मानवी स्नायू व पचनसंस्था
लहान प्रश्न
1.स्नायू म्हणजे काय?
उत्तर: शरीराच्या हालचालीस मदत करणारे तंतूंचा समूह म्हणजे स्नायू.
2. स्नायू किती प्रकारचे असतात?
उत्तर: स्नायू तीन प्रकारचे असतात – ऐच्छिक, अनैच्छिक आणि हृद्स्नायू.
3. हृदयाचे स्नायू कोणत्या प्रकारचे असतात?
उत्तर: हृदयाचे स्नायू अनैच्छिक असतात आणि ते कधीही थकत नाहीत.
4. पचनसंस्था कोणते काम करते?
उत्तर: अन्नाचे छोटे घटकांमध्ये रूपांतर करून शरीराला ऊर्जा देते.
5. पचनसंस्थेचे मुख्य भाग कोणते?
उत्तर: तोंड, ग्रासनलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे आणि गुदद्वार.
6. लाळग्रंथी कोणता रस तयार करते आणि त्याचे कार्य काय?
उत्तर: लाळ तयार करते, जी अन्न मऊ करून त्याचे पचन सुरू करते.
7. यकृताचा मुख्य कार्य कोणता आहे?
उत्तर: पित्तरस तयार करणे आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे.
8. आपले आतडे किती लांब असते?
उत्तर: लहान आतडे सुमारे 6 मीटर आणि मोठे आतडे 1.5 मीटर लांब असते.
9. स्नायूंना बळकट ठेवण्यासाठी काय करावे?
उत्तर: नियमित व्यायाम करावा आणि पोषक आहार घ्यावा.
10. तंबाखू सेवनाचा शरीरावर कोणता परिणाम होतो?
उत्तर: तोंड, घसा आणि पचनसंस्था खराब होते आणि कर्करोगाचा धोका वाढतो.
लांब प्रश्न
1. स्नायू आणि हाडे एकत्र कसे कार्य करतात?
उत्तर: स्नायू हाडांना स्नायुबंधांनी जोडलेले असतात. स्नायू आकुंचन आणि शिथिलीकरण झाल्यावर हाडे हलतात आणि हालचाल होते.
2. पचनसंस्थेतील कोणत्या ग्रंथी कोणता रस तयार करतात?
उत्तर: लाळग्रंथी – लाळ, जठर – जठररस, यकृत – पित्तरस, स्वादुपिंड – स्वादुरस, लहान आतडे – आंत्ररस.
3. पचनसंस्थेचे आरोग्य राखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
उत्तर: सकस आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे आणि वेळेवर जेवण करावे.
4. अनैच्छिक स्नायू कोणते आणि त्यांचे उदाहरण द्या?
उत्तर: ज्या स्नायूंचे नियंत्रण आपल्या इच्छेवर अवलंबून नसते त्यांना अनैच्छिक स्नायू म्हणतात. उदा. आतडे, हृदय, श्वसनसंस्था.
5. तंबाखू आणि मद्यपानामुळे शरीरावर काय परिणाम होतो?
उत्तर: पचनसंस्था आणि हृदयाचे कार्य बिघडते, मेंदूवर परिणाम होतो आणि कर्करोगाचा धोका वाढतो.
Leave a Reply