गती व गतीचे प्रकार
स्वाध्याय
1. गतीचा प्रकार ओळखा:
(अ) पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे – वर्तुळाकार गती
(आ) छताला टांगलेला फिरणारा पंखा – वर्तुळाकार गती
(इ) आकाशातून पडणारी उल्का – रेषीय गती
(ई) जमिनीवरून उडवलेले रॉकेट – रेषीय गती
(उ) पाण्यात पोहणारा मासा – यादृच्छिक गती
(ऊ) सतारीची छेडलेली तार – आंदोलित गती
2. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा:
(अ) इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो रेषीय गतीने खाली येतो, तर गच्चीला समांतर रेषेत गच्चीबाहेर जोरात फेकल्यास तो नैकरेषीय गतीने जमिनीवर येईल.
(आ) धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती रेषीय असमान असते.
(इ) आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार नैकरेषीय गतीने उडते.
(ई) फिरत असलेल्या आकाशपाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती असमान वर्तुळाकार, तर मेरी गो राऊंडमध्ये बसलेल्या मुलांची गती समान वर्तुळाकार असते.
3. आमच्यातील वेगळेपण ओळखा:
(अ) आंदोलित गती व रेषीय गती
- आंदोलित गती – वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हेलकावे खाते. (उदा. झोपाळा)
- रेषीय गती – वस्तू एका सरळ रेषेत जाते. (उदा. सायकल सरळ जात असते.)
(आ) रेषीय गती व यादृच्छिक गती
- रेषीय गती – वस्तू एका सरळ रेषेत जाते. (उदा. रेल्वे)
- यादृच्छिक गती – वस्तू अनिश्चित मार्गाने जाते. (उदा. फुलपाखरू)
(इ) यादृच्छिक गती व आंदोलित गती
- यादृच्छिक गती – वस्तूचा मार्ग आणि दिशा ठरलेला नसतो. (उदा. मैदानात धावणारे मुलगे)
- आंदोलित गती – वस्तू एका निश्चित मार्गावर हेलकावे खात असते. (उदा. घड्याळाचा लंबक)
4. प्रत्येकी एक उदाहरण देऊन स्पष्ट करा:
(अ) रेषीय गती – सरळ रेषेत चालणारी सायकल.
(आ) आंदोलित गती – झोपाळ्यावर बसलेली मुलं मागे- पुढे जातात.
(इ) वर्तुळाकार गती – पंख्याचे पाते गोलाकार फिरते.
(ई) यादृच्छिक गती – मैदानात खेळणारे मुले कोणत्याही दिशेने धावतात.
(उ) नियतकालिक गती – घड्याळाचा मिनिट काटा प्रत्येक 60 मिनिटांनी एक फेरी पूर्ण करतो.
5. प्रश्नांची उत्तरे:
(अ) आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात?
→ पक्ष्यांच्या हालचालींमध्ये मुख्यतः नैकरेषीय गती आणि यादृच्छिक गती दिसतात.
(आ) रस्त्यावरून सायकल चालवताना कोणकोणत्या गतींचा अनुभव येतो?
→ सायकल चालवताना वेगवेगळ्या प्रकारच्या गतींचा अनुभव येतो –
- रेषीय गती – जेव्हा सायकल सरळ चालते.
- रेषीय असमान गती – जेव्हा सायकलचा वेग कमी-जास्त होतो.
- वर्तुळाकार गती – जेव्हा सायकल वळण घेतो.
- घर्षण बल – ब्रेक लावल्यानंतर सायकल थांबते.
6. शब्द कोडे सोडवा:
(1) घड्याळातील काट्यांची गती – वर्तुळाकार गती
(2) झाडावरून पडणाऱ्या फळांची गती – रेषीय गती
(3) गोफणीची गती – वर्तुळाकार गती
(4) मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती – यादृच्छिक गती
Leave a Reply