Notes For All Chapters – इतिहास Class 7
शिवपूर्वकालीन भारत
१) शिवपूर्व भारतातील राजसत्ता
- भारतात अनेक वेगवेगळ्या राजसत्ता होत्या.
- पाल घराणे – बंगालमधील प्रसिद्ध राजघराणे.
- गुर्जर-प्रतिहार सत्तेचा – मध्य भारत, गुजरात आणि काठेवाडपर्यंत विस्तार.
- चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान – पहिल्या तराई युद्धात घोरीचा पराभव केला, पण दुसऱ्या युद्धात घोरीने त्याला हरवले.
- चोळ घराणे (तमिळनाडू) – राजराज पहिला व राजेंद्र पहिला यांनी श्रीलंका आणि मालदीव बेटांवर विजय मिळवला.
- राष्ट्रकूट घराणे (महाराष्ट्र) – गोविंद तिसरा व कृष्ण तिसरा यांच्या काळात सत्ता मोठी झाली.
- शिलाहार घराणे – कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सत्ताधारी होते.
- यादव घराणे (महाराष्ट्र) – भिल्लम पाचवा याने देवगिरी ही राजधानी ठेवली.
- यादव काळात मराठी भाषा आणि वारकरी संप्रदायाचा विकास झाला.
२) वायव्येकडून आलेले आक्रमक
- अरब आक्रमणे – मुहम्मद बिन कासिमने सिंध प्रांत जिंकला (इ.स. ७१२).
- तुर्क आक्रमणे – महमूद गझनीने सोमनाथ मंदिर लुटले आणि भारतातील खजिना घेऊन गेला.
- मुहम्मद घोरी – पृथ्वीराज चौहानचा पराभव करून भारतात सत्ता स्थापन केली.
- दिल्ली सल्तनत – कुतुबुद्दीन ऐबक हा पहिला सुलतान (इ.स. १२०६).
३) विजयनगर आणि बहमनी राज्य
विजयनगर साम्राज्य:
- हरिहर आणि बुक्क यांनी इ.स. १३३६ मध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना केली.
- कृष्णदेवराय (इ.स. १५०९ – १५३०) – तेलुगू ग्रंथ ‘आमुक्तमाल्यदा’ लिहिला.
- त्यांनी हंपी ही राजधानी ठेवली आणि अनेक मंदिरे बांधली.
बहमनी साम्राज्य:
- हसन गंगूने इ.स. १३४७ मध्ये बहमनी साम्राज्य स्थापन केले.
- महमूद गावान – प्रशासक, सैन्यात सुधारणा केल्या, मदरसा स्थापन केला.
नंतर बहमनी राज्य पाच भागांत विभागले –
- आदिलशाही (विजापूर)
- निजामशाही (अहमदनगर)
- बरीदशाही (बिदर)
- इमादशाही (वऱ्हाड)
- कुतुबशाही (गोवळकोंडा)
४) मुघल साम्राज्याची स्थापना
बाबर (इ.स. १५२६) –
पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहीम लोदीला हरवले आणि मुघल सत्तेची स्थापना केली.
खानुआच्या लढाईत राणा संगाचा पराभव केला.
अकबर (इ.स. १५५६ – १६०५) –
भारत एकत्र आणण्यासाठी अनेक राजांशी संध्या केली.
‘दीन-इ-इलाही’ नावाचा नवा धर्म सुरू केला.
राणा प्रताप, चांदबिबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध संघर्ष केला.
औरंगजेब (इ.स. १६५८ – १७०७) –
दक्षिण भारतावर स्वारी केली.
गुरू गोविंदसिंग यांच्या खालसा दलाशी संघर्ष झाला.
राजपुत आणि मराठ्यांविरुद्ध युद्धे लढली.
५) महत्त्वाचे स्वातंत्र्यसैनिक आणि लढे
- राणा प्रताप – मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी लढले.
- चांदबिबी – अहमदनगरच्या स्वातंत्र्यासाठी मुघलांविरुद्ध झुंज दिली.
- राणी दुर्गावती – गोंडवन राज्यासाठी मुघलांविरुद्ध झुंजली.
- गुरु गोविंदसिंग – शीखांचा ‘खालसा पंथ’ स्थापन केला आणि मुघलांविरुद्ध संघर्ष केला.
- मराठे – शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी मुघलांविरुद्ध संघर्ष केला.
महत्त्वाच्या घटनांची कालरेषा:
- इ.स. १३३६ – विजयनगर साम्राज्याची स्थापना
- इ.स. १३४७ – बहमनी साम्राज्याची स्थापना
- इ.स. १५२६ – मुघल सत्तेची स्थापना
- इ.स. १५०९ – कृष्णदेवराय गादीवर
- इ.स. १५६५ – तालिकोटची लढाई (विजयनगर साम्राज्याचा पराभव)
Leave a Reply