गोधडी
लहान प्रश्न
1. गोधडी म्हणजे काय?
उत्तर – फाटलेल्या आणि जुन्या कपड्यांचे तुकडे शिवून बनवलेले उबदार वस्त्र म्हणजे गोधडी.
2. गोधडीला कशाची उब असते?
उत्तर – गोधडीला आईच्या प्रेमाची आणि कष्टाची उब असते.
3. गोधडीत कोणकोणत्या कपड्यांचे तुकडे असतात?
उत्तर – आईच्या लुगड्याचा तुकडा, बाबांच्या धोतराचे अस्तर आणि इतर कुटुंबीयांचे कपडे असतात.
4. गोधडी केवळ चिंध्यांचा संच आहे का?
उत्तर – नाही, ती कुटुंबाच्या आठवणी आणि प्रेम जपणारी वस्तू आहे.
5. गोधडीतील अस्तर कोणते असते?
उत्तर – आईच्या लुगड्याचे आणि बापाच्या धोतराचे अस्तर असते.
6. गोधडीची शिवण कोणत्या गोष्टीचे प्रतीक आहे?
उत्तर – आईच्या मायेने जपलेल्या आठवणी आणि प्रेमाचे प्रतीक आहे.
7. गोधडीला ठिगळे का लावलेले असतात?
उत्तर – ती जुन्या कपड्यांपासून बनवलेली असल्याने टिकवण्यासाठी ठिगळे लावले जातात.
8. गोधडीला गरिबीचे प्रतीक का मानले जाते?
उत्तर – कारण ती जुन्या कपड्यांपासून शिवलेली असते आणि साधेपणाचे दर्शन घडवते.
9. गोधडी कोणत्या ऋतूत सर्वाधिक उपयोगी पडते?
उत्तर – थंडीच्या ऋतूत गोधडी शरीराला उब देण्यासाठी उपयोगी ठरते.
10. कवीने गोधडीला कोणत्या भावनांशी जोडले आहे?
उत्तर – कवीने गोधडीला आठवणी, प्रेम, माया आणि कष्ट या भावनांशी जोडले आहे.
दीर्घ प्रश्न
1. गोधडीचे महत्त्व काय आहे?
उत्तर – गोधडी ही केवळ चिंध्यांचा संच नसून, ती कुटुंबाच्या आठवणी जपणारी आणि मायेने शिवलेली वस्त्र आहे. ती गरिबीचं प्रतीक असूनही प्रेम आणि ऊब जपणारी असते. आईच्या कष्टाची आणि प्रेमाची आठवण ती जागृत ठेवते.
2. गोधडीत असलेल्या कपड्यांचे तुकडे कोणकोणत्या व्यक्तींशी संबंधित आहेत?
उत्तर – गोधडीत आईच्या जुन्या लुगड्याचा, बाबांच्या फाटलेल्या धोतराचा आणि घरातील इतर सदस्यांच्या कपड्यांचे तुकडे असतात. हे तुकडे केवळ कपड्यांचे तुकडे नसून त्या व्यक्तींशी जोडलेल्या आठवणींचे प्रतीक आहेत. त्यामुळे गोधडी केवळ उब देणारी नसून ती मायेने जपलेली वस्त्र आहे.
3. गोधडी केवळ चिंध्यांचा संच नाही, तर ऊब असते ऊब – या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर – गोधडी अनेक फाटलेल्या कपड्यांचे तुकडे जोडून शिवलेली असली तरी ती केवळ जुन्या कपड्यांचा संच नाही. ती आईच्या प्रेमाची, मायेची आणि कष्टाची आठवण करून देते. त्यामुळे ती केवळ शारीरिक उब देणारी नसून, ती मायेची आणि भावनिक उबही देते.
4. गोधडी ही गरिबीचे आणि समाधानाचे प्रतीक कशी आहे?
उत्तर – गोधडी साध्या, फाटलेल्या आणि जुन्या कपड्यांपासून बनवली जाते, त्यामुळे ती गरिबीचे प्रतीक आहे. पण ती आईच्या मायेने शिवलेली असल्याने प्रेम, ऊब आणि कुटुंबाच्या आठवणी जपणारी आहे. त्यामुळे ती गरिबीतही समाधान देणारी आणि प्रेमाने जपलेली वस्त्र आहे.
5. गोधडीचे अस्तर कोणत्या गोष्टीने बनलेले असते आणि त्याला काय महत्त्व आहे?
उत्तर – गोधडीचे अस्तर आईच्या फाटक्या लुगड्याच्या आणि बाबांच्या जुन्या धोतराच्या तुकड्यांपासून बनलेले असते. या अस्तरामध्ये कुटुंबाच्या कष्टांची आठवण असते. जरी ती जुनी आणि फाटकी असली तरी ती कुटुंबाच्या प्रेमाची साक्ष देणारी असते.
6. कवीने गोधडीला मायेची ऊब का म्हटले आहे?
उत्तर – गोधडी आईच्या प्रेमाने शिवलेली असते, तिच्या प्रत्येक ठिगळामध्ये कष्ट, माया आणि जिव्हाळा असतो. त्यामुळे ती केवळ उब देणारी वस्त्र नसून, ती आईच्या प्रेमाचा स्पर्श असते. त्यामुळेच कवीने तिला मायेची ऊब असे संबोधले आहे.
Leave a Reply