धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
प्र. १. चौकटी पूर्ण करा.
(अ) राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव – केरळमधील कोदुनगलर
(आ) पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स – ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्स
(इ) मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज – संपूर्ण स्वराज्य
(ई) राधिका मेनन यांना मिळालेला पुरस्कार – ॲवार्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी
प्र. २. कारणे लिहा.
(अ) राधिका मेनन यांना अनंत सागरी सफरीला जावंसं वाटायचं, कारण…
उत्तर – लहानपणापासूनच त्यांना सागरकिनारी भटकण्याची आणि उसळणाऱ्या लाटांकडे पाहण्याची आवड होती. त्यामुळे त्यांना जहाजावर काम करण्याची प्रेरणा मिळाली.
(आ) त्यांच्या आई-वडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता, कारण…
उत्तर – त्यांना वाटत होतं की ही नोकरी खूप धोकादायक आहे आणि त्यांची मुलगी समुद्रातल्या संकटांचा सामना कसा करेल, याची त्यांना चिंता होती.
(इ) बचावकार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले, कारण…
उत्तर – त्या वेळी समुद्रात नऊ मीटर उंच लाटा उसळत होत्या आणि वारा ७० समुद्री मैल वेगाने वाहत होता. त्यामुळे बचावकार्य करणे खूप कठीण झाले होते.
प्र. ३. आकृती पूर्ण करा.
राखीका मेनन यांचे गुणविशेष:
- नेतृत्वगुण
- समाजसेवा
- धैर्य आणि चिकाटी
- सहकार्य व संघटन कौशल्य
प्र. ५. स्वमत लिहा.
(अ) कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांना वाचवल्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर – २२ जून २०१५ रोजी वादळामुळे ओडिशाच्या किनाऱ्यावर मच्छीमारांची नाव संकटात सापडली. कॅप्टन राधिका आणि त्यांच्या टीमने तीन प्रयत्नांनंतर यशस्वीपणे मच्छीमारांना जहाजावर सुरक्षित आणले.
(आ) धाडस आणि हिंमत असली, की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठाधारे स्पष्ट करा.
उत्तर – राधिकाने नौदलात जाण्याचा निर्धार केला आणि अनेक अडचणी असूनही तिच्या कर्तृत्वाने ती मर्चंट नेव्हीची पहिली महिला कॅप्टन झाली. यावरून स्पष्ट होते की, धाडस आणि हिंमत असेल, तर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते.
(इ) मोठेपणी तुम्हांला कोण व्हावेसे वाटते आणि का, ते थोडक्यात लिहा.
उत्तर – (स्वतःची मतं लिहा) उदाहरणार्थ, “माझी इच्छा आहे की मी एक शास्त्रज्ञ व्हावे, कारण मला नव्या गोष्टी शोधण्यात आनंद वाटतो.”
Leave a Reply