सजीवांतील पोषण
लहान प्रश्न
1. पोषण म्हणजे काय?
उत्तर: शरीराला आवश्यक अन्नघटक मिळवण्याच्या आणि वापरण्याच्या प्रक्रियेला पोषण म्हणतात.
2. स्वयंपोषी सजीव कोणते?
उत्तर: स्वतः अन्न तयार करणारे सजीव, उदा. झाडे.
3. परपोषी सजीव कोणते?
उत्तर: अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असणारे सजीव, उदा. प्राणी.
4. प्रकाशसंश्लेषणासाठी कोणते घटक आवश्यक आहेत?
उत्तर: सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि हरितद्रव्य.
5. अन्नग्रहण म्हणजे काय?
उत्तर: अन्न तोंडातून शरीरात घेण्याच्या प्रक्रियेला अन्नग्रहण म्हणतात.
6. मांसाहारी प्राणी कोणते?
उत्तर: इतर प्राणी खाणारे प्राणी, उदा. वाघ, सिंह.
7. सहजीवी पोषण म्हणजे काय?
उत्तर: दोन सजीव एकमेकांच्या मदतीने अन्न मिळवतात, उदा. दगडफूल.
8. बाह्यपरजीवी कोणते?
उत्तर: इतर सजीवांच्या शरीरावर राहून पोषण घेणारे, उदा. उवा, गोचीड.
9. कीटकभक्षी वनस्पतींचे उदाहरण सांगा.
उत्तर: घटपर्णी, ड्रॉसेरा.
10. विघटक म्हणजे काय?
उत्तर: मृत पदार्थ कुजवून पोषण घेणारे सूक्ष्मजीव, उदा. कवक, जीवाणू.
लांब प्रश्न
1.प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया स्पष्ट करा.
उत्तर: झाडे सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साइड आणि पाणी वापरून अन्न (ग्लुकोज) तयार करतात व ऑक्सिजन सोडतात.
2. प्राण्यांमधील पोषणाचे पाच टप्पे कोणते?
उत्तर: अन्नग्रहण, पचन, शोषण, सात्मीकरण आणि उत्सर्जन हे प्राण्यांमधील पोषणाचे टप्पे आहेत.
3. परजीवी आणि मृतोपजीवी सजीवांत काय फरक आहे?
उत्तर: परजीवी सजीव जिवंत सजीवांवर अवलंबून असतात, तर मृतोपजीवी सजीव मृत पदार्थांवर जगतात.
4. कीटकभक्षी वनस्पतींना कीटक का खावे लागतात?
उत्तर: या वनस्पतींना मातीतील नायट्रोजन कमी मिळतो, म्हणून त्या कीटकांपासून पोषण घेतात.
5. विघटक सजीवांचे पर्यावरणातील महत्त्व सांगा.
उत्तर: विघटक सजीव मृत सजीवांचे विघटन करून मातीला सुपीक करतात आणि पोषकद्रव्यांची पुनर्वापरता होण्यास मदत करतात.
Leave a Reply