-द-गामा | भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला. |
Leave a Reply