सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(पं. श्यामजी कृष्ण वर्मा, मित्रमेळा, रामसिंह कुका)
- स्वा. सावरकर यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली.
- पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले.
- इंडिया हाउसची स्थापना पं. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली.
2. पुढील तक्ता पूर्ण करा.
क्रांतिकारक | संघटना |
---|---|
विनायक दामोदर सावरकर | अभिनव भारत |
बारिंद्रकुमार घोष | अनुशीलन समिती |
चंद्रशेखर आझाद | हिंदुस्थान सोशलिस्ट प्रजासत्ताक सेना |
3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(1) चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला.
उत्तर – पुण्यात १८९७ मध्ये प्लेगच्या साथीच्या काळात प्लेग कमिशनर रँडने जुलमी वागणूक दिली. त्याचा बदला म्हणून दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर बंधूंनी २२ जून १८९७ रोजी रँडचा वध केला. त्यामुळे लोकांमध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला.
(2) खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली.
उत्तर – खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी १९०८ मध्ये किंग्जफोर्ड नावाच्या न्यायाधीशावर बाँब हल्ला केला. पण त्या हल्ल्यात चुकीच्या व्यक्ती मारल्या गेल्या. प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडली, तर खुदीराम बोस यांना अटक करून फाशी देण्यात आली.
(3) भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बाँब फेकले.
उत्तर – १९२९ मध्ये ब्रिटिश सरकारने भारतीयांवरील दडपशाही वाढवणारी विधेयके मांडली. त्याला विरोध दर्शवण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या विधिमंडळात बाँब फेकून निषेध केला. त्यांना अटक झाली व खटला चालवण्यात आला.
4. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(1) चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचा वृत्तांत लिहा.
उत्तर – सूर्य सेन यांच्या नेतृत्वाखाली १८ एप्रिल १९३० रोजी चितगाव शस्त्रागारावर हल्ला करण्यात आला. क्रांतिकारकांनी ब्रिटिश शस्त्रागारांवरील ताबा मिळवला, टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा तोडली. त्यांनी ब्रिटिश सैनिकांशी रोमहर्षक लढत दिली. पुढे सूर्य सेन यांना अटक करून फाशी देण्यात आली.
(2) स्वा. सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा.
उत्तर – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १९०४ मध्ये ‘अभिनव भारत’ संघटना स्थापन केली. इंग्लंडमध्ये त्यांनी भारतीय क्रांतिकारकांना मदत केली. ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ लिहून त्यांनी १८५७ च्या उठावाला ‘प्रथम स्वातंत्र्ययुद्ध’ असे संबोधले. त्यांना ५० वर्षांची शिक्षा होऊन अंदमानच्या कारागृहात पाठवण्यात आले.
Leave a Reply