सजीव सृष्टी : अनुकूलन व वर्गीकरण
लहान प्रश्न
1. अनुकूलन म्हणजे काय?
उत्तर: सजीव ज्या वातावरणात राहतो त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी झालेला बदल म्हणजे अनुकूलन.
2. कमळाची पाने पाण्यावर का तरंगतात?
उत्तर: कमळाच्या पानांवर मेणाचा थर असतो व त्याचे देठ हलके आणि पोकळ असतात.
3. उंटाला ‘वाळवंटातील जहाज’ का म्हणतात?
उत्तर: उंटाच्या शरीरात पाणी साठवण्याची क्षमता असते आणि तो वाळूत सहज चालू शकतो.
4. पक्ष्यांना उडण्यासाठी कोणकोणती अनुकूलने झाली आहेत?
उत्तर: पक्ष्यांची हाडे पोकळ असतात, शरीर हलके असते आणि पुढचे पाय पंखांमध्ये बदललेले असतात.
5. ध्रुवीय अस्वलाचा रंग पांढरा का असतो?
उत्तर: पांढऱ्या रंगामुळे ते बर्फाळ प्रदेशात सहज लपून राहू शकते.
6. सरडे संकटाच्या वेळी स्वतःचा रंग का बदलतो?
उत्तर: स्वतःला शत्रूपासून वाचवण्यासाठी सरडा आपला रंग बदलतो.
7. वाळवंटातील वनस्पतींना पाने का नसतात?
उत्तर: पाने काट्यांमध्ये बदललेली असतात जेणेकरून पाण्याचा अपव्यय कमी होतो.
8. माशांना पाण्यात श्वसन कसे करता येते?
उत्तर: माशांना गिल्स (कल्ले) असतात, ज्यामुळे ते पाण्यातील ऑक्सिजन घेतात.
9. जंगलातील प्राणी स्वतःचे संरक्षण कसे करतात?
उत्तर: काही प्राणी रंग बदलतात, काही झाडांमध्ये लपतात तर काही गतीने पळतात.
10. डार्विनच्या ‘सक्षम तोच टिकेल’ या सिद्धांताचा अर्थ काय?
उत्तर: जो सजीव पर्यावरणाशी जुळवून घेईल तोच पुढे टिकेल आणि त्याची पिढी पुढे वाढेल.
लांब प्रश्न
1. वाळवंटातील प्राणी आणि वनस्पती कोणत्या प्रकारे अनुकूलित झाले आहेत?
उत्तर: वाळवंटातील प्राणी (उंट, सरडे) कमी पाण्यात तग धरतात, त्यांची त्वचा जाड असते. निवडुंग व बाभूळ यासारख्या वनस्पतींची पाने काट्यांमध्ये बदललेली असतात आणि खोडात पाणी साठवले जाते.
2. हिमप्रदेशातील प्राण्यांची वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर: हिमप्रदेशातील प्राण्यांचे शरीर लांबसर व जाडसर केसांनी झाकलेले असते. ध्रुवीय अस्वल, याक यांना जाड लोकर असते, ज्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळते.
3. जंगलातील शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांमध्ये काय फरक असतो?
उत्तर: शाकाहारी प्राणी (हत्ती, हरिण) गवत आणि झाडांची पाने खातात, त्यांचे दात सपाट असतात. मांसाहारी प्राणी (वाघ, सिंह) मांस खातात, त्यांना तीक्ष्ण नखे आणि सुळे असतात.
4. जलचर प्राणी जमिनीवरील प्राण्यांपेक्षा वेगळे का असतात?
उत्तर: जलचर प्राण्यांना पोहण्यासाठी पर असतात, त्यांच्या शरीराचा आकार सरळ व निमुळता असतो, आणि ते गिल्सद्वारे (कल्ले) श्वसन करतात.
5. सजीवांचे वर्गीकरण कशासाठी केले जाते?
उत्तर: सजीवांचे वर्गीकरण केल्याने त्यांचा अभ्यास सोपा होतो आणि वेगवेगळ्या गटांतील सजीवांची वैशिष्ट्ये ओळखता येतात. उदाहरणार्थ, प्राणी व वनस्पती वेगळे गट असतात.
Leave a Reply