आळाशी
प्र. 1. खालील आकृती पूर्ण करा:
पाऊस आल्यानंतर झालेले बदल:
उत्तर – माती चिखल होते.
पीक जोमाने वाढते.
प्र. 2. हे केव्हा घडते ते लिहा:
(अ) पाखरांचा थवा येतो → पीक उगवल्यावर व शेतात दाणे येताना.
(आ) तान्हा रडत उठतो → बाप आरोळी मारतो तेव्हा.
प्र. 3. कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतींचा ओघतक्ता:
उत्तर –
अनवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे.
भेगाळलेल्या जमिनीकडे पाहून चिंता करणे.
अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे.
पीक जोमाने वाढल्यावर त्याची राखण करणे.
जोंधळ्याची काढणी करणे.
प्र. 4. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा:
- फुटतो – उठतो
- होतीया – उकल होतीया
- ओला – आला
- व्हातो – होतो
प्र. 5. स्वमत लिहा:
(अ) ‘भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर – या ओळीत शेतकऱ्याच्या मेहनतीचे महत्त्व सांगितले आहे. शेतकरी आपल्या श्रमाने जमिनीत पीक उगवतो आणि त्याच्या कष्टांमुळेच पाऊस पडतो असे कविला वाटते.
(आ) ‘शेतकरी जगाचा पोशिंदा आहे’ हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर – शेतकरी आपल्या कष्टाने अन्नधान्य पिकवतो. त्याच्या परिश्रमामुळेच सर्वांची भूक भागते. त्यामुळे तो संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे.
Leave a Reply