स्वातंत्र्यप्राप्ती
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(1) हंगामी सरकारचे ______ हे प्रमुख होते.
(अ) वल्लभभाई पटेल (ब) महात्मा गांधी
(क) पं. जवाहरलाल नेहरू (ड) बॅ.जीना
उत्तर – (क) पं. जवाहरलाल नेहरू
(2) भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना ______ यांनी तयार केली.
(अ) लॉर्ड वेव्हेल (ब) स्टॅफर्ड क्रिप्स
(क) लॉर्ड माउंटबॅटन (ड) पॅथिक लॉरेन्स
उत्तर – (क) लॉर्ड माउंटबॅटन
२. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(1) बॅ. जीना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला ?
उत्तर – बॅ. जीना यांनी पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राच्या निर्मितीचा आग्रह धरला.
(2) त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे लिहा.
उत्तर – पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए. व्ही. अलेक्झांडर हे त्रिमंत्री योजनेत सहभागी होते.
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(1) राष्ट्रीय सभेने फाळणीस मान्यता दिली.
उत्तर – राष्ट्रीय सभा ही देशाच्या ऐक्यासाठी होती, पण मुस्लीम लीगच्या पाकिस्तानच्या मागणीमुळे ब्रिटिश सरकारने फाळणीचा प्रस्ताव मांडला. याला राष्ट्रीय सभेने अत्यंत नाइलाजाने मान्यता दिली.
(2) हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही.
उत्तर – सुरुवातीला मुस्लीम लीगने हंगामी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला, नंतर सामील झाल्यावरही त्यांनी अडथळे निर्माण केले. त्यामुळे सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही.
(3) वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही.
उत्तर – वेव्हेल योजना ही भारताच्या राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी लॉर्ड वेव्हेल यांनी 1945 मध्ये प्रस्तावित केली होती. या योजनेत केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लीम, दलित आणि अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व देण्याची तरतूद होती. तसेच व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू आणि मुस्लीम सदस्यांची संख्या समान राहील, असा प्रस्ताव होता.
ही योजना यशस्वी होऊ शकली नाही कारण बॅ. जीना आणि मुस्लीम लीगने व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लीम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लीम लीगला असावा, असा आग्रह धरला. राष्ट्रीय सभेने या मागणीला विरोध केला. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि वेव्हेल योजना अपयशी ठरली.
४. दिलेल्या कालरेषेवर घटनाक्रम लिहा.
- 1945 – वेव्हेल योजना तयार करण्यात आली.
- 1946 – त्रिमंत्री योजना सादर करण्यात आली.
- 1947 – भारताचा फाळणीचा निर्णय आणि स्वातंत्र्यप्राप्ती.
- 1948 – महात्मा गांधी यांची हत्या.
५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(1) ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावले का उचलली ?
उत्तर – दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश साम्राज्य आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले होते. भारतातील स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र झाला होता. काँग्रेस आणि इतर नेत्यांनी स्वातंत्र्याची मागणी अधिक जोरात केली. त्यामुळे ब्रिटिशांनी स्वातंत्र्य देण्याचे ठरवले.
(2) माउंटबॅटन योजनेविषयी माहिती लिहा.
उत्तर – लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारत व पाकिस्तान अशी दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण करण्याची योजना तयार केली. राष्ट्रीय सभा याला विरोध करत होती, परंतु मुस्लीम लीगच्या हट्टामुळे आणि परिस्थितीच्या दबावाखाली राष्ट्रीय सभेने फाळणीला मान्यता दिली.
(3) 16 ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे मुस्लीम लीगने का जाहीर केले? त्याचे कोणते परिणाम झाले?
उत्तर – मुस्लीम लीगने पाकिस्तानची मागणी मान्य होत नसल्यामुळे 16 ऑगस्ट 1946 रोजी प्रत्यक्ष कृतिदिन पाळण्याचा निर्णय घेतला. या दिवशी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. हिंदू-मुस्लीम दंगली उसळल्या आणि बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हत्याकांड झाले.
Leave a Reply