बदल : भौतिक व रासायनिक
१. बदल म्हणजे काय?
आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे बदल होत असतात. काही बदल निसर्गत: होतात, तर काही माणसाच्या कृतीमुळे होतात.
बदलांचे प्रकार:
१. भौतिक बदल – फक्त पदार्थाचा आकार, रंग किंवा अवस्था बदलते. नवीन पदार्थ तयार होत नाही.
उदाहरणे: बर्फ वितळणे, कागद फाडणे, पाणी गरम होणे.
रासायनिक बदल – नवीन पदार्थ तयार होतो आणि तो पूर्ववत करता येत नाही.
उदाहरणे: लोखंड गंजणे, दुधाचे दही होणे, फटाका फुटणे.
२. नैसर्गिक व मानवनिर्मित बदल
नैसर्गिक बदल: निसर्गात आपोआप घडणारे बदल.
उदाहरणे: पाऊस पडणे, फळ पिकणे, वारा वाहणे.
मानवनिर्मित बदल: माणसामुळे होणारे बदल.
उदाहरणे: कागद बनवणे, इमारत बांधणे, प्लास्टिक तयार करणे.
३. आवर्ती व अनावर्ती बदल
आवर्ती बदल: ठराविक कालावधीने सतत होणारे बदल.
उदाहरणे: दिवस-रात्र होणे, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे.
अनावर्ती बदल: कधी होईल याचा अंदाज नसलेले बदल.
उदाहरणे: भूकंप, पूर, फटाका फुटणे.
४. शीघ्र व सावकाश बदल
शीघ्र बदल: लवकर होणारे बदल.
उदाहरणे: फुगा फुटणे, कागद जळणे.
सावकाश बदल: हळूहळू होणारे बदल.
उदाहरणे: लोखंड गंजणे, झाड वाढणे.
५. परिवर्तनीय व अपरिवर्तनीय बदल
परिवर्तनीय बदल: मागे फिरवता येणारे बदल.
उदाहरणे: मेणबत्ती वितळणे, दोरी ताणणे.
अपरिवर्तनीय बदल: पुन्हा मागे फिरवता न येणारे बदल.
उदाहरणे: लाकूड जळणे, दुधाचे दही होणे.
६. उपयोगी व हानिकारक बदल
उपयोगी बदल: आपल्या दैनंदिन जीवनात मदत करणारे बदल.
उदाहरणे: अन्न शिजवणे, कापड विणणे.
हानिकारक बदल: माणसासाठी अपायकारक ठरणारे बदल.
उदाहरणे: पूर, भूकंप, आग लागणे.
७. क्षरण म्हणजे काय?
धातू हवेतील ऑक्सिजन व ओलाव्यामुळे खराब होतात.
उदाहरणे:
लोखंड गंजणे (तपकिरी रंगाचा थर).
तांबे हिरवा पडणे.
हे टाळण्यासाठी गॅल्व्हनायझेशन (जस्ताचा थर) आणि कल्हई (कथिलाचा थर) केली जाते.
Leave a Reply