Imp Questions For All Chapters – भूगोल Class 7
मानवी वस्ती
लहान प्रश्न
1. मानवी वस्ती म्हणजे काय?
उत्तर: माणसाने राहण्यासाठी तयार केलेली जागा म्हणजे मानवी वस्ती.
2. मानवी वस्ती किती प्रकारांची असते?
उत्तर: मानवी वस्ती तीन प्रकारांची असते – ग्रामीण वस्ती, नागरी वस्ती आणि आदिवासी वस्ती.
3. ग्रामीण वस्तीमध्ये कोणता मुख्य व्यवसाय असतो?
उत्तर: शेती हा ग्रामीण वस्तीतील प्रमुख व्यवसाय असतो.
4. केंद्रित वस्ती कुठे आढळते?
उत्तर: पाण्याजवळ, नद्यांच्या काठावर, मोठ्या बाजारपेठेत व बंदरांजवळ केंद्रित वस्ती आढळते.
5. रेषाकृती वस्ती कशामुळे तयार होते?
उत्तर: रस्ते, रेल्वेमार्ग, नद्या किंवा समुद्रकिनाऱ्यालगत वस्ती झाल्यास ती रेषाकृती वस्ती असते.
6. नागरी वस्तीमध्ये कोणत्या सुविधा असतात?
उत्तर: मोठ्या इमारती, वाहतूक व्यवस्था, शाळा, बाजारपेठा आणि रुग्णालये असतात.
7. विखुरलेली वस्ती कुठे आढळते?
उत्तर: जंगल, डोंगराळ प्रदेश आणि विस्तीर्ण शेतजमिनींमध्ये विखुरलेली वस्ती आढळते.
8. नागरीकरण म्हणजे काय?
उत्तर: लहान गावे मोठ्या शहरांमध्ये रूपांतरित होण्याच्या प्रक्रियेस नागरीकरण म्हणतात.
9. ग्रामीण आणि नागरी वस्तीमध्ये काय फरक आहे?
उत्तर: ग्रामीण वस्ती छोटी आणि शांत असते, तर नागरी वस्ती मोठी व गजबजलेली असते.
1o. मानवी वस्तीच्या विकासावर कोणते घटक परिणाम करतात?
उत्तर: पाणी, हवामान, जमीन आणि वाहतूक सुविधा हे मुख्य घटक आहेत.
लांब प्रश्न
1. वस्तीचे मुख्य प्रकार कोणते आहेत?
उत्तर: वस्तीचे मुख्य प्रकार म्हणजे ग्रामीण वस्ती, नागरी वस्ती आणि आदिवासी वस्ती. ग्रामीण भागात शेती व्यवसाय असतो, नागरी भागात उद्योगधंदे वाढलेले असतात, तर आदिवासी पाडे जंगल व डोंगराळ भागात आढळतात.
2. केंद्रित वस्ती आणि विखुरलेल्या वस्तीमध्ये काय फरक आहे?
उत्तर: केंद्रित वस्तीमध्ये घरे एकत्र असतात आणि पाण्याजवळ, बाजारपेठा किंवा वाहतुकीच्या ठिकाणी आढळते.
विखुरलेल्या वस्तीमध्ये घरे लांब लांब असतात व जंगल, डोंगराळ भागात असतात.
3. मानवी वस्ती कुठे आणि कशी विकसित झाली?
उत्तर: प्राचीन काळी माणूस नद्यांच्या काठावर राहत असे. कालांतराने शेती, व्यापार आणि वाहतूक सोयीमुळे गावे व शहरे तयार झाली आणि नागरीकरण सुरू झाले.
4. नागरीकरणामुळे काय बदल झाले?
उत्तर: नागरीकरणामुळे वाहतूक, शिक्षण, व्यापार आणि नोकऱ्यांच्या संधी वाढल्या. मात्र, यामुळे वाहतूक कोंडी, झोपडपट्ट्या आणि प्रदूषणाच्या समस्या वाढल्या.
5. वस्तीच्या विकासासाठी कोणते घटक महत्त्वाचे असतात?
उत्तर: पाणी, सुपीक जमीन, हवामान, वाहतूक सुविधा आणि व्यवसायाच्या संधी या गोष्टी वस्तीच्या विकासासाठी महत्त्वाच्या असतात. जिथे हे घटक चांगले असतात, तिथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या स्थायिक होते.
Leave a Reply