ध्वनी : ध्वनीची निर्मिती
लहान प्रश्न
1. ध्वनी कशामुळे निर्माण होतो?
उत्तर: वस्तूच्या कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो.
2. ध्वनीच्या प्रसारासाठी काय आवश्यक असते?
उत्तर: ध्वनीच्या प्रसारासाठी हवा, पाणी किंवा घन माध्यम आवश्यक असते.
3. ध्वनीच्या तीव्रतेचे मापन कोणत्या एककात केले जाते?
उत्तर: डेसिबेल (dB) मध्ये मापन केले जाते.
4. कोणत्या ध्वनीला श्राव्य ध्वनी म्हणतात?
उत्तर: 20 Hz ते 20,000 Hz वारंवारितीच्या ध्वनीला श्राव्य ध्वनी म्हणतात.
5. कोणता प्राणी श्राव्यातीत ध्वनी ऐकू शकतो?
उत्तर: कुत्रा, वटवाघूळ आणि डॉल्फिन हे प्राणी श्राव्यातीत ध्वनी ऐकू शकतात.
6. चंद्रावर ध्वनी ऐकू येतो का? का?
उत्तर: नाही, कारण चंद्रावर हवा नाही, त्यामुळे ध्वनी प्रसार होऊ शकत नाही.
7. ताण वाढवल्यावर तारेचा ध्वनी कसा होतो?
उत्तर: ताण वाढवल्यावर ध्वनी उच्च (तिखट) होतो.
8. ध्वनीची वारंवारिता कशावर अवलंबून असते?
उत्तर: वस्तूच्या कंपनांच्या वेगावर अवलंबून असते.
9. श्राव्य आणि अवश्राव्य ध्वनी यातील मुख्य फरक काय?
उत्तर: माणसाला ऐकू येणारा श्राव्य, आणि ऐकू न येणारा अवश्राव्य ध्वनी.
10. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आपण काय करू शकतो?
उत्तर: जास्त आवाज न करणे, हॉर्न कमी वाजवणे, आवाज नियंत्रित करणे.
लांब प्रश्न
1. ध्वनीचा प्रसार कसा होतो?
उत्तर: ध्वनी हवेतील, पाण्यातील किंवा घन पदार्थातील रेणूंना हलवतो आणि आपल्या कानापर्यंत पोहोचतो.
2. दोलनगती म्हणजे काय?
उत्तर: एखादी वस्तू जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन परत त्याच मार्गाने आली, तर त्या गतीला दोलनगती म्हणतात.
3. ध्वनीच्या उच्च-नीचतेचा काय संबंध आहे?
उत्तर: वारंवारिता जास्त असल्यास ध्वनी उच्च (तिखट) आणि कमी असल्यास नीच (मंद) असतो.
4. श्राव्यातीत ध्वनीचे दोन उपयोग सांगा.
उत्तर: 1) सोनोग्राफीसाठी वापर केला जातो.
2) रडार यंत्रणेत जहाजे किंवा अडथळे शोधण्यासाठी वापर केला जातो.
5. ध्वनी प्रदूषणामुळे कोणते नुकसान होते?
उत्तर: जास्त आवाजामुळे कानाचे नुकसान, ताणतणाव, आणि आरोग्य बिघडते.
Leave a Reply