पोषण आणि आहार
स्वाध्याय
1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा:
(अ) अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात.
(आ) शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना पोषकतत्त्वे म्हणतात.
(इ) कर्बोदके व स्निग्ध पदार्थांपासून शरीराला ऊर्जा मिळते.
(ई) संतुलित आहारात सर्व पोषकतत्त्वांचा योग्य प्रमाणात समावेश असतो.
(उ) अन्न पिरॅमिडमध्ये तृणधान्यांना सर्वांत मोठी जागा देतात कारण त्यांच्यामुळे आपली ऊर्जेची गरज भागते.
(ऊ) गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने लठ्ठपणा येतो.
2. खनिजे व जीवनसत्त्वांच्या तक्त्यांमधून ही माहिती शोधून काढा:
(अ) लिंबूवर्गीय फळांमधील पोषकतत्त्वे:
→ जीवनसत्त्व C
(आ) दुधापासून मिळणारी खनिजे / जीवनसत्त्वे:
→ खनिजे: कॅल्शिअम, फॉस्फरस
→ जीवनसत्त्वे: जीवनसत्त्व D, B12
(इ) रातांधळेपणा, स्कर्व्ही, मुडदूस, बेरीबेरी या आजारांची कारणे व लक्षणे:
आजार | कारण | लक्षणे |
---|---|---|
रातांधळेपणा | जीवनसत्त्व A ची कमतरता | रात्री कमी प्रकाशात दिसत नाही |
स्कर्व्ही | जीवनसत्त्व C ची कमतरता | हिरड्या सुजणे, रक्तस्राव होणे |
मुडदूस | जीवनसत्त्व D ची कमतरता | हाडे ठिसूळ होणे, हाडदुखी |
बेरीबेरी | जीवनसत्त्व B1 ची कमतरता | चेतातंतूंच्या क्रियेत बिघाड, अशक्तपणा |
(ई) वरील आजार टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ:
→ गाजर, हिरव्या भाज्या, दूध, आवळा, तृणधान्ये, मासे, फळे.
(उ) अॅनिमिया (रक्ताची कमतरता) होण्याची कारणे:
→ शरीरात लोहाची कमतरता झाल्यास अॅनिमिया होतो.
(ऊ) दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिज:
→ कॅल्शिअम आणि फॉस्फरस
(ए) A जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा ज्ञानेंद्रियांवर होणारा परिणाम:
→ कमी उजेडात दिसत नाही (रातांधळेपणा), डोळ्यांची कमजोरी.
3. योग्य पर्याय निवडा:
(अ) डाळींपासून पुढील पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात मिळतात.
✔ ३) प्रथिने
(आ) या पदार्थांपासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते.
✔ १) तृणधान्ये
(इ) या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो.
✔ ३) आयोडीन
(ई) याचा जंक फूडमध्ये समावेश होतो.
✔ ४) चॉकलेट
4. अन्न पिरॅमिडचा वापर करून खाण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे तीन दिवसांसाठी अन्नपदार्थ निवडा.
(दिवस 1)
- नाश्ता: दूध, पोळी, तूप, फळ
- दुपारचे जेवण: भाकरी, भाजी, डाळ-भात, कोशिंबीर
- संध्याकाळी: ताक, नाचणी सत्त्व
- रात्रीचे जेवण: चपाती, पालेभाजी, लोणचं, दही
(दिवस 2)
- नाश्ता: पोहे, लिंबूपाणी
- दुपारचे जेवण: तांदळाची भाकरी, वरण-भात, भाजी
- संध्याकाळी: दूध, शेंगदाणे
- रात्रीचे जेवण: पोळी, भाजलेले मासे, सूप
(दिवस 3)
- नाश्ता: उपमा, संत्र्याचा रस
- दुपारचे जेवण: चपाती, पिठले, तांदूळ, कोशिंबीर
- संध्याकाळी: ताक, सुकामेवा
- रात्रीचे जेवण: पराठा, दही, फळ
Leave a Reply