प्रकाशाचे परिणाम
1. प्रकाश म्हणजे काय?
प्रकाश हा अनेक रंगांचा बनलेला असतो.
उन्हाच्या प्रकाशझोतात धूळकण तरंगताना दिसतात.
सकाळी व संध्याकाळी आकाशात वेगवेगळे रंग दिसतात.
2. प्रकाशाचे विकिरण (Scattering of Light)
प्रकाश कणांवर आदळून वेगवेगळ्या दिशांना जातो, यालाच प्रकाशाचे विकिरण म्हणतात.
पाण्यात दुधाचे थेंब मिसळले असता प्रकाशझोत स्पष्ट दिसतो.
आकाश निळे दिसण्याचे कारण म्हणजे वातावरणातील नायट्रोजन व ऑक्सिजनच्या रेणूंमुळे निळा रंग जास्त प्रमाणात विकिरित होतो.
सूर्यास्त व सूर्योदयाच्या वेळी प्रकाश जास्त अंतर पार करतो, त्यामुळे आकाश लालसर दिसते.
3. छाया आणि तिचे प्रकार
प्रच्छाया (Umbra) – संपूर्ण गडद छाया
उपच्छाया (Penumbra) – फिकट छाया
4. ग्रहण म्हणजे काय?
ग्रहण हे सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्या ठराविक स्थितीमुळे होते.
सूर्यग्रहण – चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आल्यास.
चंद्रग्रहण – पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये आल्यास.
सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये, चंद्रग्रहण मात्र पाहता येते.
5. शून्यछाया दिन
ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवशी छाया दिसत नाही.
ही घटना केवळ कर्कवृत्त आणि मकरवृत्तामध्ये घडते.
6. महत्त्वाच्या संकल्पना
बिंदुखोत (Point Source) – लहान प्रकाशस्रोत, ज्यामुळे फक्त गडद छाया तयार होते.
विस्तारित स्रोत (Extended Source) – मोठा प्रकाशस्रोत, ज्यामुळे फिकट व गडद छाया तयार होतात.
प्रकाशाचे विकिरण – प्रकाशाच्या लहरी हवेमधील कणांवर आदळून विविध दिशांना जातात.
ग्रहण – सूर्य, पृथ्वी व चंद्राच्या सावलीमुळे होणारी नैसर्गिक घटना.
Leave a Reply