Question Answer For All Chapters – सामान्य विज्ञान Class 7
ध्वनी : ध्वनीची निर्मिती
स्वाध्याय
1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा:
अ. कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो.
आ. ध्वनीची वारंवारिता हर्ट्झ (Hz) मध्ये मोजतात.
इ. ध्वनीचा आयाम कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो.
ई. ध्वनीच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते.
2. योग्य जोड्या जुळवा.
अ गट | ब गट |
---|---|
अ. बासरी | 3. हवेतील कंपने |
आ. वारंवारिता | 4. Hz मध्ये मोजतात |
इ. ध्वनीची पातळी | 5. डेसिबेल |
ई. श्राव्यातीत ध्वनी | 2. वारंवारिता 20000 Hz पेक्षा जास्त |
उ. अवश्राव्य ध्वनी | 1. वारंवारिता 20Hz पेक्षा कमी |
3. शास्त्रीय कारणे लिहा:
अ. जुन्या काळी रेल्वे कधी येईल, हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत.
➥ कारण ध्वनी घन माध्यमातून (लोखंडी रुळांमधून) हवेपेक्षा जलद प्रवास करतो. म्हणून रेल्वे येण्याचा अंदाज आधीच घेता येतो.
आ. तबला व सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो.
➥ कारण तबल्याचा ध्वनी पडद्याच्या कंपनेमुळे तर सतारीचा ध्वनी तारेच्या कंपनांमुळे निर्माण होतो. तसेच दोन्ही वाद्यांची वारंवारिता आणि आयाम वेगळे असतात.
इ. चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली, तर त्याला ती ऐकू येणार नाही.
➥ कारण ध्वनीच्या प्रसारासाठी माध्यम (हवा, पाणी, घन पदार्थ) आवश्यक असते. चंद्रावर हवा नसल्यामुळे ध्वनी प्रसार होऊ शकत नाही.
ई. डासाच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते, परंतु आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही.
➥ कारण डासाच्या पंखांची वारंवारिता 250 ते 500 Hz असते, जी मानवाला ऐकू येते. परंतु आपल्या हातांची हालचाल फारच कमी वारंवारितीची असते (20 Hz पेक्षा कमी), त्यामुळे ती ऐकू येत नाही.
4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
अ. ध्वनीची निर्मिती कशी होते?
उत्तर: कोणत्याही वस्तूच्या कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो. उदाहरणार्थ, सतारीची तार छेडल्यावर ती कंपित होते आणि हवेच्या रेणूंमध्ये कंप निर्माण होतो. हे कंप आपल्या कानापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला ध्वनी ऐकू येतो.
आ. ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते?
उत्तर: ध्वनीची तीव्रता ध्वनीच्या कंपनांच्या आयामावर अवलंबून असते. जर आयाम वाढवला तर ध्वनी मोठा (जोरात) ऐकू येतो आणि जर आयाम कमी केला तर ध्वनी सौम्य (हलका) ऐकू येतो.
इ. दोलकाच्या वारंवारितेचा संबंध दोलकाची लांबी व आयाम यांच्याशी कसा असतो ते स्पष्ट करा.
उत्तर:
दोलकाची लांबी वाढवली, तर त्याचा दोलनकाल वाढतो आणि वारंवारिता कमी होते.
दोलकाची लांबी कमी केली, तर त्याचा दोलनकाल कमी होतो आणि वारंवारिता वाढते.
आयामाचा मात्र वारंवारितेवर परिणाम होत नाही.
ई. ताणून बसवलेल्या तारेतून निर्माण होणाऱ्या ध्वनीची उच्चनीचता कोणत्या दोन मार्गांनी बदलता येते, ते स्पष्ट करा.
उत्तर:
तारेचा ताण वाढवून किंवा कमी करून – ताण वाढवल्यास ध्वनी उच्च पट्टीचा (तिखट) होतो, ताण कमी केल्यास ध्वनी नीच पट्टीचा (मंद) होतो.
तारेची लांबी बदलून – लहान तार उच्च वारंवारितीचा ध्वनी निर्माण करते आणि मोठी तार नीच वारंवारितीचा ध्वनी निर्माण करते.
Leave a Reply