अन्नपदार्थांची सुरक्षा
लहान प्रश्न
1. अन्नबिघाड म्हणजे काय?
उत्तर: अन्न खराब होणे किंवा त्याचा वास, रंग, चव बदलणे म्हणजे अन्नबिघाड.
2. अन्न टिकवण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात?
उत्तर: गोठवणे, वाळवणे, पाश्चरीकरण, धुरीकरण, किरणीयन इत्यादी.
3. अन्न भेसळ म्हणजे काय?
उत्तर: अन्नात अपायकारक किंवा निकृष्ट पदार्थ मिसळणे म्हणजे अन्नभेसळ.
4. दूध टिकवण्यासाठी कोणती पद्धत वापरतात?
उत्तर: पाश्चरीकरण – दूध गरम करून लगेच थंड करतात.
5. फळे आणि भाज्या खराब होण्याचे कारण काय?
उत्तर: हवा, ओलसरता, सूक्ष्मजीव आणि अयोग्य साठवणूक.
6. गुणात्मक अन्ननासाडी म्हणजे काय?
उत्तर: अन्नाचे पोषणमूल्य कमी होणे म्हणजे गुणात्मक अन्ननासाडी.
7. रासायनिक परिरक्षकाचे उदाहरण द्या.
उत्तर: व्हिनेगर, सायट्रिक आम्ल, सोडिअम बेन्झोएट.
8. अन्न साठवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
उत्तर: स्वच्छता, हवाबंद डबे, योग्य तापमान आणि टिकण्याची तारीख पाहावी.
9. अन्न वाया जाणे टाळण्यासाठी काय करावे?
उत्तर: आवश्यक तेवढेच अन्न वाढून घ्यावे आणि शिळे अन्न पुन्हा वापरावे.
10. किरणीयन पद्धतीचा उपयोग कोणत्या अन्नावर होतो?
उत्तर: कांदे, बटाटे, मसाले आणि फळांवर किरणीयन पद्धत वापरतात.
लांब प्रश्न
1.अन्न खराब होण्याची कारणे कोणती?
उत्तर: जास्त उष्णता, ओलसरता, बुरशी, कीटक आणि अयोग्य साठवणूक यामुळे अन्न खराब होते.
2. अन्नभेसळ टाळण्यासाठी आपण काय करू शकतो?
उत्तर: अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी करावी, स्वच्छ ठिकाणी खरेदी करावी आणि घरगुती चाचण्या कराव्यात.
3. संख्यात्मक आणि गुणात्मक अन्ननासाडीत काय फरक आहे?
उत्तर: संख्यात्मक अन्ननासाडी म्हणजे अन्न वाया जाणे आणि गुणात्मक अन्ननासाडी म्हणजे त्याचे पोषणमूल्य कमी होणे.
4. अन्न टिकवण्यासाठी कोणत्या नैसर्गिक परिरक्षकांचा वापर करतात?
उत्तर: मीठ, साखर, तेल आणि लोणच्यांसाठी मसाले हे नैसर्गिक परिरक्षक आहेत.
5. पाणीपुरी किंवा उघड्यावर विकले जाणारे पदार्थ खाणे सुरक्षित आहे का? का?
उत्तर: नाही, कारण अशा पदार्थांमध्ये स्वच्छतेचा अभाव असतो आणि त्यामुळे आजार होण्याची शक्यता असते.
Leave a Reply