Imp Questions For All Chapters – इतिहास Class 7
शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
लहान प्रश्न
1. महाराष्ट्रात 17 व्या शतकात कोणत्या सत्तांचा प्रभाव होता?
उत्तर: निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांचा प्रभाव होता.
2. गावाचा प्रमुख कोण होता?
उत्तर: गावाचा प्रमुख पाटील होता.
3. कुलकर्णी कोणत्या कामासाठी जबाबदार असत?
उत्तर: महसुलाची नोंद ठेवण्याचे काम कुलकर्णी करत असत.
4. परगण्याचा प्रमुख अधिकारी कोण होता?
उत्तर: देशमुख हा परगण्याचा प्रमुख अधिकारी होता.
5. बलुतं म्हणजे काय?
उत्तर: गावातील कारागीर शेतकऱ्यांकडून घेत असलेल्या उत्पन्नाच्या वाट्याला बलुतं म्हणतात.
6. संत ज्ञानेश्वरांनी कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला?
उत्तर: संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला.
7. संत तुकारामांचे गाव कोणते?
उत्तर: संत तुकारामांचे गाव देहू आहे.
8. समर्थ रामदास स्वामींचा प्रसिद्ध संदेश कोणता?
उत्तर: “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” हा त्यांचा संदेश होता.
9. 1630 च्या दुष्काळामुळे काय झाले?
उत्तर: लोकांना अन्न आणि पाणी मिळणे कठीण झाले आणि लोक गाव सोडून गेले.
10. वारकरी पंथाचे मुख्य केंद्र कोणते होते?
उत्तर: पंढरपूर हे वारकरी पंथाचे मुख्य केंद्र होते.
लांब प्रश्न
1.शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात अस्थिरता का होती?
उत्तर: वेगवेगळ्या सत्तांमध्ये लढाया होत होत्या आणि युरोपियन व्यापार्यांमध्ये स्पर्धा होती, त्यामुळे महाराष्ट्र अस्थिर होता.
2. संत तुकाराम यांनी समाजासाठी कोणते कार्य केले?
उत्तर: त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अन्यायाविरोधात आवाज उठवला आणि लोकांना समतेचा संदेश दिला.
3. परगण्याच्या प्रशासनात देशमुख आणि देशपांडे यांची भूमिका काय होती?
उत्तर: देशमुख परगण्यातल्या सर्व पाटलांचा प्रमुख होता आणि देशपांडे कुलकर्ण्यांचा प्रमुख होता.
4. संत नामदेवांनी काय कार्य केले?
उत्तर: त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणले आणि त्यांच्या अभंगांचा प्रभाव पंजाबपर्यंत पोहोचला.
5. 1630 चा दुष्काळ लोकांसाठी कसा धोकादायक ठरला?
उत्तर: धान्याच्या टंचाईमुळे लोक उपाशी मरत होते, पाणी मिळत नव्हते आणि अनेकांनी गाव सोडले.
Leave a Reply