पृथ्वीचे अंतरंग
प्रश्न 1: अचूक पर्याय निवडा आणि चौकटीत ✔ करा.
(अ) भूकवचाचे हे दोन थर आहेत.
(i) बाह्य व अंतर्कवच
(ii) खंडीय व महासागरीय कवच
(iii) भूपृष्ठ व महासागरीय कवच
(iv) प्रावरण व गाभा
उत्तर – (ii) खंडीय व महासागरीय कवच
(आ) प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामाईक असतो.
(i) सिलिका
(ii) मॅग्नेशिअम
(iii) अल्युमीनियम
(iv) लोह
उत्तर – (i) सिलिका
(इ) पृथभूमीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिजद्रव्ये आढळतात?
(i) लोह-मॅग्नेशिअम
(ii) मॅग्नेशिअम-निकेल
(iii) ॲल्युमिनिअम-लोह
(iv) लोह-निकेल
उत्तर – (iv) लोह-निकेल
(ई) अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे?
(i) वायुरूप
(ii) घनरूप
(iii) द्रवरूप
(iv) अर्ध घनरूप
उत्तर – (ii) घनरूप
(उ) बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे?
(i) लोह
(ii) सोने
(iii) हायड्रोजन
(iv) ऑक्सिजन
उत्तर – (i) लोह
(ऊ) आपण पृथभूमीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात?
(i) प्रावरण
(ii) गाभा
(iii) भूकवच
(iv) खंडीय कवच
उत्तर – (iii) भूकवच
(ए) कोणत्या भूकंपलहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात?
(i) प्राथमिक लहरी
(ii) द्वितीय लहरी
(iii) पृष्ठीय लहरी
(iv) सागरी लहरी
उत्तर – (i) प्राथमिक लहरी
प्रश्न 2: चूक की बरोबर? चुकीची विधाने दुरुस्त करा.
(अ) पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता सारखी नाही.
उत्तर – बरोबर
(आ) पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे.
उत्तर – चूक – गाभा प्रामुख्याने लोह आणि निकेलपासून बनलेला आहे.
(इ) बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाहीत.
उत्तर – बरोबर
(ई) खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशिअम यांचे बनले आहे.
उत्तर – चूक – खंडीय कवच सिलिका व अॅल्युमिनिअमपासून बनलेले आहे.
प्रश्न 3: उत्तरे लिहा.
(अ) भूकवचाचे दोन भाग कोणते? त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय?
उत्तर –
- खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे भूकवचाचे दोन भाग आहेत.
- खंडीय कवच सिलिका व अॅल्युमिनिअमपासून बनलेले आहे, तर महासागरीय कवच सिलिका व मॅग्नेशिअमपासून बनलेले आहे.
(आ) प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात?
उत्तर – उच्च प्रावरण अधिक प्रवाही असून त्यात ज्वालामुखी उद्रेकास कारणीभूत शिलारस कोठी आढळतात. त्यामुळे या भागास दुर्बलावरण म्हणतात.
(इ) पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे. स्पष्ट करा.
उत्तर –
- बाह्य गाभ्यातील द्रवरूप लोह-निकेल भोवऱ्यासारख्या प्रवाहात फिरतात.
- पृथ्वीच्या परिवलनामुळे हे प्रवाह चुंबकीय क्षेत्र निर्माण करतात.
- हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीला सौरवाऱ्यांपासून संरक्षण देते.
प्रश्न 4: सुबक आकृत्या काढून नावे द्या.
(अ) पृथ्वीचे अंतरंग:
उत्तर – भूकवच, प्रावरण, गाभा यांची स्पष्ट रचना दाखवा.
(आ) चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त:
उत्तर – पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव, विषुववृत्त, तसेच चुंबकीय क्षेत्र दाखवा.
प्रश्न 5: भौगोलिक कारणे लिहा.
(अ) पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो.
उत्तर –
- तापमान आणि दाब खोलवर जाताना वाढतात.
- पृथ्वीच्या वेगवेगळ्या थरांमध्ये मूलद्रव्ये आणि त्यांची घनता वेगळी असते.
(आ) मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे.
उत्तर –
- हलकी मूलद्रव्ये वरच्या थरात (भूकवचात), तर जड मूलद्रव्ये गाभ्यात आढळतात.
- उदा. – सिलिका आणि अॅल्युमिनिअम भूकवचात, तर लोह-निकेल गाभ्यात असतात.
(इ) प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे.
उत्तर –
- ज्वालामुखीतून वर येणारा लाव्हारस प्रावरणातून वर येतो.
- भूकंपाच्या लहरी मुख्यतः प्रावरणातून प्रवास करतात.
(ई) भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते.
उत्तर – महासागरीय कवचाचे घनता अधिक असल्याने ते जास्त खोलवर जात नाही.
(उ) चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते.
उत्तर – सौर वारे आणि हानिकारक किरणांपासून पृथ्वीचे वातावरण वाचते.
Leave a Reply