अण्णा भाऊंची भेट
प्र.1 नातेसंबंध लिहा:
(अ) विठ्ठल उमप – भिकाजी तुपसौंदर → मित्र
(आ) जयवंता बाय – अण्णा भाऊ साठे → पत्नी
(इ) अण्णा भाऊ – गॉर्की → आदर्श/गुरू
प्र.2 आकृत्या पूर्ण करा:
(अ) अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तिमत्त्व विशेष
उत्तर – प्रतिभावान लेखक, कष्टाळू, गरीबांचे दु:ख समजून घेणारे, सत्य लिहिणारे
(आ) झोपडीतील वास्तव
उत्तर – गरिबी, दीनदुबळ्यांचे दुःख, कठीण परिस्थितीत जीवन
प्र.3 एका शब्दात उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा:
(अ) अण्णा भाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण → चिरागनगर
(आ) विठ्ठल उमप यांच्यासमोर अण्णा भाऊंना मिळालेले कथेचे मानधन → ट्रान्झिस्टर
(इ) अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झाले ते शहर → मॉस्को
प्र.4 उत्तरे लिहा:
(अ) अण्णा भाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
उत्तर – अण्णा भाऊ साठे अत्यंत साध्या जीवनशैलीत राहत होते. ते चिरागनगरमधील झोपडीत राहायचे. त्यांचे घर लहानसे, मोडक्या टेबल-खुर्च्यांनी भरलेले होते. श्रीमंतीचे कोणतेही सुख न उपभोगता त्यांनी गरिबीचे जीवन स्वीकारले होते.
(आ) अण्णा भाऊंसाठी असलेल्या सुदिनाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर – विठ्ठल उमप यांना अण्णा भाऊंनी स्वतः भेटायला बोलावले, हे त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण होते. अण्णा भाऊंनी त्यांच्या गायनकलेची प्रशंसा केली आणि त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला.
(इ) पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा.
उत्तर – विठ्ठल उमप हे एक प्रसिद्ध लोकशाहीर होते. त्यांचा आवाज बुलंद आणि प्रभावी होता. ते अत्यंत नम्र स्वभावाचे होते. मोठ्या व्यक्तींशीही ते लाजतबुजत बोलत. अण्णा भाऊंनी त्यांचे कौतुक केल्यावरही त्यांनी नम्रतेने त्यांची प्रशंसा स्वीकारली.
(ई) प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले, ते लिहा.
उत्तर – अण्णा भाऊ साठे हे महान साहित्यिक असूनही त्यांनी आपले जीवन अत्यंत साधेपणाने व्यतीत केले. त्यांनी समाजातील गरीब, शोषित लोकांसाठीच आपले लेखन समर्पित केले. गरिबांच्या दुःखांशी एकरूप होण्यासाठी त्यांनी मोठ्या संपत्तीचा त्याग केला.
खेळूया शब्दांशी:
खालील वाक्यात विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
(1) जुई, रेहाना, जॉर्ज सहलीला निघाले.
(2) अबब! केवढा हा साप!
(3) आई म्हणाली, “सर्वांनी अभ्यासाला बसा.”
(4) “आपला सामना किती वाजता आहे?”
(5) उद्या किंवा परवा मी गावी जाईन.
Leave a Reply