भूमी उपयोजन
1. ग्रामीण भूमी उपयोजन
ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे येथे जमीन मुख्यतः शेती, वने, गायरान किंवा खाणकामासाठी वापरली जाते.
(अ) शेतजमीन
- प्रत्यक्ष शेतीखाली असलेले क्षेत्र.
- बहुतेक वेळा ही जमीन वैयक्तिक मालकीची असते.
(ब) पडीक जमीन
अशी जमीन जी काही कारणांमुळे शेतीसाठी वापरण्यात येत नाही.
दोन प्रकार:
- चालू पडीक जमीन – काही काळ शेती थांबवून नंतर उपयोगात आणलेली जमीन.
- कायम पडीक जमीन – शेतीसाठी उपयोगात न आणलेली जमीन.
(क) वन जमीन
- यामध्ये मोठी झाडे, गवत आणि विविध वनोत्पादने (लाकूड, डिंक, गवत) मिळतात.
- वनक्षेत्र हे पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहे.
(ड) गायरान/माळरान जमीन
- ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची जमीन.
- प्रामुख्याने चराऊ जमीन म्हणून वापरली जाते.
2. नागरी भूमी उपयोजन
शहरांमध्ये जमिनीचा विविध उपयोग केला जातो. नागरीकरणामुळे येथे निवासी, व्यावसायिक, वाहतूक आणि सार्वजनिक सेवांसाठी भूमी उपयोजन केले जाते.
(अ) व्यावसायिक क्षेत्र
- शहरातील काही भाग हे फक्त व्यवसाय आणि उद्योगधंद्यांसाठी राखीव असतात.
- उदा. मुंबईतील बीकेसी (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स)
(ब) निवासी क्षेत्र
- लोकांसाठी घरे, इमारती आणि वसाहती यांचा समावेश.
- येथे लोकसंख्या दाट असल्याने जमिनीचा जास्तीत जास्त वापर केला जातो.
(क) वाहतूक सुविधांचे क्षेत्र
- नागरी भागात वाहतुकीसाठी रस्ते, रेल्वे, मेट्रो, बससेवा, वाहनतळ, पेट्रोल पंप यांची गरज असते.
(ड) सार्वजनिक सेवांचे क्षेत्र
- नागरीकरणामुळे लोकसंख्या वाढल्यामुळे शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, सरकारी कार्यालये यांची गरज वाढते.
(ई) मनोरंजनाची ठिकाणे
- मैदाने, बाग-बगीचे, जलतरण तलाव, नाट्यगृह यांसाठी काही जागा राखीव ठेवली जाते.
(एफ) मिश्र भूमी उपयोजन
- काही वेळेस वरील प्रकार एकत्रितरीत्या काही भागात आढळतात.
- उदा. निवासी क्षेत्र + व्यावसायिक क्षेत्र
नकाशामध्ये भूमी उपयोजनाचे प्रकार दाखवताना वापरण्यात येणारे रंग
रंग | अर्थ |
---|---|
लाल | निवासी क्षेत्र |
निळा | व्यावसायिक क्षेत्र |
पिवळा | कृषी क्षेत्र |
हिरवा | वनक्षेत्र |
संक्रमण प्रदेश व उपनगरे
- शहरी व ग्रामीण भागाच्या सीमारेषेवर असलेल्या भागाला संक्रमण प्रदेश म्हणतात.
- येथे ग्रामीण आणि नागरी जीवनशैलीची सरमिसळ झालेली दिसते.
- मोठ्या शहरांजवळ विकसित होणाऱ्या वस्त्यांना उपनगरे म्हणतात.
- उदा. मुंबईजवळील वांद्रे, भांडुप, ठाणे इ. उपनगरे.
नियोजित शहरे
औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले.
- नियोजन नसल्याने काही शहरे अनियंत्रित वाढ झाली.
- यावर उपाय म्हणून नियोजित शहरे विकसित करण्यात आली.
उदाहरणे
- भारत: चंदीगड, भुवनेश्वर
- जगातील: सिंगापूर, सोल (द. कोरिया), वॉशिंग्टन डी.सी.
जमिनीची मालकी व मालकी हक्क
(अ) सातबारा उतारा (7/12 उतारा)
- शेतजमिनीच्या मालकी आणि वापराबद्दलची माहिती देणारा महसूल खात्याचा अधिकृत दस्तऐवज.
- यात जमिनीचा प्रकार, मालकाचे नाव, पिकांची माहिती आणि कर्जाची माहिती असते.
(ब) मिळकत पत्रिका (Property Card)
- बिगर-शेती जमिनींच्या मालकीसाठी दिला जाणारा नोंदणी कागद.
- यात मालकाचे नाव, मिळकतीचे क्षेत्रफळ, कराची रक्कम इत्यादी माहिती असते.
Leave a Reply