Question Answer For All Chapters – सामान्य विज्ञान Class 7
अन्नपदार्थांची सुरक्षा
स्वाध्याय
1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(किरणीयन, निर्जलीकरण, पाश्चरीकरण, नैसर्गिक परिरक्षक, रासायनिक परिरक्षक)
अ. शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला निर्जलीकरण असे म्हणतात.
आ. दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला पाश्चरीकरण असे म्हणतात.
इ. मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे.
ई. व्हिनेगर हे रासायनिक परिरक्षक आहे.
2. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात?
उत्तर: दूध 80°C तापमानाला 15 मिनिटे तापवले जाते आणि नंतर ताबडतोब थंड केले जाते. यामुळे त्यातील सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि दूध दीर्घकाळ टिकते.
आ. भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत?
उत्तर: भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने विषबाधा, पचनासंबंधी समस्या, दीर्घकालीन आजार, आणि कॅन्सर सारखे गंभीर आजार होऊ शकतात.
इ. घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आईबाबा काय काळजी घेतात?
उत्तर: अन्न हवाबंद डब्यात ठेवतात, थंड साठवणूक करतात, जुने-नवे अन्न वेगळे ठेवतात, स्वच्छता राखतात आणि अन्न साठवताना टिकण्याच्या तारखेची तपासणी करतात.
ई. अन्नबिघाड कसा होतो? अन्नबिघाड करणारे विविध घटक कोणते?
उत्तर: अन्नाचा रंग, वास, पोत बदलणे म्हणजे अन्नबिघाड. हे बुरशी, जास्त उष्णता, ओलसरता, अयोग्य साठवण, कीटक, रासायनिक प्रक्रिया आणि वायुप्रदूषणामुळे होऊ शकते.
उ. अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतींचा वापर तुम्ही कराल?
उत्तर: गोठवणे, निर्जलीकरण, हवाबंद डबे वापरणे, मीठ-साखरेचा वापर, पाश्चरीकरण, किरणीयन, वायू वापरणे इत्यादी पद्धती वापरू शकतो.
3. काय करावे बरे?
अ. बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात.
विक्रेता हातमोजे वापरत आहे का? मिठाई झाकलेली आहे का? हे तपासून घेतले पाहिजे.
आ. पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे.
अशा ठिकाणी खाणे टाळावे आणि स्वच्छतेकडे लक्ष देणाऱ्या विक्रेत्यांकडून खावे.
इ. बाजारातून भरपूर भाजीपाला, फळे विकत आणली आहेत.
गरजेपुरतेच खरेदी करावे, स्वच्छ धुवून खाण्यासाठी ठेवावे.
ई. उंदीर, झुरळ, पाल यांपासून अन्नपदार्थांचे रक्षण करायचे आहे.
अन्न हवाबंद ठिकाणी ठेवावे, स्वच्छता राखावी आणि कीटकनाशकांचा योग्य वापर करावा.
4. आमच्यातील वेगळा कोण हे शोधा.
अ. सायट्रिक आम्ल (हे नैसर्गिक नसून रासायनिक आहे).
आ. हळद पावडर (ही नैसर्गिक आहे, बाकी भेसळ आहेत).
इ. बदाम (हे कोरडे खाद्य आहे, बाकी फळे आहेत).
ई. निवळणे (हे अन्न टिकवण्याचे तंत्र नाही).
5. खालील तक्ता पूर्ण करा.
क्र. | पदार्थ | भेसळ |
---|---|---|
1 | हळद पावडर | मेटॅनिल यलो |
2 | मिरी | रंगीत बिया |
3 | रवा | लोहकीस |
4 | मध | साखर सिरप |
6. असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा.
अ. गुणात्मक अन्ननासाडी होत आहे.
अन्न व्यवस्थित साठवले नाही तर गुणवत्ता कमी होते. उपाय: योग्य तापमानात आणि स्वच्छ ठिकाणी ठेवावे.
आ. शिजवलेला भात कच्चा लागत आहे.
अपुरी आंच किंवा कमी पाणी वापरण्यामुळे होते. उपाय: योग्य प्रमाणात पाणी आणि वेळ द्यावी.
इ. बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे.
योग्य साठवणुकीचा अभाव. उपाय: वाळवून हवाबंद ठिकाणी ठेवावा.
ई. दह्याची चव आंबट / कडवट लागत आहे.
जास्त वेळ ठेवल्यामुळे किंवा खराब दुधामुळे. उपाय: ताज्या दुधापासून बनवावे.
उ. खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे.
ऑक्सिडेशनमुळे होते. उपाय: लिंबाचा रस लावावा किंवा हवाबंद ठिकाणी ठेवावे.
7. कारणे लिहा.
1. 5° सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात.
कमी तापमानामुळे सूक्ष्मजीवांची वाढ थांबते.
2. सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात
विविध पदार्थ एकत्र मांडता येतात, पाहिजे तेवढेच घेता येते आणि अन्न वाया जाण्याचे प्रमाण कमी होते.
Leave a Reply