Questions Answers For All Chapters – भूगोल Class 7
समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे
स्वाध्याय
प्रश्न १: खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) समोच्चतादर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो?
उत्तर: समोच्चतादर्शक नकाशाचा वापर पर्यटक, गिर्यारोहक, भटकंती करणारे लोक, संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक, तसेच भूप्रदेशाचे नियोजन करणाऱ्या शास्त्रज्ञांना होतो.
(२) समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते?
उत्तर: समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून प्रदेशाच्या उंचीचे प्रमाण, उताराची तीव्रता, पर्वत, डोंगररांगा, नद्या आणि सपाट प्रदेशांची माहिती मिळते.
(३) शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग कसा होईल?
उत्तर: शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग पाण्याचा प्रवाह समजण्यासाठी, पाणलोट क्षेत्र ठरवण्यासाठी, शेताच्या उताराची कल्पना करण्यासाठी आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांसाठी होतो.
(४) प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण कशाच्या साहाय्याने दाखवता येते?
उत्तर: प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण समोच्च रेषा नकाशाच्या साहाय्याने दाखवता येते.
प्रश्न २: रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१) समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील, तर तेथील उतार तीव्र असतो.
(२) नकाशावर समोच्च रेषा उंचीचे प्रतिनिधित्व करतात.
(३) समोच्च रेषां तील अंतरावरून उताराची कल्पना करता येते.
(४) दोन समोच्च रेषांतील अंतर कमी असते तेथे उतार तीव्र असतो.
Leave a Reply