Question Answers For All Chapters – नागरिकशास्त्र Class 7
मूलभूत हक्क भाग-२
स्वाध्याय
1. लिहिते व्हा.
(1) धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते कारण भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि कोणत्याही विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी कर लावला जाऊ नये.
(2) संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे जर कोणाचा हक्कभंग झाला असेल, तर त्या व्यक्तीला न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. न्यायालय हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विविध आदेश देऊ शकते.
2. योग्य शब्द लिहा.
(1) देहोपस्थिती / बंदी प्रत्यक्षीकरण (Habeas Corpus)
(2) अधिकारपृच्छा (Quo Warranto)
(3) परमादेश (Mandamus)
(4) मनाई आदेश / मनाई (Prohibition)
3. आपण हे करू शकतो, याचे कारण पुढे नमूद करा.
(1) सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात. कारण भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे.
(2) मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते. कारण संविधानाने सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क दिले आहेत, ज्यामुळे कोणत्याही समूहाला त्यांची भाषा आणि शिक्षण टिकवून ठेवता येते.
4. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
(1) हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालय विचारात घेते.
(2) शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही.
Leave a Reply